News Flash

सूतनिर्मितीचा इतिहास व उत्क्रांती- १

टकळीचा उपयोग सूतकताईसाठी कित्येक हजार वष्रे केला जात होता; परंतु टकळीवर सूत कातणे हे खूपच श्रमाचे व जिकिरीचे काम होते.

| May 28, 2015 12:21 pm

टकळीचा उपयोग सूतकताईसाठी कित्येक हजार वष्रे केला जात होता; परंतु टकळीवर सूत कातणे हे खूपच श्रमाचे व जिकिरीचे काम होते. टकळीवर कातल्या जाणाऱ्या सुताची लांबीही मर्यादित असे. याशिवाय ही टकळीच्या गतीला मर्यादा असल्याने या प्रक्रियेची उत्पादन क्षमता फारच कमी होती. टकळीला पर्याय शोधण्याचे काम सतत सुरू होते. या शोधाला ११व्या शतकात फळ आले आणि सूतकताईसाठी चरखा विकसित झाला. इतर देशांमध्ये या यंत्राला ‘सूतकताईचे चक्र’ (स्पििनग व्हील) असे संबोधले जात असे. भारतात याला चरखा असे नाव पडले.
बगदाद (इ.स. १२३७), चीन (इ.स. १२७०), युरोप (इ.स. १२८०) येथे सूतकताई चक्राचा उपयोग होत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. भारतात वापरला जाणारा चरखा सूतकताई चक्राचा एक सर्वात जुने उदाहरण आहे. चरख्याला जगात ‘इंडियन स्पीिनग व्हील’ या नावाने ओळखले जाते. चरखा हा शब्द पíशयन भाषेतील चरख (चाक) या शब्दावरून आला असावा.
चरखा हा भारतामध्ये फक्त एक सूतकताईचे साधनच राहिला नाही तर महात्मा गांधींमुळे तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रतीक बनला. महात्मा गांधींनी त्याच्या शिकवणीतून चरख्याचा वापर सर्वदूर पसरविला. चरखा हा लोकांना स्वयंपूर्ण व स्वतंत्र बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल अशी गांधीजींची खात्री होती. चरख्यावर सूत काढून त्यापासून बनविलेल्या खादीच्या कापडाचे कपडे वापरण्याचा संदेश गांधीजींनी लोकांना दिला. ते स्वत: रोज चरख्यावर नियमितपणे सूत काढत असत.
कापूस किंवा तत्सम आखूड तंतूंपासून सूत कातण्यापूर्वी या तंतूंमध्ये मिसळलेला कचरा, इतर विजातीय पदार्थ काढून टाकून तंतूंची स्वच्छता करावी लागते. तंतू िपजावे लागतात. सूतकताईच्या प्रक्रियेमधील ‘िपजण व स्वच्छता’ (ओपिनग अँड क्लििनग) ही पहिली प्रक्रिया होय. तंतू िपजून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून पेळू तयार करावा लागतो. या पेळूची जाडी हळूहळू कमी करून सूत कातण्यायोग्य अशी करावी लागते. कमी जाडीच्या अशा पेळूस ‘वात’ म्हटले जाते.

संस्थानांची बखर संस्थानिकांना लष्करी हुद्दे
भारतीय राजे आणि संस्थानिक स्वतला लावून घेत असलेल्या उपाध्या किंवा किताबांच्या योग्यतेचे त्यांचे कर्तृत्व होतेच असे नाही. बऱ्याच वेळा एखाद्या मोगल बादशहावर केलेले व्यक्तिश उपकार किंवा मोगल साम्राज्याला दाखविलेल्या निष्ठांच्या मोबदल्यातही त्यांना अशाप्रकारच्या उपाध्या मिळत असत. ब्रिटिश काळात या उपाध्या बदलल्या आणि अनेक संस्थानिक लष्करी पदांच्या उपाध्याही लावू लागले.
अनेक संस्थानांच्या राजघराण्यातील लोकांनी सनिकी शिक्षण घेऊन ब्रिटिश सन्यदल, भारतीय सन्यदल, पोलीस दल किंवा स्थानिक सुरक्षादलात अधिकाराच्या पदांवर काम केले. काही संस्थानिकांनी दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढून युद्धनिधीसाठी मोठय़ा देणग्या दिल्या. दोन्ही महायुद्धात ब्रिटिशांना मदत करणाऱ्यांत ग्वाल्हेर, पतियाळा, बिकानेर, जयपूर, जोधपूर, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद यांचा समावेश होतो.
‘लेफ्टनंट-जनरल’ हा हुद्दा ज्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या संस्थानांनी महायुद्धांमध्ये काही योगदान दिले अशा संस्थानिकांना दिला गेला. ‘मेजर जनरल’ किंवा ‘एअर व्हाईस मार्शल’ हा हुद्दा पंधरा वा अधिक तोफ सलामींचा बहुमान असलेल्या संस्थानांपकी बडोदा, त्रावणकोर, भोपाळ आणि म्हैसूरच्या शासकांना मिळाला. कमोडोर, किंवा ब्रिगेडिअर किंवा एअर कमोडोर हे हुद्दे पंधरा तोफसलामींचा मान असलेल्या संस्थानिकांनाच मिळाले. कमांडर, लेफ्टनंट-कर्नल, िवग कमांडर, कॅप्टन, कर्नल आणि ग्रुप कॅप्टन हे हुद्दे तेरा किंवा पंधरा तोफ सलामींच्या संस्थानिकांना मिळत. अल्पवयीन युवराज, राजघराण्याच्या धाकटय़ा पातीतील नातलग यांना स्क्वॉड्रन लीडर, मेजर, फ्लाइट लेफ्टनंट, कॅप्टन इत्यादी थोडय़ा कनिष्ठ श्रेणीचे हुद्दे मिळत. कोणत्याही युद्धावर मर्दुमकी न गाजवताही केवळ ब्रिटिशांशी निष्ठांवत राहिल्यामुळे राजघराण्यातल्या नातलगांना वरीलप्रमाणे हुद्दे मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. ब्रिटिश साम्राज्यातील अन्य वसाहतींच्या कचेऱ्यांवरही मोठय़ा पदावर त्यांची नियुक्ती होई.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2015 12:21 pm

Web Title: curiosity yarn manufacturing history and evolution
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: सूतनिर्मितीचे तंत्र -२
2 कुतूहल: सूतनिर्मितीचे तंत्र
3 सिरॅमिक तंतू
Just Now!
X