पेट्रोलियम इंधने आणि वंगणे ज्वालाग्राही असतात. त्यातच, इंधने ही कमी उत्कलिबदू असलेल्या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतात. त्यामुळे त्यांची ज्वलनशीलता तीव्र स्वरूपाची असते. हे पदार्थ साठविताना व त्यांची वाहतूक करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची ज्वालाग्राहकता मोजण्यासाठी ‘भडकाबिंदू’ (फ्लॅश पॉइंट) ही चाचणी वापरली जाते. ज्या कमीत कमी तापमानाला पदार्थापासून तयार झालेले वायू व सभोवतालच्या हवेचे मिश्रण हे छोटय़ा ज्वालेच्या संपर्कात येताच पहिली क्षणजीवी ज्वाला (फ्लॅश) मिळते त्या तापमानाला त्या पदार्थाचा भडकाबिंदू म्हणतात. त्यानंतर तापमान वाढवले तर सतत जळणारी ज्वाला मिळते व तो ‘आगिबदू’ (फायर पॉइंट) असतो.

ज्वालाग्राही पेट्रोलियम पदार्थाचे वर्गीकरण करण्यासाठी फ्लॅश पॉइंट ही चाचणी वापरली जाते. ज्या पदार्थाचा फ्लॅश पॉइंट २३ अंश सेल्सियस तापमानाच्या खाली असतो, ते पदार्थ ‘अ’ वर्गात मोडतात. ज्यांचा फ्लॅश पॉइंट २३ अंश सेल्सियस ते ६५ अंश सेल्सियसच्या दरम्यान असतो ते पदार्थ ‘ब’ वर्गात गणले जातात आणि ६५ ते ९३ अंश सेल्सियस तापमानाला फ्लॅश पॉइंट असलेले पदार्थ ‘क’ वर्गातील असतात. ‘अ’ वर्गातले पदार्थ धोक्याचे असतात. उदा. पेट्रोल आणि नाफ्था. डिझेल व केरोसिन ‘ब’ वर्गात येतात. फन्रेस तेल ‘क’ वर्गात मोडते. वंगण तेलांचे फ्लॅश पॉइंट उच्च असतात व ती कमी धोक्याची असतात, मात्र एखाद्या पदार्थात कमी उत्कलनाच्या इंधनाची मिसळ झाली तर त्याचा फ्लॅश पॉइंट खाली उतरतो आणि ते धोक्याचे असते.

How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

१९८५ मध्ये कोची येथे केरोसीन (घासलेट) स्टोव्हमध्ये पम्प करताना ३५ जण दगावले होते, कारण त्या घासलेट तेलात नाफ्था ह्य़ा ज्वालाग्राही द्रावणाची मिसळ झाली होती. तसेच १९९२ साली कोटा येथे केरोसीनच्या पाइपलाइनमध्ये चुकून पेट्रोल मिसळले गेले होते. हे केरोसीन स्टोव्हमध्ये वापरल्याने भडका उडून ५२ जण दगावले होते.

प्रयोगशाळेत पदार्थाचे भडकािबदू मोजण्यासाठी तीन प्रकारची उपकरणे वापरतात. अ‍ॅबलचे बंद भांडय़ाचे उपकरण, पेंस्कीमार्टनिचे बंद भांडय़ाचे उपकरण आणि क्लेवलँडचे उघडय़ा भांडय़ाचे उपकरण. साधारणपणे ५० अंश सेल्सियसपर्यंतचे फ्लॅश पॉइंट तपासण्यासाठी अ‍ॅबलचे उपकरण, १५० अंश सेल्सिअसपर्यंत पेंस्कीमार्टनिचे आणि त्यावरच्या फ्लॅश पॉइंट असलेल्या पदार्थासाठी क्लेवलँडची उपकरणे वापरली जातात.

– जोसेफ तुस्कानो मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : सुभाष मुखोपाध्याय – विचार

मी जे काही लिहीत असे ते चांगलं गद्य असे. हे बघून काही आसपासची मंडळी म्हणू लागली – ‘‘तू लेखक झालास; आता तुला कवी व्हावं लागेल.’’ त्या काळात पद्यात काही रचना केल्याशिवाय त्याला कवी समजत नसत. कवीचं स्थान लेखकापेक्षा चार हात उंच समजलं जाई. त्यानंतर खूप प्रयत्नाने मी कवी झालो. एकंदरीत माझं जीवन गद्य-पद्यांच्या लाटांवर तरंगत राहिलेलं आहे. माझी ही धाव मला कुठपर्यंत घेऊन आलीय- हे मला माहिती नाहीये.

कोणतीही रचना कुणी तरी समजून घेतल्यावरच तिचं सार्थक होतं. या ‘कुणी तरी’मध्ये श्रोता आणि वाचक यांचा समावेश होतो. यांच्याशिवाय साहित्य व्यवहाराला पूर्णत्वच येत नाही, कारण त्याच्या रचनेत त्यांचीही भागीदारी असते. म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार मी माझ्या वाचकांबरोबर शेअर करू इच्छितो; पण या पुरस्काराबरोबर मिळणारी रक्कम जर मी माझ्या वाचकांना वाटू लागलो तर माझ्यासाठी एक फुटकी कवडीही उरणार नाही. त्यामुळे माझे वाचक या आनंदात भावनिकदृष्टय़ा सहभागी झाले तर मी माझ्या वाटचालीत यशस्वी होऊ शकेन.

ज्ञानपीठाने ज्या भाषांना आतापर्यंत पुरस्कृत केलं आहे त्या सर्व भाषेचे लोक या शहरात सापडतील. आपलं घरदार उद्ध्वस्त झाल्यावरही मला इथे आश्रय मिळाला. हा उद्ध्वस्त देश विराट आहे. याचं भविष्य आणि वर्तमान हे सगळं माझं आहे. आम्ही आमच्या भाषेत रमलो आहोत. हिंदीच्या नौकेत बसून आम्ही बाजारहाट करतो, तीर्थयात्रेला जातो. मी या शहराच्या ‘आरशात’ सगळ्या देशाचा चेहरा बघतो. ज्यांनी खूप कष्टाने कोलकाता शहराला मोठं केलं त्यांना इथल्या पार्कात, मैदानात, जलाशयात डोकं ठेवण्याइतकी जागाही उरलेली नाही. पैशाच्या थैल्यांनी या जागा बळकावल्या जाताहेत. या शहराची अधोगती थांबवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

सुरुवातीच्या काळात कवी हे समाजाचे नायक असत. सगळा देश नव्या शताब्दीकडे आशेने पाहातोय. आमच्यासारख्या ३/४ आयुष्य जगून झालेल्या लोकांचं काळीज धक्धक् करतंय.. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं असं मला वाटतंय.. कवींच्या जादूवर आता लोकांचा विश्वास उरलेला नाही. आता तुम्हाला त्यांचा विश्वास वाटू लागेल, अशी मी आशा करतो.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com