लॅटीनकॅलक्स म्हणजे राख. लाइमस्टोन जाळून मिळालेल्या या राखेला क्विकलाइम म्हणायचे व क्विकलाइमपासून मिळविता आलेला धातू, त्याचे नाव कॅल्शियम. सोने, चांदीसारखे काही अपवाद वगळता बहुतेक धातू खनिजातील त्यांच्या संयुगांवर प्रक्रिया करून मिळविता येतात. नैसर्गिकरीत्या कॅल्शियम हेकाबरेनेट स्वरूपात सर्वात जास्त प्रमाणात सापडते. याव्यतिरिक्त ते अ‍ॅनहाइड्राइट (CaSO4), जिप्सम (CaSO4.2H2O), फ्ल्योराइट किंवा फ्लोरस्पार (CaF2) व फॉसफोराइट Ca2(PO4) 3 इत्यादी रूपात आढळते. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ताजमहालची आठवण देणारे संगमरवर, Ca(CO3), विडय़ातील चुना Ca(OH)2, लाइमस्टोन  Ca(CO)3, हाड मोडल्यावर (Bone Fracture) ते सांधण्यासाठी डॉक्टर वापरतात ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस Ca(SO4). H2O, इत्यादी रूपात हजारो वर्षांपासून कॅल्शियम मानवाला माहिती असूनही अगदी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लाइम (CaO), हेच मूलद्रव्य आहे असा समज दृढ होता. सर हम्फ्री डेव्ही यांनी कॅल्शियम ऑक्साइड व मक्र्युरी ऑक्साइडच्या मिश्रणाच्या पेस्टमध्ये खळगा केला व त्यात धनाग्र म्हणून काम करण्यासाठी पारा ठेवला. प्लॅटिनम धातू ऋणाग्र म्हणून वापरून विद्युत विघटन केले गेले. यातूनच कॅल्शियम व पारा यांचे मिश्रण तयार झाले. यातून उध्र्वपातनकरून पारा वेगळा झाला व कॅल्शियम धातू प्राप्त झाला. परंतु सर हम्फ्री डेव्ही मिळविलेल्या कॅल्शियमच्या शुद्धतेबद्दल साशंकित होते. कारण कॅल्शियम ऑकसाइड म्हणजेच अपेक्षित मूलद्रव्य हा समज चांगलाच प्रभावी होता. कॅल्शियमची धातू म्हणून उपयुक्तता मर्यादित असली तरी त्यास प्राप्त करण्यासाठी प्रयोगात आणलेल्या प्रक्रिया रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी रोचक आहेत. उदाहरणार्थ फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री मोयसां याने कॅल्शियम आयोडाइड व सोडीयम आयोडाइडच्या मिश्रणाचे पाराव नीकेल वापरून केलेले विद्युत विघटन. यात सोडीयम जास्त प्रमाणात वापरले गेले. अशा विघटनातून कॅल्शियम, सोडीयम व पारा यांचे मिश्रण मिळाले. कॅल्शियम व पारा अल्कोहलमध्ये विरघळत नाहीत; परंतु सोडीयम विरघळतो म्हणून अल्कोहल वापरून मिश्रणातील सोडीअम बाजूला काढून घेतले व उध्र्वपातन करून पारा वेगळा करता आला. अशापद्धतीने ९९ टक्के शूद्ध कॅल्शियम मिळविता आले.

– डॉ. रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org