शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. सुदृढ करडे मिळवण्यासाठी शेळ्यांचे प्रजनन व्यवस्थापन करावे. शेळीची प्रथम लागवड एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करावी. शेळ्यांमध्ये १८-२१ दिवसांनी माज येतो. माजाचा काळ २४-३६ तासांचा असतो. माजावर आल्यावर १०-१२ तासांनी शेळ्या भराव्यात. जुल ते जानेवारी कालावधीत शेळ्या जास्त माजावर येतात. शेळीचा गाभणकाळ पाच महिन्याचा असतो. शेळी विल्यानंतर सरासरी तीन महिन्यांपर्यंत करडांना दूध द्यावे. अशा प्रकारे आठ महिने एका वितासाठी धरल्यास दोन वर्षांत तीन वेत घेता येतात.
प्रजनन काळाच्या आधी शेळ्यांना पूरक, सकस आहार द्यावा. सकस आहारातून प्रथिनयुक्त पौष्टिक घटक, जीवनसत्त्वे, क्षारमिश्रण दिल्यास प्रजनन संस्थेचे पोषण सुधारून २-२ स्त्रीबीजे तयार होण्याची शक्यता वाढते. साधारण एक महिना आधीपासून असा उपाय करावा. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होऊन फलधारण क्षमता वाढते. अनेक शेतकरी शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, गहू, मका, गाजर यांचा वापर करून जुळी-तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढवतात. याच काळात शेळ्यांना जंतनाशक औषधांची मात्रा देऊन जंतनिर्मूलन करून घ्यावे. शेळ्यांमधील माजांची विशिष्ट लक्षणे ओळखून योग्य वेळेस पदासक्षम असलेल्या जातिवंत बोकडाने लागवड करावी. जातिवंत बोकड जुळ्यातील असल्यास त्याच्या आनुवंशिक गुणधर्माचा फायदा होतो. म्हणून जुळ्यातील मादी व जुळ्यातील नर निवडल्यास पदास वाढवण्यास मदत होते. पदाशीसाठीचा बोकड १५ महिने पूर्ण झाल्यानंतर वापरावा. पदास हंगामात बोकडाला संतुलित आहार दररोज ३००-५०० ग्रॅम द्यावा. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी भरडलेला मका देता येतो. नर पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त उत्स्फूर्त व प्रजननक्षम असतात. सामान्यत: २५-३० शेळ्यांसाठी १८-२४ महिने वयाचा एकच बोकड पुरेसा असतो. माजावर न येणाऱ्या शेळ्या वेळीच वेगळ्या करून त्यामागील कारणांची माहिती घेऊन योग्य उपचार करावा. सर्वसाधारणपणे तिसऱ्या वितापासून जुळे करडे होण्याचे प्रमाण सुरू होते. प्रत्येक वितात एकच करडू देणारी शेळी असल्यास ती कळपातून काढून दुसरी शेळी खरेदी करावी.
वॉर अँड पीस: कॅन्सर तोंडाचा : मुखकर्करोग : भाग ३
अक्कलकोट येथील स्वामी समर्थाच्या मंदिराच्या व्यवस्थाकामात योगदान देणाऱ्या एका रुग्णाने मला त्याला झालेला मुखकर्करोग प्राथमिक अवस्थेमध्ये असताना उपचार करावयाची संधी दिली. ते रुग्ण माझ्या महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालयात प्रवेशित रुग्ण म्हणून राहिले. मुखकर्करोग हे निदान मुंबईच्या टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलने केले असल्यामुळे शंकेला जागा नव्हती. कारण स्पष्ट होते. रुग्ण सातत्याने तंबाखू मळत असे, खात असे. माझ्याकडे आल्यावर तंबाखू बंदच झाली. जेवण कटाक्षाने फिक्के, अलवण असेच दिले. चहा, मिरची, मसाला, आंबवलेले पदार्थ बंद करून तीन-चार दिवस नुसते गोदुग्धावर ठेवले. तंबाखूचा दुष्परिणाम दूर व्हावा. कोठय़ातील उष्णता कमी व्हावी म्हणून नित्य ५०/६० काळ्या मनुका खावयास दिल्या. ज्वारीची भाकरी, दुधीभोपळा, पडवळ, घोसाळे, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, मुगाचे वरण असा आहार देत राहिलो. बाह्य़ोपचारार्थ इरिमेदादी तेल वारंवार जीभ, गाल, ओठांचा आतला भाग, टाळा यांना लावत राहिलो. दोन-तीन दिवसांतच तोंडाचे स्वास्थ्य सुधारले. पोटात घेण्याकरिता प्रवाळ, कामदुधा प्र. १२ गोळ्या रोज; मौ. भस्म १०० मि. ग्रॅम, वासापाकबरोबर देत राहिलो. दोन आठवडय़ांच्या औषधी योजनेने रुग्णाला एकदम आराम पडला. पूर्वी त्यांना अन्नच काय पण पाणी गिळावयास त्रास होत असे; बोलती बंद होती. तिखट पदार्थ कणभर चालत नसे. सहनशक्ती पूर्णपणे संपली होती. चिडचिड वाढली होती. ही सर्व लक्षणे कडक पथ्यपाण्यामुळे काही काळ नाहीशी झाली.  पुढची शोकांतिका फारच कष्टदायक आहे. जवळपास तीन महिन्यांनी त्या रुग्णाला जुना तंबाखूवाला मित्र भेटला. व्यसनाने पुन्हा दगा दिला. महिनाभरातच मुखरोगाचा कॅन्सर पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनला. त्या माणसाभोवती चमत्कारिक स्वरूपाच्या माश्या घोंघावू लागल्या. अक्कलकोटवाल्यांनी माझ्याकडे नाइलाजाने पाठवले. आठ दिवस रुग्ण एका बंदिस्त खोलीत मोठय़ा माश्यांच्या संपर्कसंकटाकरिता राहिला. शेवट फारच कष्टदायक मला, नातेवाईकांना होता. इति तंबाखू, निकोटिनची कृपा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..      आर्जव आणि शुचित्व
