scorecardresearch

रस्त्याकडेला लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…

महिलांनी खारघरमध्ये मटणाच्या व्यापा-याला दिवसा ४ लाखाला लुटले.

रस्त्याकडेला लघुशंकेसाठी वाहन थांबवणार असाल तर सावधान…
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पनवेल : रस्त्याकडेला आडोसा पाहून लघुशंकेसाठी वाहन थांबविणार असाल तर जरा सावधानता बाळगा, असे बोलण्याची वेळ आली आहे. खाऱघर वसाहतीमधील सेक्टर ३९ येथील परिसरात पापाडीचा पाडानजीक बौद्ध स्मशानभूमीजवळील मार्गावर दुपारी दिड वाजण्याच्या सूमारास शनिवारी ही घटना घडली आहे. नवी मुंबईतील तूर्भे स्टोर येथे राहणारे ५० वर्षीय मटन विक्रेते मेहमूद शेख यांचा व्यवसाय खारघरमध्ये सूरु आहे. अनेक लहानमोठ्या मटनविक्रेत्यांकडून त्यांचे मटन विक्रीचे पैसे गोळा कऱण्याचे काम ते रिक्षातून फीरुन करतात. शनिवारी दुपारी पापडीच्या पाडा येथील स्मशानभूमीजवळ शेख यांनी लघुशंकेसाठी रिक्षा उभी केल्यावर शेख यांच्याकडे 4 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम होती.

मात्र लघुशंकेसाठी आडोशाला उभे असताना त्यांच्याजवळ दोन महिला आल्या. त्यातील एक महिलेने बुरखा घातला होता. २५ ते ३० वयोगटाच्या महिलांनी शेख यांनी येथे महिला उभ्या असताना तूम्ही लघुशंका का करताय असा जाब विचारला. शेख यांना बोलण्यात गुंतवून त्या महिलांच्या दुकलीने शेख यांची रोकड असलेली निळी पिशवी घेऊन त्यांच्या तिस-या साथीदारासोबत दुचाकीवरुन पलायन केली. दोनही महिला बंगाली हिंदीभाषिक असून त्यांची उंची साडेचार ते पाच फूट आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीपान शिंदे या प्रकरणी या दोन महिलांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या