आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आíथक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे.
शेतकरी कुटुंबांच्या या स्थितीवर कुटुंब समृद्धी बागेचा प्रयोग एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. नेमकी किती जमीन यासाठी वापरायची, यावर या प्रयोगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कुटुंबाचा आकार (माणसांची संख्या), जमिनीचा प्रकार, जमीन बारमाही आहे की हंगामी, घरच्या माणसांना सवड किती आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
कुटंब समृद्धी बागेत आपण गरजेच्या धान्याबरोबरच भाज्या आणि फळेही लावणार असल्याने त्या चोरीस जाण्याची फार मोठी शक्यता असते. त्यासाठी आपल्या शेतातील वस्तीजवळच बागायतीचा सर्वोत्तम जमिनीचा तुकडा या कामासाठी निवडावा. म्हणजे त्यावर कुटुंबीयांची देखरेख चांगली राहील. सवडीने त्यांना वरचेवर कामही करता येईल. जमीन उत्तम असल्याने उत्पादनही चांगले मिळेल. मात्र वस्ती नसेल तर मजबूत कुंपण करणे योग्य ठरेल.
या तुकडय़ात आपल्याला कुटुंबाच्या गरजेची जास्तीतजास्त पिके तीसुद्धा सेंद्रीय पद्धतीने पिकवायची आहेत. कारण या पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य आरोग्यदायी असते, असा विचार अलीकडे वाढला आहे. सुरुवात करण्यापूर्वी ही जमीन भरपूर (हेक्टरी किमान ५० गाडय़ा) शेणखत घालून खतावून घ्यावी. हंगामापूर्वी वेळ असेल तर ती हिरवळीच्या खतानेही खतावून घ्यावी. एक तृणधान्य, एक हिरवळीचे पीक, एक कडधान्य पीक, एक मसाला पीक आणि एक तेलधान्य असे हेक्टरी १०० ग्रॅम धान्यमिश्रण घेऊन उथळ पेरावे किंवा विस्कटून बी जमिनीत मिसळावे. सुमारे ४०-५० दिवसांनी हिरवळ जमिनीत गाडावी.
 यामागचे विज्ञान असे की, वेगवेगळ्या पिकांत वेगवेगळी पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे पिकांना सर्व तऱ्हेची पोषकद्रव्ये मिळून ती निरोगी आणि उत्तम वाढतात. मात्र हे सूत्र सांभाळत असताना जमिनीला भरपूर सेंद्रीय पदार्थ मिळाले पाहिजेत.

वॉर अँड पीस: आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ७
(५०) ताप, गोवर, कांजिण्या- मौक्तिकभस्म, दशांगलेप (५१) तोंड उघडावयास त्रास- कामदुधा, त्रिफळाचूर्ण, इरिमेदादितेल (५२) तोंड येणे, मुखपाक- कामदुधा, त्रि.चूर्ण, हरिमेदादितेल (५३) तोंड वाकडे होणे, तोंडावरून वारे जाणे- आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादिगुग्गुळ, गंधर्व हरितकी (५४) थकवा, पांडुता, सूज, दुबळेपणा, पायात गोळे येणे- चंद्रप्रभा, लघुसूतशेखर (५५) दमा, हृद्रोग, धाप- दमा गोळी,  ज्वरांकुश (५६) दात दुखणे, रक्त येणे, सळसळणे- कामदुधा, त्रिफळा चूर्ण, आरोग्यवर्धिनी, दंतमंजन, इरिमेदादितेल, अमृतधारा (५७) धडधडणे – ज्वरांकुश
(५८) धुपणी, पांढरे जाणे, श्वेतप्रदर- चंद्रप्रभा, कामदुधा (५९) नरवुरडे- आरोग्यवर्धिनी, त्रि.चूर्ण, एकादितेल, टाकणखार पोटीस (६०) नाक बंद होणे, सर्दी, पडसे- ज्वरांकुश दमागोळी म.नातेल नस्य, शतधौतधृत (६१) नाकातून रक्त येणे- कामदुधा, शतधौतधृत (६२) नाडीचे ठोके कमी होणे- चंद्रप्रभा (६४) निद्राल्पता- लघुसूतशेखर, शतधौतधृत (६५) पडजीभ पडणे, वाढणे- ज्वरांकुश, दमागोळी, गुळण्या (६६) पोटदुखी जेवणानंतर, केव्हाही, पित्ताश्मरी- गॉलब्लडर  स्टोन- प्रवाळपंचामृत, शंखवटी, लघुसूतशेखर (६७) पायाची सूज- चंद्रप्रभा,  आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि  गुग्गुळ, मनातेल, रसायनचूर्ण, तुरटी (६८) पांथरी वाढणे- आरोग्यवर्धिनी, प्रवाळपंचामृत, त्रि.चूर्ण (६९) फिट्स मिरगी, अपस्मार- लघुसूतशेखर, गंधर्व हरितकी, शतधौतघृत (७०) बधिरपणा,  जलोदर- चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ, गंधर्व हरितकी (७१) भाजणे- कामदुधा, सर्जरसमलम, राख दाबणे (७२) मळाचा खडा- आरोग्यवर्धिनी, करंजेल पिचकारी, गंधर्व हरितकी (७३) मलावरोध रक्तासह- कामदुधा, आरोग्यवर्धिनी, त्रि.चूर्ण (७४) मलप्रवृत्ती नियंत्रण नसणे- कुटजवटी, कुडय़ाचे पाळ ताकात उगाळून देणे (७५) मधुमेही जखमा, गँगरिन- चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा चूर्ण,
एकादितेल
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २३  डिसेंबर
१९५३> इतिहास संशोधक विष्णु सीताराम चितळे यांचे निधन. ‘ब्रिटिशांचा इतिहास, हिंदुस्थानचा अभिनव इतिहास, नवभारताचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकांसह पेठे दप्तर भाग १, २ या संग्रहाचे संपादन त्यांनी केले.
