धुळीचे प्रदूषण कारखाने, बांधकाम, रस्त्यावरचे चौक यांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर आढळते. धुळीचे कण दोन आकारांत विभागले आहेत. २.५ आणि त्यापेक्षाही कमी मायक्रॉन व्यासाचे आणि थोडे मोठे म्हणजे १० मायक्रॉनपर्यंतच्या व्यासाचे. हे कण हवेपेक्षा जास्त वजनाचे असल्याने गुरुत्वाकर्षणामुळे भूपृष्ठावर स्थिरावतात, पण त्यातील २.५ मायक्रॉन आणि लहान आकाराचे कण जास्त हलके असल्याने हवेत जास्त काळपर्यंत तरंगत राहतात. असे तरंगताना माणसाच्या श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात आणि खोकल्यापासून क्षयापर्यंत रोगास कारणीभूत ठरतात.
धुळीमुळे सिलीकॉसीस, अस्बेस्टोसीसच्या कणामुळे आणि कापडाच्या धाग्यामुळे फायब्रोसीस असे फुफ्फुसाचे रोग होतात. क्वचितप्रसंगी असे आजारपण कॅन्सरवर पोहोचल्याची उदाहरणे आहेत.
हवेतील ही धूळ कमी करण्याचा एक स्वस्त असा उपाय म्हणजे वनस्पतीच्या पानांचा धूलिकण स्थिरावण्यासाठी उपयोग करणे. यासाठी झाडाची पाने जमिनीस समांतर असल्यास जमिनीच्या दिशेने जाणारे कण पानांवर स्थिरावतात. पानातून बाष्पाचे उत्सर्जन होत असल्याने पाने ओलसर असल्यास धुळीचे कण पानाला चिकटून बसतात. हवेतील धूळ पानावर थांबल्याने त्या प्रमाणात हवेची शुद्धता सुधारते. झाडावर जेवढी पाने जास्त तेवढय़ा प्रमाणात हवेतील धूळ कमी होते. पानांवर सूक्ष्म केस अथवा खवले असतील तर उत्तमच, कारण पानावर स्थिरावलेली धूळ घसरून पुन्हा हवेत येत नाही. पानाचा देठ आखूड आणि जाड असेल तर पानावर साठलेल्या धुळीच्या वजनामुळे पान तुटून पडत नाही.
साठलेल्या धुळीच्या थरामुळे पानाचे, पर्यायाने झाडाचे नुकसान होऊ शकते. उन्हाच्या उष्णतेची तीव्रता वाढून पान करपते. धुळीचे कण काढून टाकताना पानाच्या पृष्ठभागास इजा होते.
मोठी, पसरट, जाड, आखूड देठाच्या आणि पृष्ठाभागावर लव असलेल्या शेकडो पानांनी बहरलेला सदाहरित आणि सर्वत्र आढळणारा वृक्ष म्हणजे वड.
पावसाळा संपल्यापासून धूळ पानावर साठत राहते. ऑक्टोबर ते मे या काळात वडाच्या पानावर पडलेली धूळ दरमहा वाढत गेल्याची नोंद झाली आहे. साधारणपणे दहा मीटर उंच आणि दहा मीटर व्यासाचा पानांचा पसारा असलेल्या वडाच्या झाडावर मे महिन्यापर्यंत कित्येक किलोग्राम धूळ स्थिरावली असल्याचे मोजले गेले आहे.
– प्रा. शरद चाफेकर , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
धूलिकणांमुळे आच्छादलेली वडाची पाने

 

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

नागर आख्यान – रोमचे कलावैभव
१०५ वस्तुसंग्रहालये आणि ३००हून अधिक कलादालने असलेल्या रोमच्या प्रमुख रेल्वे स्टेशनबाहेर जतन करून ठेवलेला १५०० वर्षांपूर्वीच्या सíव्हयन वॉल या िभतीचा तुकडा रोमच्या समृद्ध कला परंपरांचा इतिहास सांगण्यासाठीच उभा आहे असे वाटते. युरोपियन पुनरुत्थाच्या कालखंडात पोपच्या प्रोत्साहनामुळे रोमच्या कलाविश्वात चित्रकला, शिल्पकला, वास्तुरचना, धातुशास्त्र आणि संगमरवर, हस्तीदंत, काचेवरील कोरीव कामात मोठा विकास झाला. या काळात लिओनार्दो द व्हिन्सी (१४५२-१५१९), मायकेल अ‍ॅन्जेलो (१४७५-१५६४), राफेल (१४८३-१५२०), बाíननी (१५९८-१६८०) सारख्या चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, शरीरशास्त्र अभ्यासक, तंत्रज्ञांच्या कलाकृतींनी रोमचं कलाविश्व समृद्ध झालंय. जुने रोम म्हणजे रोमन फोरम काय किंवा पिआल्झा व्हेनिझिया या चौकातील व्हिक्टर इम्यानुएलच्या संगमरवरी स्माारकापासून सुरू होणाऱ्या नव्या रोममध्ये काय, सर्वत्र सुंदर कारंजी, पुतळे, ओबेलिस्क, भव्य चौक आणि व्हॅटिकन म्युझियममधील अप्रतिम कलाकृती या कलाकारांच्या कामगिरीची साक्ष देत उभे आहेत.
रोम शहरांतर्गत असलेला देश म्हणजे व्हॅटिकन सिटी स्टेटमधील सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टाइन चॅपेल आणि म्युझियममध्ये रोमचे हे सारे कला सांस्कृतिक वैभव एकवटले आहे! बाíननी या वास्तुविशारदाने चर्चच्या प्रमुख वेदीवर बांधलेले ब्राँझचे शंभर फूट उंचीचे ‘बाल्डकीनो’ म्हणजे छत्र (मेघडंबरी) आणि त्याचे ओतीव ब्राँझचे पिळाचे खांब हा धातुशास्त्रीय चमत्कारच होय. इथे असलेल्या पुतळ्यांच्या कलादालनातील असंख्य, प्रमाणबद्ध पुतळ्यांपकी मायकेल अ‍ॅन्जेलोने घडवलेले ‘पिएता’ हे मेरी आणि येशूचे संगमरवरी शिल्प अजरामर झाले. तसेच अपोलो, हक्र्युलीस, लाओकून ही विशेष लक्षणीय शिल्पे आहेत. व्हॅटिकन म्युझियमच्या १५ चित्रदालनांमधील राफेल, लिओनार्दो, टिशन यांसारख्या दिग्गज कलाकारांची असंख्य, अप्रतिम चित्रकृती हे रोमचे वैभवच म्हणावे लागेल. परंतु रोमच्या कला इतिहासातला सुवर्ण कळस म्हणता येईल अशा कलाकृती म्हणजे मायकेल अ‍ॅन्जेलोने सिस्टाइन चॅपेलच्या छतावर आतून चितारलेल्या ‘द लास्ट जजमेंट’ आणि ‘द क्रिएशन’ या अजरामर कलाकृती! या कलाकृतींमुळे मायकेल अ‍ॅन्जेलो हा एक दंतकथा बनला!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com