नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा; महिला दिनी शहरात दुचाकी रॅली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी महिला पोलिसांना एक अनोखी भेट दिली असून आता महिला पोलिसांची ‘डय़ुटी’ केवळ आठ तास असणार आहे. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅली कार्यक्रम दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जनजागृतीपर दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी वाहतूक नियमांचे महत्त्व आणि त्याविषयी जनजागृती करण्यात आली. विशेष दुचाकी रॅली परिमंडळ एक आणि दोनमधून काढण्यात आली.

पोलीस आयुक्तालयातील १०० पेक्षा अधिक महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या दुचाकी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. याबाबत पत्रकारांना माहिती देताना महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना फक्त ८ तासांची डय़ुटी लागू करण्यात असल्याचे जाहीर केले. तसेच महिला दिनानिमित्त सर्व पोलीस नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदभार महिला पोलिसांकडे देण्यात आला होता, याशिवाय शहरातील १० पेक्षा अधिक आणि सर्वात व्यस्त वाहतूक नियंत्रक येथील वाहतूक नियंत्रण महिला पोलिसांच्या हाती सोपवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध उपक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला अंमलदारांसह अधिकाऱ्यांचा सहभाग

परिमंडळ एकमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज चौक — मोराज सर्कल — पाम बीच — खारघर चौक  अशी काढली. तर परिमंडळ दोनमध्ये सीबीडी उत्सव चौक ते ग्राम विकास भवन कळंबोली सर्कल पनवेल बस स्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली.  यात महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच वाहतूक विभागातील महिला कर्मचारी सहभागी झाले. सर्व महत्वाच्या वाहतूक नियंत्रक (सिग्नल) वर महिला पोलिसांचा बंदोबस्त होता या महिलांनीच दिवसभर वाहतूक नियंत्रण केले.

महिला दिनाचे औचित्य साधून या पुढे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कार्यालयीन तास केवळ ८ तासांचे असणार आहेत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रमाणेच मंगळवारी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार महिला पोलिसांच्या हाती देण्यात आला होता या निर्णयांनी त्यांच्यातील आत्मविश्वस वाढून अधिक कार्यक्षमतेने काम करतील महिला पोलीस म्हणूनही कुठेही कमी नाही हा विश्वस आम्हाला आहे.  – बिपीनकुमार सिह (पोलीस आयुक्त)

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women police eight hour duty bike rally in the city ysh
First published on: 09-03-2022 at 03:05 IST