१९५४>  लेखक, कवी, पत्रकार नरेंद्र रघुवीर बोडके यांचा जन्म.  ‘पंखपैल, सर्पसत्र, शुकशकून’ हे काव्यसंग्रह ‘सुमनस’ हा समीक्षात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित.
१९६५>  नटवर्य गणपतराव बोडस स्मृती. अहमदनगर जिल्ह्य़ातील शेवगाव येथे २ जुलै १८८० रोजी गणेश गोविंद बोडस यांचा जन्म झाला. रंगभूमीच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा किलरेस्कर संगीत मंडळीत केला. तेथे त्यांनी ‘सौभद्रमध्ये कृष्ण, शारदामध्ये कांचनभट, मूकनायकात विक्रांत तर मानापमान मध्ये लक्ष्मीधर’ अशा भूमिका केल्या. १९१३च्या सुमारास  टेंबे आणि बालगंधर्वच्या सहाय्याने ‘गंधर्व नाटक मंडळ’ ही संस्था स्थापली. या मंडळीच्या ‘एकच प्याला’मधील सुधाकर, मृच्छकटिकमधील शकार, संशयकल्लोळमधील फाल्गूनराव’ ह्य़ा भूमिका गाजल्या.  नाशिक येथे १९४० साली भरलेल्या मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा जीवनपट ‘माझी भूमिका’ आत्मचरित्रातून त्यांनी दाखवला. २३ डिसेंबर १९६५ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय वझरेकर

जे देखे रवी..      आपली अज्ञानावस्था
आपण हल्ली कॉलर टाइट करून फिरत आहोत. एक तर आपल्याकडचे शिकून अमेरिकेत इंगलंड वगैरे पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेली काही तरुण मंडळी दीघरेद्योग, मूळची हुशारी आणि प्रगत देशामधल्या तरुणांमधले आलस्य याच्या जोरावर चमकत आहेत.
इथे जे आहेत ते पाश्चिमात्य देशांनी उभारलेल्या विज्ञान डोंगरावर उभे आहेत त्या डोंगरावर इकडचा खडा किंवा दगड थोडाफार हलवून माध्यमांना हाताशी धरून बेडकासारखी छाती फुगवून आम्ही हे भव्य पाऊल टाकले अशी प्रसिद्धी मिळवत आहेत.
प्रसिद्धीमुळे हुरूप येतो हे खरेच. माझ्याही वाटय़ाला तशी प्रसिद्धी आली, पण काळ जातो आहे तसा त्याचा संकोचही वाटू लागला आहे. याचे कारण असे की, आपल्या परिस्थितीला साजेसे गरजेचे उपभोगी वृत्ती न वाढवणारे सकस विज्ञान आपल्या मातीत रुजलेले नाही.
संगणकक्षेत्रात चार-पाच खासगी संस्थांनी अटकेपार झेंडे लावले, नफा कमवला, आपल्याकडच्यांना परदेशात मोठय़ा पगारावरच्या नोकऱ्या लावून दिल्या हे वरवर खरे असले तरी संगणकाचा शोध तिकडचा. त्याचे कार्यकर्तृत्व तिकडचेच. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी थोडय़ाफार हिकमती लढवून आणि किरकोळ फेरबदल करत नवेनवे संगणकीय कार्यक्रम तयार करणे आणि मग आपल्याला काय अशक्य आहे, अशा वल्गना करणे जरा जास्तच झाले.
 शिक्षणाचा जसा बाजार झाला तशीच ही संगणकीय प्रणालीची आधुनिक घाऊक दुकाने. निसर्गत:च खासगी उद्योगात शिस्त आणि अंमलबजावणी सरस असल्यामुळे हे यशस्वी झाले.
परंतु एवढे प्रचंड उच्चशिक्षित तरुण मनुष्यबळ असूनही संगणक आणि माहितीचे दळणवळण यातली त्यांची प्रगती बघता आपण शून्यच आहोत. त्यातल्या त्यात ह्य़ा हातात ठेवता येईल अशा संगणकाची जाहिरात करण्यात मात्र आपण तीळभरही कमी नाही एवढेच.
अवकाश याने पाठवण्यात आपण यशस्वी झालो हे खरे आहे, परंतु त्यातली किती याने खरोखरच एतद्देशीय होती याचा शोध घेतला तर निराशाच पदरी पडेल अशीच स्थिती आहे. ही याने सार्वजनिक निमसरकारी संस्थांनी यशस्वी केली ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. एकंदरच आपल्याला शक्य आहे.
इथवर आपण आलो आहोत; परंतु ते शक्य करण्यासाठी जी पायाभूत मानसिकता हवी ती मात्र आपल्यात नाही हेच खरे. म्हणूनच शौचालये की देवालये असले वाद आपल्याकडे रंगतात, त्या मूलभूत मानसिकतेबद्दल आणि वैज्ञानिक भाषेबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com