नाऊरु बेटावर फॉस्फेट मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खाणकाम झाल्यामुळे तेथील सर्व वस्ती शेजारच्या बेटावर हलविण्याचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने ठेवला. तो प्रस्ताव स्वातंत्र्यवादी नेते हॅमर डिरॉबर्ट यांनी नाकारलाच परंतु त्याच वेळी त्याने नाऊरुला पूर्ण स्वातंत्र्य, सार्वभौमत्व देण्याची मागणी सुरू केली, आणि त्यासाठी चळवळ सुरू केली. पुढे या चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटन या विश्वस्तांनी नाऊरुच्या नेत्यांशी एका करारान्वये १९६८ साली नाऊरुला स्वातंत्र्य देत असल्याची घोषणा केली. हॅमर डिरॉबर्ट यांना या नवदेशाचे प्रथम राष्ट्राध्यक्षपद दिले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन फॉस्फेटच्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून नाऊरु फॉस्फेट कॉर्पोरेशनमार्फत त्याची निर्यात केली आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. अर्थव्यवस्था मजबूत झाली. परंतु विसाव्या शतकाच्या अखेरीस नाऊरुतले फॉस्फेटचे साठे संपत आले. १९८९ मध्ये नाऊरुने आंतरराष्ट्रीय न्यायालयात, ‘‘ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी नाऊरुचे अर्धेअधिक साठे स्वत:साठी वापरून आणि युरोपात विकून नाऊरुच्या साधन संपत्तीचे, पर्यावरणाचे नुकसान केले,’’ या आरोपाखाली खटला भरला. या तीन देशांनी नाऊरुला फॉस्फेटच्या नुकसानभरपाई पोटी १०.७ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याचा करार करून कोर्टाबाहेर हे प्रकरण आपसात मिटविले. परंतु संपत आलेले फॉस्फेटचे साठे, थोडीशी नारळाची निर्यात व मच्छीमारी याशिवाय उत्पन्नाचे साधन नसलेल्या नाऊरुची आर्थिक परिस्थिती सध्या अगदीच हलाखीची झाली आहे. त्यात भर म्हणून राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक गैरव्यवहार जोडीला आहेत. २००१ पासून प्रजासत्ताक नाऊरू ऑस्ट्रेलियाकडून मोठी आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत घेत आहे. प्रजासत्ताक नाऊरु राष्ट्रकुल परिषद आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलिया देत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात त्यांच्याकडे येत असलेल्या राजकीय, धार्मिक आश्रयार्थीच्या पुनर्वसनाचे ठिकाण म्हणून नाऊरुचा वापर करत आहे. फक्त ११००० लोकवस्तीच्या या प्रजासत्ताक नाऊरुमध्ये ९६ टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत आणि तेथील सरकारी भाषा इंग्रजी असली तरी त्यांची नाऊरुवन ही स्थानिक भाषा सर्वत्र बोलली जाते.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?