नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठय़ा प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठय़ा प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्य़ांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नसíगक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात. सी.एन.जी. जळत असताना कमी प्रमाणात बाष्पनिर्मिती होते व त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढीव असते व त्यामुळे वाहनाला वेग देण्याची क्षमता वाढते. वाहनाचा वेग घेण्याची क्षमता ठरविणारा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलचा ९१ (स्कूटर कार, रिक्षासाठी) आणि ९७ (महागडय़ा कारगाडय़ांसाठी) असतो, तर सी.एन.जी.चा तोच ऑक्टेन क्रमांक १३० पर्यंत जातो. यावरून, त्याची इंधनक्षमता लक्षात येईल. आपल्या देशातील जमिनीच्या पोटात सुमारे १३,००० कोटी घनमीटर इतका नसíगक वायू साठलेला आहे. त्यातील ७,००० कोटी घनमीटर वायू आपण सहज बाहेर काढू शकतो व गरजेनुसार वापरू शकतो. इंधनाच्या दृष्टिकोनातून १००० घनफूट नसíगक वायू हा सुमारे नऊ दशांश टन तेलाच्या तोडीचा असतो. तेव्हा, हा वायू पद्धतशीरपणे बाहेर काढला तर आपण लाखो टन तेलाच्या क्षमतेचा सी.एन.जी. मिळवू शकतो. हा वायू पेट्रोल व डिझेल तेलाच्याऐवजी वापरता येतो हे सिद्ध झाल्याने जगभरात त्याचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे लोण पसरले आहे, कारण या वायूंवर धावणाऱ्या वाहनांची इंधनक्षमता, पेट्रोलवर धावणाऱ्या आजच्या घडीला उत्कृष्ट इंजिनापेक्षा २० ते २५ पटीने जास्त असते.

 जोसेफ तुस्कानो (मुंबई)  मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

प्रबोधन पर्व: मराठी भाषेची स्थिती आणि गती

‘‘.. जसें झाड किंवा प्राण्याचें शरीर वाढतें, त्याप्रमाणें महाराष्ट्रभाषेची वाढ हल्लीं सुरू आहे. इकडे इंग्रजी विद्येचा आलीकडे फैलावा होऊं लागल्यापासून, नवे नवे विचार आपल्या भाषेंतील शब्दांनीं व्यक्त करण्याचें अगत्य पडूं लागलें आहे. तेव्हां या संधीस ही एक मोठय़ा विचाराची गोष्ट आहे कीं परकी भाषांतील शब्द आपल्या भाषेंत घ्यावें कीं नाहीत; व जर घ्यावें, तर ते कोणत्या प्रमाणानें घेतले पाहिजेत, वगैरे.. शेंकडो इंग्रजी शब्द आलीकडे आमच्या भाषेंतील शब्दांबरोबर खुशाल वावरूं लागले आहेत. देशाचा उदीम वाढण्याकरतां, ज्याप्रमाणें सर्व ठिकाणच्या व्यापाऱ्यांस व्यवहार करण्याची साऱ्या देशांत मोकळीक असते, त्याप्रमाणेंच अर्थवाहक जे शब्द, त्यांसही तशीच सर्वत्र सदर परवानगी असली पाहिजे. ती असली म्हणजे भाषेस शब्दप्राचुर्य, वैचित्र्य इत्यादि लाभच होणारे आहेत. इतकेंच मात्र कीं, ते शब्द भाषेवर शिरजोर होऊं देता कामा नयेत, व त्यांच्या योगानें भाषेची शिस्त न बिघडे अशी तजवीज ठेवली पाहिजे!’’
अशा प्रकारे विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेच्या भरणपोषणाविषयी सांगत तिच्या पुढील आव्हानेही स्पष्ट करतात -‘‘भाषेची अभिवृद्धि ही देशाच्या उत्कर्षांचें एक मोठेंच साधन असून तें प्रयत्नाधीनही बरेंच आहे.. हल्लींची स्वभाषेविषयीं उपेक्षाबुद्धि जोंपर्यंत लोकांच्या मनांत अशीच राहील तोपर्यंत कोणत्याही उपायास लवमात्रही यश येणार नाहीं.. पण जर ईश्वरी कृपेनें रोग्याच्या रोगाच्या मूळावर औषध पोचलें, तर त्याच्या अवयवांस आलेली ग्लानि दूर करण्यास जसा यत्किंचित्ही प्रयत्न नको; तद्वतच परभाषादूषणरूप जें क्षयाचें बीज आपल्या भाषेस लागून दिवसेंदिवस तीस खिळूं पहात आहे, तें जर कां एकदां दूर होईल, व विद्वानांची तिजकडे प्रवृत्ति होईल, तर तिच्या अभिवृद्धीस आरंभ झाला ह्मणून समजावें. पण हें जर होणार नाहीं, तर तिचा लय जितका लवकर होईल तितका बराच!’’

