14 August 2020

News Flash

नीळ

नीळ

काही वनस्पती इतिहास घडवितात त्यापकीच नीळ वनस्पती होय. नीळ उत्पन्न करणाऱ्या वनस्पतींपासून रंग तयार करावयाचा आणि त्यापासून सुती रेशमी यावर डिझाइन काढणे, लोकरी कापड, रबर रंगवणे,  छपाईची शाई, तलरंग तयार करणे यासाठी प्राचीन काळापासून निळीचा उपयोग केला जात असे. या निळीचा रंग आकर्षक व पक्का असून वारंवार धुण्याने अथवा सूर्यप्रकाशाने तो निघून जात नाही. पूर्वी जगाला लागणाऱ्या एकूण निळेतली ६०% नीळ भारतातून निर्यात केली जात असे. पुढे कृत्रिमरीत्या जरी नीळ बनवण्यात आली तरी त्याला  नसíगक निळेची सर नाही. नीळ उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी युरोपियन मळेवाल्यांविरुद्ध मोठे बंड केले. ते निळेबंड किंवा ब्लू म्यूटिनी म्हणून प्रसिद्ध आहे. नीळ ही वनस्पती वर्षांयू असून भारतात सर्वत्र आढळते. या वनस्पतींचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा अ‍ॅरेक्टा असे आहे. ही वनस्पती लेग्यूमिनोसी कुळातील असून झुडूप प्रकारातील आहे. याची पाने चिंचेच्या पानाप्रमाणे परंतु आकाराने थोडी मोठी असतात. फुले गर्दगुलाबी रंगाची, झुपक्याने येणारी अशी असतात. फळे गोलसर, गुळगुळीत असतात त्यात ४ ते ५ बिया असतात. त्यांच्या पानांची आणि फळांची भाजी करतात.  ही वनस्पती रंगांसाठी जेवढी प्रसिद्ध तेवढीच औषधासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. ती उत्तम रेचक, कफ व जंतनाशक आहे. पाने चक्कर येणे एपिलेप्सी आणि मज्जासंस्थेच्या विकारात वापरतात. वेदना कमी करणे, कीटकदंश दातदुखी सूजकमी करणे यासाठीही पाने वापरतात. अल्सरचे दुखणे, पेप्टिक अल्सर, घामोळी, उष्णतेचे विकार यावरही पानांचा रस, अर्क अथवा काढा वापरतात. मनावरील ताण कमी करणे, मूत्रविकार, गर्भपातविरोधक, मधुमेह, कावीळ, पोटातील आजार यावरही ही वनस्पती वापरतात. हिरडय़ांचे विकार, पायोरिया, पोटातील कृमी नष्ट करणे. नेत्रविकार यावर ही भारतीय वनस्पती गावागावांत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरली जाते. ही वनस्पती काही विशिष्ट प्रकारच्या पतंगांचे खाद्य आहे. अन्न म्हणून याची पाने वापरतात. रेशीम मिळवण्यासाठी ही पाने वापरली जातात. अशी ही रंग, अन्न, औषध देणारी नीळ वनस्पती भारतात सर्वत्र आढळते.

– मृणालिनी साठे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

रोमन लिपी आणि रोमन कॅलेंडर

जगातील मुळाक्षरांच्या लिपी पद्धतींपकी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या लॅटिन लिपीलाच रोमन लिपी असे नाव आहे. सीरिया आणि पॅलेस्टाइन प्रदेशात इ.स.पूर्व ११००मध्ये या लिपीचा उगम झाला. एट्रस्कन या रोमच्या मूळच्या रहिवाशांनी या लिपीचा वापर सुरू केला. सुरुवातीच्या लॅटिन लिपीची २३ मुळाक्षरे होती. २३ लॅटिन मुळाक्षरांमध्ये काही बदल होत गेले. ‘आय’ अक्षरावरून ‘जे’ हे अक्षर, ‘व्ही’ अक्षरावरून ‘यू’ आणि ‘व्ही’वरूनच ‘डब्ल्यू’ तयार झाले. अशा तऱ्हेने सध्याची इंग्रजीतील २६ मुळाक्षरे तयार झाली. प्राचीन रोमन लिपीत लिखाणाच्या दोन पद्धती आहेत. कॅपिटल आणि कर्सिव्ह आणि पुढे पंधराव्या शतकात गोल वळणाची सरळ अक्षरे पुस्तकांच्या लिखाणासाठी वापरली जाऊ लागली तर टोकदार इटालियन अक्षरे व्यापारी आणि कायदेशीर दस्तऐवजांसाठी वापरात आली.

आता रशियन भाषेसहित अनेक युरोपीय देशांनी किरकोळ बदल करून रोमन लिपीचाच वापर त्यांच्या भाषेसाठी केलाय. युरोपीय देशांशिवाय टर्की, इंडोनेशिया, व्हिएतनाम, स्वाहिली या देशांमधील स्थानिक भाषांसाठीसुद्धा रोमन लिपीचाच वापर केला जातो. इतर अनेक गोष्टींप्रमाणे जगातील बहुतेक लोकांनी रोमन पद्धतीची कालगणना, बारा महिन्यांचे वर्ष, महिन्यांची नावे यांचा स्वीकार केलाय. इसवी सनापूर्वी रोमन वर्षांचे दहाच महिने होते. ज्युलियस सिझर आणि नंतरच्या सम्राटांनी केलेल्या बदलानंतर सध्याचे कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडर या नावाने ओळखले जाते. दहा महिन्याच्या कॅलेंडरमधील ‘मार्टयिस’ हा पहिला महिना मार्स या युद्धदेवतेच्या नावावरून होता. आता मार्टयिसचा मार्च झालाय. पुढचे एप्रिलिस, मायस, ल्युनियस हे महिने विविध देवतांच्या नावावरून होते. पुढचे उरलेले सहा महिने त्यांच्या क्रमांकांनी ओळखले जात. ते असे क्यून्टिलिस (पाचवा), सेक्सटिलिस (सहावा), सप्टेंबर (सातवा), ऑक्टोबर (आठवा), नोव्हेंबर (नववा), डिसेंबर (दहावा). सिझरने जानुआरियस (प्रवेशद्वाराची देवता) वरून जानेवारी आणि फेब्रुआरियस (पवित्र होण्याचा दिवस) वरून फेब्रुवारी हे दोन महिने वाढवून बारा महिन्यांचे वर्ष केले. पुढे लोकांनी क्यून्टिलिस या महिन्याचे नाव बदलून ज्युलियस केले व पुढे त्याचे जुल झाले. सेक्सटिलिसचे नाव ऑगस्ट झाले, ल्यूनियसचे जून झाले.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2016 4:46 am

Web Title: indigo plant
Next Stories
1 आधुनिक रोम शहर प्रशासन
2 डॉ. अर्देशिर दमानिया
3 कुतूहल – धूळ आणि वड
Just Now!
X