जैवविविधता किंवा जीविधता म्हणजे सजीव सृष्टीतील विविधता होय. इ. स. १९६८ मध्ये ‘बायोडाव्हर्सिटी’ या शब्दाचा प्रथम प्रयोग रेमंड एफ. दासमान या वन्यजीव अभ्यासकाने त्यांच्या एका पुस्तकात केला. यानंतर ही अत्यंत व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना प्रकाशझोतात आली. जीविधता मुख्यत्वे तीन प्रकारांमध्ये ती आढळून येते – जनुकीय विविधता, प्रजातीय विविधता आणि परिसंस्थिकीय विविधता.

समुद्राच्या तळापासून ते माणसाच्या जठरापर्यंत. मोठय़ा व्हेल माश्यापासून ते नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांपर्यंत जीविधता सर्वत्र आहे. छोटय़ाशा मुंगीपासून ते अजस्त्र हत्ती पर्यंत सर्व सजीव एकाच जंगलात आनंदाने राहतात. याचे कारण म्हणजे निसर्गाने प्रत्येक सजीवाला एक कार्य ठरवून दिले आहे, त्याप्रमाणे त्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. याला ठ्रूँी (नीश) असे म्हणतात. ‘नीश’ म्हणजेच त्या सजीवाची त्या परिसंस्थेतील भूमिका होय. यामध्ये तो काय खातो, कुठे राहतो, कुठे प्रजनन करतो तसेच त्याचा इतर प्रजातींसोबत काय संबंध आहे या सर्व बाबींचा समावेश होतो. या भूमिकेचा आदर राखूनच प्रत्येक सजीव जगत असतो. निसर्गातील अन्नसाखळ्या व अन्नजाळी सुद्धा यानुसारच घडत असतात.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

जंगल परिसंस्थेचा विचार केल्यास सर्वात वरच्या जागेवर वाघ आहे. या प्रजातीला अम्ब्रेला स्पीशिज किंवा ‘अ‍ॅपेक्स प्रिडेटर’ म्हणतात. ज्या जंगल परिसंस्थेमध्ये वाघाचा समावेश आहे, तिच्यातील सजीवांचे प्रमाण अतिशय योग्य असते. त्यातील सजीव हे त्या परिसंस्थेच्या वहनक्षमतेएवढेच (कॅरिइंग कॅपॅसिटी एवढेच) असतात. अशाप्रकारे व्यवस्थित नियोजन करून निसर्गाचे हे कार्य चाललेले असते. परंतु यामध्ये मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर झाल्यास ही साखळी बिघडते व निसर्गाचे संतुलन ढासळायला सुरुवात होते.

परिसंस्थेशी विशिष्ट अंतर ठेवून राहणे आजच्या काळात तरी शक्य नाही. आपण फक्त आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या जीविधतेचा आदर करायला हवा. यामुळे तेथील वनस्पती प्राणी पक्षी कीटक यांचे संवर्धन होण्यास थोडा का होईना हातभार नक्कीच लागेल व तेथील जीविधता अबाधित राहील.

– सुरभी वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org