मनमोराचा पिसारा: शीनाचे मानसशास्त्र
मानसशास्त्राचा अभ्यास, मूलभूत संशोधन आणि त्याच्या उपयोजनांवरील विविध प्रकारची निरीक्षणं यांना गेल्या दीड-दोन दशकांमध्ये कलाटणी मिळालेली आहे. याची अनेक कारणं आहेत. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सातत्याने उलाढाली होत आहेत. जनसामान्यांची आयुर्मयादा वाढलेली आहे. अभिरुची आवडी-निवडीही बदललेल्या आहेत. त्यामुळे मानसशास्त्रानंही कात टाकली आहे.
आता मात्र मानसशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचा आयाम प्राप्त झालाय आणि मानसशास्त्राचे धडे अर्थतज्ज्ञ गिरवीत आहेत. त्यामुळे आता राजकीय मतप्रवाह आणि सामाजिक स्थित्यंतरांचा, अर्थधोरणांचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर कसा परिणाम होतो याचे मानसशास्त्रीय संशोधन सुरू आहे.
आज पुस्तकांच्या दुकानातले रकाने आणि शेल्फ या प्रकारच्या पुस्तकांनी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे मीही आता बिघडलेल्या मानसशास्त्राबरोबर जीवनाला नवे आकार आणि आयाम देणाऱ्या संशोधनात रस घेतोय.
‘द आर्ट ऑफ चूजिंग’ नावाचं पुस्तक आता चांगलं स्थिरावलं आहे. ‘गार्डियन’ या प्रतिष्ठित इंग्लिश वर्तमानपत्रानं या पुस्तकाविषयी ‘जीवशास्त्र, व्यापार आणि मानसशास्त्र’ यांच्याबद्दल असामान्य भाष्य करणारं हे पुस्तक आहे. यात माणुसकी जपणारी बौद्धिक क्षमता आणि मानसिक चिंतन यांचा रम्य मिलाफ आढळतो’ असं म्हटलंय.
पुस्तकाच्या लेखिका शीना अयंगार यांनी या पुस्तकात आत्मकथा सांगत सुरुवात केलीय. शिना भारतीय शीख वंशाच्या कॅनडास्थित तरुणी. जन्मही तिथलाच. तरी त्यांच्यावर शीख धर्माचेच संस्कार झाले; परंतु बालपणी असाध्य रोगामुळे दृष्टी गेली. अनेक विचित्र घटना आणि विलक्षण लोकांच्या वागणुकीचा परिणाम म्हणून त्यांचं जीवनमान बदललं. इथपर्यंत सारं काही ठिक वाटतं, पण शीना तिथे थांबत नाहीत.
आपल्या आयुष्यातल्या घटनांकडे त्या तीन प्रमुख विचार-दृष्टिकोनांतून पाहतात. पहिला दृष्टिकोन : माणसाचं जीवन नियती ठरविते. आपण आपल्याला वळण लावू शकत नाही, जे प्राक्तनात असतं तेवढंच मिळतं. आलिया भोगासी असावे सादर.
दुसरा दृष्टिकोन : आयुष्याला वळण लावणारे योगायोग हेच खरे. योगायोगाने माणसं भेटतात. आपण त्या योगायोगांचे नियंत्रण करू शकत नाही.
तिसरा दृष्टिकोन : आपल्या जीवनात विविध तक्र्य, अतक्र्य, असंभवनीय, संभवनीय घटना घडत असल्या तरी त्यांचा अर्थ कसा लावायचा, हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. म्हणजे जीवनात आपण सातत्याने चॉइस करीत असतो. आपण जगायचं कसं, हा त्यातला सर्वात मोठा चॉइस.. कदाचित ही गोष्ट अर्धा ग्लास रिकामा, अर्धा भरलेला, असा लोकप्रिय मानसशास्त्राची भलामण करणारा आहे, असा समज होईल; परंतु त्यांनी मानसशास्त्राला अशा रीतीने पातळ केलेले नाहीये. आपण एखादा निर्णय कसा घेतो, निर्णय घेण्याच्या क्षणी मानसिक स्थिती कशी असते यावर संशोधन केलेलं आहे. म्हणजे आपण निवडू शकतो हीच माणूस असल्याची महत्त्वाची खूण आहे, असं त्या आग्रहाने प्रतिपादन करतात. त्यामुळे आपण आपल्या निवडीचा अधिकार आणि सत्तेचा (पॉवर) कसा उपयोग करतो.. परिणामी आपलं जीवन कसं बदलतं यावर त्या भाष्य करतात. आशियाई, युरोपियन आणि अमेरिकन संस्कृती चॉइसकडे कशी बघते, हे सांगण्याकरिता त्या भारतीय लग्न पद्धतीचं विश्लेषण करतात. आपला पार्टनर आपण निवडतो हा विकसित व्यक्तिमत्त्ववाद तर या निर्णयात कुटुंब आणि समाज यांचा सहभाग हा समष्टीवाद!
शीना यांची भाषा अतिशय सहजसुंदर आहे. ‘टेड टॉक’वर त्यांची भाषणं ऐकल्यास पुस्तकं वाचणं अधिक आनंददायी होतं.
 डॉ.राजेंद्र बर्वे