Yashashree Shinde Murder Case: महाराष्ट्रासह देशाला हादरवणारं घटना म्हणजे उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड. दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या केली. त्याआधी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. दाऊद शेख हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने यशश्रीचा मृतदेह ठेचला, तसंच प्रायव्हेट पार्टही कापले. या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली. अशात आता एक नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी काय सांगितलं? २५ जुलैला यशश्री शिंदे ( Yashashree Shinde ) बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचं ( Yashashree Shinde ) प्रेत आम्हाला सापडलं. त्यानंतर शनिवार सकाळी म्हणजेच २७ जुलैला खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणात आम्ही दोन ते तीन संशयित शोधले होते. त्यांच्या शोधासाठी आम्ही नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी शोध पथक पाठवलं. ज्या गोष्टी आम्हाला कळत होत्या त्या कर्नाटकमध्ये आम्ही पथकाला देत होतो. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आली. हे पण वाचा- Yashashree Shinde Murder Case : यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम दाऊद शेखने करोनाच्या दरम्यान उरण सोडलं होतं दाऊद शेख हा अनेक दिवस उरणला वास्तव्य करत होता. त्याच्यावर पॉक्सो प्रकरणात आरोप झाले आणि त्याला तुरुंगात जावं लागलं ज्यानंतर त्याने उरण सोडलं. करोना काळाच्या दरम्यान दाऊद शेख कर्नाटकमध्ये वास्तव्य करत होता आणि तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने एक दोन कंपन्यांमधली नोकरी बदलली होती. या दरम्यान यशश्री शिंदेच्या ( Yashshree Shinde ) तो संपर्कात होता अशीही माहिती आता समोर आली आहे. नवी माहिती काय समोर आली आहे? समोर आलेल्या माहितीनुसार दाऊद शेख आणि यशश्री शिंदे ( Yashashree Shinde ) यांचे प्रेमसंबंध होते. यशश्री शाळेत असल्यापासून दाऊदला ओळखत होती. दाऊद शेखने यशश्रीला लग्नाची मागणी घातली होती. तसंच लग्न करुन बंगळुरुला चल असंही तो तिला सांगत होता. मात्र यशश्रीने ( Yashashree Shinde) नकार दिला. २५ जुलैला तो यशश्रीला ( Yashashree Shinde ) भेटायला आला होता. दोघांमध्ये भांडण झालं त्या भांडणातून दाऊदने तिची हत्या केली अशी माहिती आता समोर आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला फाशी द्या अशी मागणी शिंदे कुटुंबाने केली आहे. दाऊद शेखवर हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल दाऊद शेखवर हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने यशश्री शिंदेला ( Yashashree Shinde ) मारण्यापूर्वी तिला शिवीगाळ केली होती, अशीही माहिती आता समोर आली आहे. दाऊद शेखला अटक करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दाऊद शेखला अटक करण्यात आली. दाऊद शेखने गुन्हा कबूल केला. यशश्री शिंदेने ( Yashashree Shinde ) लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या केल्याचं दाऊद शेखने सांगितलं आहे.