काही लोकांना भेटले की, मोठे बरे वाटते. काय असते अशा माणसांमध्ये? मी मोठय़ा-मोठय़ा गुरूंबद्दल बोलत नाही. या गुरूंच्या समोरच्या अथांग जनसागरात गुरू किती तरी दुरून बघावा लागतो. मी माझ्या ओळखीतल्या माणसांबद्दल बोलतो आहे. ज्यांनी संसार केले आहेत, जे मुलाबाळांचे धनी आहेत, ज्यांनी आयुष्यात हादरे अनुभवले आहेत, पण तरीही मोठे लोभस वाटतात. तुम्ही त्यांच्या पुढय़ात बसलात की, असे वाटते की, या माणसाला आपल्या विवंचनांची जाण आहे. असेही वाटते की याने किंवा हिने सगळे अनुभवले आहे. जणू या व्यक्तीचा इतिहास खूप जुना आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी हा विटलेला नाही. ज्या तऱ्हेने तो तुमचे स्वागत करतो त्या तऱ्हेने आपल्याला मोठे गोड वाटते. हे जे होते ते त्या माणसाच्या स्वभावातल्या आर्जवाने होते. आर्जव या शब्दाचा अर्थ  डस्र्ील्ल ऌीं१३ील्लिी२२ असा दिला आहे. हृदय हे भावनांचे केंद्र नसेलही; परंतु माणूस जातीने भावनांचा संबंध हृदयाशीच लावला आहे. हा प्रांत बुद्धीला समांतर आहे. गीतेतले ज्ञान बुद्धीने सांगितले जाते; परंतु माणुसकीचे ज्ञान भावनांवर आधारित असते. आपल्यातले चैतन्य सर्वत्र सारखे आहे हे जे बुद्धीला कळते ते माणुसकीमधून आर्जवाच्या रूपाने माणसात उमटते. हे चैतन्य फार जुने आहे. म्हणून ओवी म्हणते-
जगाशी नाते असते जुने। म्हणूनच नाही आपले परके।
सगळ्यांशीच त्याचे पटते। पाण्यासारखे वाहते।
नाही चिकटणे। किंवा त्याग करणे। नाहीत कानेकोपरे।
सुगंधासारखे पसरते। ते आर्जव.
अर्थात अर्जवी माणूस केवळ भावनांनीच हात पसरत नाही, तो शुचित्वानेही भरलेला असावा लागतो. चैतन्याशी असलेल्या या जुन्या नात्यात तो चैतन्याचे अलिप्तपणही जपतो. ही भावना आणि बुद्धीची जुगलबंदी मग प्रकट होते, त्याबद्दलची ओवी म्हणते-
पेरलेले बी। यथावकाश होते वृक्ष। मन आणि चित्तच। इंद्रियातून प्रकटते प्रत्यक्ष।।
या शुचित्वाच्या प्रकट होण्याबद्दल ओवी म्हणते-
पाणिया हिरा न भिजे। आधणी हरळु न शिजे। तैसे विकल्पाने न लिंपिजे। मनोवृत्ती
उदाहरण दिले आहे हिऱ्याचे आणि आधणातल्या खडय़ाचे. आधण हा शब्द आ+दहन असा आला. हिऱ्यालाही खडा म्हणतात. हिरा उं१ुल्ल चा बनतो आणि खडय़ात र्र’्रूं असते. दोन्हीही टिकावू या सदरात मोडतात हे एक प्रकारचे वैज्ञानिक विधानच. विकल्प म्हणजे शंका संशय. या शुचित्वाला म्हणजे हिऱ्याला किंवा खडय़ाला किंवा चैतन्याच्या सडसडीत अवतारांना संशय ग्रासू शकत नाही अशी ही ओवी आहे. उद्या ज्याबद्दल शंका आहे त्या अहिंसेबद्दल.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत: २३ सप्टेंबर
१९१९> लेखक, ग्रंथपाल, ग्रंथमित्र, ग्रंथप्रचारक शांताराम शंकर रेगे यांचा जन्म. मुंबईतल्या जुन्या ऐतिहासिक वास्तूंवर २१ लेख प्रसिद्ध. तसेच ‘ग्रंथालय शास्त्र’ या विषयावर १०० हून अधिक लेख संग्रह प्रकाशित. ‘आताशी मगाशी’, ‘सुरुंग’ ही ललित लेखांची पुस्तके तसेच ‘गाढवाचा गोंधळ’, ‘चलती का नाम गाडी’ हे लघुकथा संग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रमय चरित्र त्यांचे प्रकाशित झाले.
१९१९> ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू देवदत्त अच्युत दाभोळकर यांचा जन्म. त्यांनी ‘पायलट सव्र्हे ऑफ शिरूर तालुका’, ‘सरदार सरोवर डिबेट’, ‘अँग्रो इंडस्ट्रियल बॅलन्स’, ‘क्लाइबिंग ए वॉल ऑफ ग्लास’ आदी पुस्तके लिहिली.
१९२०> लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रा. भालबा केळकर यांचा जन्म.
१९४१> इतिहास संशोधक नानासाहेब मिरीकर यांचा जन्म. ‘अहमदनगरचा प्राचीन खरा इतिहास’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध.
१९५०> ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या ‘सर्च’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांचा जन्म.
संजय वझरेकर

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!