पोपट, चिमण्या, कबुतरे, कावळे इत्यादी पक्षी शेतमालाचे आíथक नुकसान करतात आणि शेतमालाची प्रतही बिघडवतात. हे नुकसान टाळण्यासाठी पक्ष्यांना प्रतिबंध करणे जरुरीचे आहे. बंदुकीतून गोळ्या झाडणे हा जुना उपाय आहे. बहुतेक पक्षी कळपाने राहतात आणि शेतात वावरतात. अगदी सकाळी, पहाटेनंतर पक्ष्यांचा त्रास जास्त होतो. तेव्हा गोफणीद्वारे दगड फेकणे, ड्रमचा आवाज करणे हे उपाय फायदेशीर ठरतात. जोराचा आवाज करणारे ‘बर्ड स्केअरस्’ बाजारात मिळतात. परंतु काही दिवसांनी पक्षी अशा आवाजाला परिचित होतात आणि प्रतिबंध होत नाही. अलीकडे प्रकाशात चमकणारी धातुची फीत परिणामकारक ठरली आहे. झाडावरील फळांना प्लॅस्टिकच्या जाळीमध्ये किंवा कागदी पिशवीमध्ये ठेवल्यास पक्षी इजा करू शकत नाहीत. बियांवर कीडनाशक, बुरशीनाशक या रसायनांची प्रक्रिया केल्यास बियांना पक्ष्यांपासून संरक्षण मिळते. काही शेतकरी मात्र रासायनिक पदार्थाचा वापर करून पक्ष्यांना प्रतिबंध करतात.
रानटी प्राण्यांमध्ये रानडुक्कर, हरिण, रानम्हैस यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यामुळे पिकांची नासाडी जास्त होते. या प्राण्यांना शेताबाहेर काढणे हा सोपा उपाय आहे; परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा उपाय न परवडणारा आहे. महाराष्ट्र सरकारने अलीकडे रानटी प्राण्यांना मारण्यासाठी बंदुकीचा परवाना शेतकऱ्यांना दिला असून शेतकरी याचा वापर करीत आहेत. मात्र यासाठी वन खात्याची परवानगीही आवश्यक असते. शेतीला कमी वीजदाबाचे कुंपण केल्यास प्राण्यांना विजेचा झटका बसतो आणि ते शेतात शिरत नाहीत. हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे, परंतु खíचक आहे. काही शेतकरी मेलेल्या प्राण्याला झाडावर लटकवतात. वास आल्यामुळे इतर प्राणी शेतात येत नाहीत. शेतात रात्री काडय़ा पेटवून आग तयार करणे, प्राण्यांच्या विष्ठेचे पाण्यात द्रावण करून पिकांवर फवारणे यामुळेही वन्यप्राण्यांना प्रतिबंध होतो. रानडुकरांचा कळप शेतात ज्या बाजूने येतो, त्या बाजूला शेताच्या बाहेर गुलालाचा थर टाकल्यास लाल रंगामुळे रानडुक्कर शेतात शिरत नाहीत, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

वॉर अँड पीस:   हृद्रोग्यांकरिता विशेष पथ्यापथ्य (भाग-१०)
बहुसंख्य रुग्ण ‘आपणास औषधे घ्यायची आहेत’ या मानसिक तयारीने आलेले असतात. पण क्वचित एखादा रुग्ण असे सुनावतो की चिकित्सकाला नेहमीच्या औषधांपेक्षा त्या रुग्णाने काय खावे-प्यावे, कसे राहावे, किती व्यायाम करावा इत्यादीबद्दल सविस्तर सल्ला द्यायलाच लागतो. