02 July 2020

News Flash

कुतूहल : मूग

कडधान्याचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुगाची ओळख लहान-थोरांपर्यंत सर्वाना आहेच.

कडधान्याचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुगाची ओळख लहान-थोरांपर्यंत सर्वाना आहेच. मूग हे मूलत: भारतीय कडधान्य असून आता संपूर्ण जगभर पसरले आहे. हिमालयात जंगली अवस्थेत मुगाच्या प्रजाती आढळतात. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ‘विग्ना रेडिएटा’ असे आहे. इंग्रजीत या वनस्पतीला ‘ग्रीन ग्राम’ असे नाव आहे. आपल्याकडे हिरवे, पिवळे आणि काळे अशा तीन प्रकारचे मूग प्रामुख्याने दिसून येतात. शास्त्रीयदृष्टय़ा मुगाचे तीन-चार प्रकार आहेत. रेडिअ‍ॅटा जातीच्या मुगाच्या झुडपाची पाने गर्द हिरवी असतात, शेंगा पसरट असतात. शेंगांतील दाणे हिरवे असतात. अ‍ॅरिया जातीच्या मुगाची पाने फिकट-हिरवी असून बाहेरच्या बाजूला वळलेल्या शेंगांमधील दाणे पिवळे असतात. ग्रॅडिस या अजून एका जातीच्या मुगाची पाने मध्यम हिरव्या रंगाची असतात आणि काळ्या रंगाचे दाणे असतात. एवढेच नाही तर तपकिरी रंगाचे दाणे असलेल्या मुगाची जातसुद्धा आहे.
ही वनस्पती साधारण ५० ते १२० सेमी उंच वाढते. पाने संयुक्त आणि त्रिदलीय प्रकाराची असतात. फुले लहान पिवळी किंवा पिवळसर हिरवी असतात. या फुलांच्या पाकळ्यांची रचना पतंगाच्या आकाराची असते. ही फुले झुपक्यात येतात. याच फुलातून पुढे झुपकेदार शेंगा येतात. शेंगाची लांबी ५ ते १० सेंमी एवढी असते. शेंगांतील हिरवे, पिवळे, काळे मूग अत्यंत पौष्टिक असतात. मुगाच्या सालात ‘ए’ आणि ‘बी’ व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियम मोठय़ा प्रमाणात असते. म्हणूनच अख्खे मूग खाणे केव्हाही चांगले. मुगामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त आहे. ही प्रथिने पचायला हलकी असतात. या प्रथिनांमुळे शरीराला आवश्यक अशी अमायनो आम्ल सहजपणे मिळतात. मलावरोध आणि जुलाब अशा दोन्हीही स्थितीमध्ये मूग उपयोगी आहेत. तसेच कफ, पित्त, वात अशा विकारांवर मूग उपयुक्त आहेत. गळ्याच्या विकारात जेव्हा गिळणे त्रासदायक होते तेव्हा मुगाचे पाणी दिल्यास हा त्रास कमी होतो.
एकूण काय, मूग गिळून गप्प बसणे हे लौकिकदृष्टय़ा चांगले असते. तसेच मुगाचे विविध खाद्यपदार्थ तयार करून खाणे आरोग्यदायीच आहे.
– डॉ. मनीषा करपे, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नगराख्यान : ब्राँडेनबर्गचे साम्राज्य
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीस जर्मनीत स्थापन झालेल्या ब्राँडेनबर्गच्या साम्राज्याचा राज्यकाळ इ.स. ११५७ ते १८०६ असा झाला आणि त्यापकी या राज्याची राजधानी इ.स. १४५१ ते १७०१ या काळात बर्लीन मध्ये राहिली. बर्लिनमध्ये पुढे झालेल्या प्रत्येक सत्तांतरामध्ये बíलन हेच त्या राज्याचे मुख्यालय आणि राजधानीचे शहर बनून राहिले. ब्राँडेनबर्गच्या साम्राज्यानंतर बर्लीनवर प्रशियन राज्य, जर्मन साम्राज्य, वीमर प्रजासत्ताक, तिसरे राईश, विभक्त पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी आणि सध्याचे, १९९० साली स्थापन झालेले फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे सरकार या सर्वाचे मुख्यालय बर्लीन शहरातच राहिले. १४०० साली बर्लीन आणि कौल्न या जोड गावांचा समावेश ब्राँडेनबर्ग येथील माग्र्राव्हिएट घराण्याच्या राज्यक्षेत्रात झाला. १४४२ साली या जोड गावांची लोकसंख्या आठ हजार होती. पुढे १४४२ साली ब्रांडेनबर्गचा राजा फ्रेडरिक द्वितीय याने बíलन आणि कौल्न ही गावे एक करून झालेल्या शहराचे नाव बर्लिन केले. १४५१ साली राजा सिसेरो याने बíलनमध्ये आपले निवासस्थान तयार करून बर्लिन हेच आपले मुख्यालय केले. १६७१ मध्ये बर्लीमध्ये प्रथमच ज्यू समाजाची काही कुटुंबे स्थलांतरित झाली. फ्रान्स आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये धार्मिक कारणांमुळे छळ झालेल्या अनेक कुटुंबांनी बर्लीन आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात स्थलांतर केले. त्यामुळे १७०० साली बर्लीनची लोकसंख्या २२ हजारांवर पोहोचली. त्यामध्ये ज्यू समाज एक हजार होता. लोकसंख्या वाढल्यावर व्यापार उदीम वाढून आíथक सुबत्ता आली. १७०१ साली ब्रांडेनबर्गचे राज्य, प्रशियाचे राज्य म्हणून ओळखले जाऊन फ्रेडरिक प्रथम हा प्रशियाचा पहिला राजा झाला.
– सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2016 1:14 am

Web Title: greengram
टॅग Navneet
Next Stories
1 ब्रांडेनबुर्ग ते बíलन
2 कुतूहल – सीता अशोक
3 न्यूयॉर्कची भरभराट
Just Now!
X