१७७१-१७७५ चा तो काळ! जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल विल्यम शील – दोघेही शास्त्रज्ञ – स्वतंत्रपणे एकाच वायूविषयी संशोधन करत होते. जोसेफ प्रिस्टले, एक रसायनशास्त्राची आवड असलेला धर्मोपदेशक. जोसेफ प्रिस्टलेने मक्र्युरी ऑक्साइडच्या द्रावणाला भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणे एकवटून उष्णता दिली. उष्णतेमुळे मक्र्युरी ऑक्साइडचे विघटन होऊन त्याचे पाऱ्यात रूपांतर झाले आणि एक वायू बाहेर पडला. प्रिस्टलेने वायूचे गुणधर्म तपासताना मेणबत्तीची ज्योत वायूजवळ आणली. ही ज्योत जास्त प्रखरतेने जळत आहे असे त्याच्या निदर्शनास आले. हा वायू ज्वलनास मदत करणारा वायू आहे याची त्याने नोंद घेतली. ही घटना ऑगस्ट १७७४ मधली!

वनस्पतींपासून मिळणारा वायू आणि मक्र्युरी ऑक्साइडच्या विघटनातून बाहेर पडलेला वायू हा एकच आहे, असा निष्कर्ष प्रिस्टलेने काढला. तसेच या वायूचा प्राण्यांवर काय परिणाम होतो, ते तपासले. या वायूचे स्वत: श्वसन केले अन् हा वायू आणि हवा यात साधर्म्य असल्याचे प्रिस्टलेला आढळले. श्वसन करताना हाच वायू शरीरात घेतात हे सिद्ध केले. हे प्रयोग होते १७७४-७५च्या सुमारास केलेले!

paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

‘कार्ल शील’ने खरे तर, १७७१-७२ मध्येच पोटॅशियम नायट्रेट आणि मक्र्युरी ऑक्साइड यांना उष्णता देऊन ऑक्सिजन वायू प्रथम शोधला होता. हा वायू ज्वलनास मदत करतो याचा पुरावाही त्याने दिला होता. या वायूचे नाव ‘फायर एयर’ असे ठेवले होते; परंतु त्याचे हे संशोधन १७७७ मध्ये प्रसिद्ध झाल्याने ऑक्सिजन शोधाचा मान मात्र प्रिस्टलेला मिळाला. कार्ल शीलचे संशोधन १७७५ मध्ये प्रकाशित झाले होते.

याच दरम्यान फ्रेंच शास्त्रज्ञ ‘लॅव्होझिए’चेही प्रयोग सुरू होते. ज्वलनाची क्रिया होते तेव्हा वातावरणातील कोणता तरी एक वायू संयोग पावतो, असा त्याचा निष्कर्ष बरोबर होता. हाच वायू आम्ले तयार करण्यासाठी आवश्यक असतो हे आढळल्याने, आम्ले तयार करण्यास उपयुक्त म्हणून ‘लेव्होझिए’ने या वायूचे नाव ‘ऑक्सिस+ जीनस्’ अर्थात ‘ऑक्सिजन’ असे ठेवले.

शोधाचे अधिकृत श्रेय जरी ‘प्रिस्टले’ला मिळाले, तरी कार्ल शीलने आधी शोध लावला म्हणून त्याचेही नाव या संशोधनात घेतले जाते.

सुचेता भिडे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org