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी या पृथ्वीवरील प्रत्येक पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्याधिनाशनाचे, रोगनिवारण्याचे काम करत असतो हे सत्य वारंवार सांगितले आहे. औषधे म्हणजे फक्त काढे, आसवारिष्ट, जडीबुटी, गोळय़ा, टॅब्लेट, चूर्ण, विविध टॉनिक एवढेच नव्हे. कोणत्याही विकारात पथ्यापथ्य सांगताना आताच्या खूप धावपळीच्या जगात पाच घटकांचा विचार करावा लागतो. स्थूल व्यक्ती, अतिकृश, मधुमेही, कारकुनी जीवन, शारीरिक श्रम व कष्ट भरपूर करणारे हृद्रोगी पेशंटकरिता वेगवेगळे पथ्यपाण्याचे सल्ले, हृदयाचा धोका लक्षात घेऊन सांगावयास हवे. स्थूल व्यक्तीने आपणास पुन्हा हार्ट अ‍ॅटॅकचा त्रास होऊ नये म्हणून कटाक्षाने आपल्या तोंडावर ताबा’ ठेवायलाच हवा. खूप चरबीयुक्त पदार्थ, गोडधोड,  मांस-मटण, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, मिठाई, बेकरी पदार्थ खाऊ नयेत. आपले पोट आत गेले पाहिजे यावर सतत लक्ष हवे. किती उष्मांकाचे अन्न तुम्ही खाता व ते पचविण्याकरिता हिंडणे-फिरणे किती आहे याचे तारतम्य हवेच. भरपूर हिंडणे, फिरणे, दीर्घ श्वसन, प्राणायाम, व्यसनविरहित राहणी याबद्दल सांगावयास नकोच. कारकुनी जीवन जगणाऱ्या स्थूल व्यक्तींनीही अशाच जीवनपद्धतीचा अवलंब करावयास हवा. अतिकृश, भरपूर शारीरिक श्रम व कष्ट करणाऱ्या हृद्रोगी पेशंटनी आपले वजन घटणार नाही याला प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. वनस्पतीतूपयुक्त मिठाई, हॉटेलमधील आंबवलेले पदार्थ टाळावेत. घरचेच सर्वप्रकारचे ताजे जेवण जेवावे. सायंकाळी लवकर विश्रांती घ्यावी. सफरचंद, खरबूज, डाळिंब, ताडगोळे असा फलाहार असावा. मधुमेही हार्ट पेशंटनी नियमितपणे बेलाच्या पानांचा काढा, पुदिना, आले, ओली हळद, लसूण चटणी, मेथी पोळी, ज्वारी, भाकरी, मूग व विभागून जेवण यावर कटाक्ष असावा. शुभं भवतु।
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

जे देखे रवी..      ज्ञानेश्वरीमधील स्त्रीदर्शन
ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार या वेलिंगकरांच्या पुस्तकात स्त्रीविषयक नोंदी ३००-४०० असतील. त्यात तरुण स्त्री, पती-पत्नी, पतिव्रता असे अनेक भाग आहेत; परंतु त्या काळच्या स्त्रियांबद्दलची ज्ञानेश्वरांनी केलेली वर्णने पारंपरिक असली तरी चित्तवेधक आहेत. हल्लीचे स्त्रीचे माध्यमांमधून होणारे दर्शन हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहार यांच्या विकृत मगरमिठीत असलेल्या कृत्रिम, ओशाळ्या, वास्तवाशी संबंध नसलेल्या हिंदी सिनेमा म्हणजेच बॉलीवूड आणि थोडेफार हॉलिवूड यांनी रंगवलेले चित्र आहे. प्रादेशिक आणि वास्तव चित्रपटसृष्टीला यांनी मरणासन्न केले होते. हल्ली मात्र परिस्थिती सुधारत आहे हे नशीब.
