नवी मुंबई : रस्त्यावरून पायी जात असताना पार्क केलेल्या गाडीतून कोणीतरी थुंकले असा समज झाल्याने एका युवकाने गाडीतील व्यक्तीच्या गळ्यावर फुटलेल्या काचेच्या बाटलीने वार केला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हृतिक कुडळे असे यातील आरोपीचे नाव आहे तर सुनील येळगे हे फिर्यादी आहेत. सुनील हे मानखुर्द येथे राहत असून कामानिमित्त एपीएमसीत आले होते. काम झाल्यावर भूक लागल्याने तेमित्रांच्या सह सेक्टर १८ येथील एका हॉटेलात गेले.  मात्र हॉटेल मध्ये जेवणासाठी जागा नसल्याने जागा होण्याची गाडीतच वाट पाहत होते.

Vile Parle woman entered in house and stole after falsely claiming sent by domestic worker
मुंबई : वृद्धांच्या घरात शिरून चोरी, आरोपी महिलेला अटक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
gambler man dies after jumped from second floor of the building over police action fear svk 88 zws
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
लेख: ही पूर्वनियोजित चकमक कोणाच्या सांगण्यावरून?
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!
mother open letter to daughter boss who newly joined job over concern for her work stress
बॉस… तुम्ही इतकं कराच!
Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा

हेही वाचा…नवी मुंबई : ५२ लाख १३ हजारांची फसवणूक…… कमी वेळात जास्त परताव्याचे आमिष पडले महागात 

काही वेळात आरोपी हृतिक हा अचानक गाडी शेजारून गाडीच्या पुढे आला आणि त्याने गाडी समोर काचेची बाटली फोडली. आणि तुमच्या गाडीतून कोण थुंकले अशी विचारणा त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना केली. गाडीतील कोणीही थुंकले नाही असे सर्वांनीच हृतिक याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र हृतिक याने फोडलेल्या बाटलीचा काही भाग उचलला आणि सुनील यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे रक्त वाहत असल्याने मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच ठिकाणी सुनील यांनी दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी हृतिक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.