ज्ञानेश्वरांना कोणी अरसिक म्हणू नये, म्हणून एक यादीच देता येईल, पण स्त्रीचे वर्णन करताना त्यांचा उद्देश मात्र उदात्त होता हे निश्चित. प्रथम वयासाकाळी। लावण्याची नव्हाळी। प्रगटे जैसी आगळी। अंगना अंगी हे वयात येत असलेल्या मुलीच्या लावण्याचे प्रगटीकरण सांगणारी ओवी व्यासांच्या भाषेला अलंकार चढविण्याच्या ताकदीबद्दल म्हणून वापरली आहे. त्यांची, काई चंचलू मासा। कामिनी कटाक्षु काइसा। वळला होय तैसा। वीजु नाई।। कसला घेऊन बसला आहेसकामिनीचा कटाक्ष, विजेला मागे टाकले, अशी माशाची वळवळ असते ही ओवी सांगताना अविद्येच्या क्षणभंगूरपणावर त्यांचे लक्ष आहे.
चंदनाची उटी देहाला शामल। तरुणीच्या नेत्रामध्ये काजळ।
पतिव्रतेचे आलिंगन। प्रियतमाला
ही ओवी नित्य कर्म नैमित्तिक कर्मामुळे कसे शोभते हे सांगण्यासाठी आहे. कुलवती अवेया (म्हणजे अवयव) लपवी आणि वेश्या आपले वय लपविते या ओव्या बरेच काही थोडय़ा शब्दांत सांगतात. केळवली नवरी (केळवण झालेली) माहेर विसरते. ही ओवी ज्ञानाच्या मार्गावर असलेली व्यक्ती मृत्यू विसरते या उद्देशाने सांगितली आहे, तसेच या जगातले द्वंद्व किंवा आपपर भाव विसरणे हा विषय सांगताना सांडूनि कुळे दोन्ही (सासर आणि माहेर) कामिनी अनुसरे क्रिया या ओवीतली क्रिया संसार आणि पतीशीच केवळ निगडित आहे. सासर माहेरच्या द्वंद्वाला विराम मिळाला आहे, असे सांगते आणि अहिंसा बाणलेल्या व्यक्तीचे बोल.
नाद ब्रह्म मूर्छले। गंगापाय आसलेले।। पतिव्रते आले। वृद्धाण्य, म्हणजे आकारलेले नादब्रह्म, शांत वाहत चाललेले गंगाजल किंवा वृद्ध झालेल्या पतिव्रतेप्रमाणे शीतल आणि रसाळ अमृताच्या कल्लोळासारखे आहेत, असे ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा ते वृद्ध पतिव्रतेला गंगा आणि नादब्रह्माच्या जोडीला बसवतात. असो आता गंगाच मुळी प्रदूषित झाली आहे. त्या सध्याच्या वातावरणाबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २५ नोव्हेंबर
१८७५- नाटककार, वेदान्ती केशव रामचंद्र छापखाने यांचा जन्म.  शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’चे रूपांतर, ‘मोहनतारा’ तसेच ‘स्वाध्याय ज्ञानेश्वरी, जे. कृष्णमूर्ती, संदेश आणि परिचय’ हे दोन तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ त्यांनी लिहिले.
१९०३- संपादक, कथाकार खंडेराव सावळाराम दौंडकर यांचा जन्म. ‘सारथी’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक, तसेच ‘ज्योत्स्ना’ मासिकाचे ते एक संपादक. त्यांच्या निवडक कथा ‘मोत्यांची कडी’ या कथासंग्रहात समाविष्ट.
१९२२- प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी निधन. ‘भाऊ दाजी, झाला वेदान्त’ आदी पारितोषिकांनी ते सन्मानित. भाषांचा तौलनिक अभ्यास मांडणारा ‘अ‍ॅन इंट्रोडक्शन टू कंपरेटिव्ह फायलालॉजी’ हा एक त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ.  ‘मराठी भाषेचा कालनिर्णय, अपभ्रंश भाषेतील वाङ्मय’ हे महत्त्वपूर्ण लेख आणि ‘माझा युरोपातील प्रवास व जर्मनीतील लोकशिक्षण’ इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
१९६२- आधुनिक मराठी संतकवी दासगणु या नावाने परिचित असणाऱ्या गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे यांचे निधन. संत एकनाथ आणि गजानन महाराजांचे चरित्र त्यांनी लिहिले.
संजय वझरेकर