‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ हे कवी बी यांचे एक सुंदर गीत; पण चाफा बोलायला आणि चालायला लागला तर? चाफा स्वत: चालत आपल्या जवळ येईल आणि भरभरून बोलेल; पण चाफ्याला असे करायची गरजच नाही. त्याचा सुगंध आपल्याशी बोलत असतोच.

वेगवेगळे सुगंध देणारे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार निसर्गात असतात.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

देवचाफा : जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा राहणारा देवचाफा. हा चाफा खुरचाफा या नावानेही ओळखला जातो. याचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia. हा मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणाऱ्या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते.

सोनचाफा : चाफ्याचा हा प्रकार अस्सल भारतीय. हा वृक्ष भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्य़ाद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो.   Michelia champaca हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात.

पिवळा चाफा : सोनचाफ्याचा भाऊ शोभेल असा वृक्ष. भारतात निलगिरी पर्वत, अन्नमलाई टेकडय़ांचा भाग या प्रदेशात प्रामुख्याने आढळतो. म्हणूनच    Magnolia nilagirica असे शास्त्रीय नाव त्याला देण्यात आले आहे. सोनचाफ्यापेक्षा या झाडाची फुले थोडी लहान आणि रंगाने पिवळट पांढरी असतात. फळे परिपक्व झाली की फळातून लालसर रंगाच्या बिया डोकावू लागतात. लालसर रंगाचे हे घोस आकर्षक दिसतात.

कवठी चाफा : कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila   हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातील हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते.

नागचाफा : नागचाफ्याचे शास्त्रीय नाव   Mesua ferre.   हा मूळचा श्रीलंकेतील. मसाल्याच्या पदार्थातील नागकेशर म्हणजेच नागचाफ्याच्या फुलातील केसर.

याशिवाय हिरवा चाफा, भुईचाफा असेही काही प्रकार चाफ्यामध्ये आहेत.

सुचेता भिडे (कर्जत)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

झार पीटर ग्रेट

क्रांतिपूर्व रशियाचा एक समर्थ राष्ट्रपुरुष अशी ओळख असलेल्या झार पीटर द ग्रेट याचा जन्म इ.स. १६७२ मध्ये मॉस्को येथे झाला. मागासलेपणा दूर करून रशियाला एक आधुनिक, प्रगतिशील पाश्चिमात्य जीवनशैलीचे राष्ट्र बनवण्याचे काम पीटर द ग्रेटने केले. वयाच्या दहाव्या वर्षी, १६८२ मध्ये पीटर गादीवर बसला. पुढच्या दहा वर्षांत विरोधकांना नेस्तनाबूत करून त्याने झार राजवटीची सूत्रे आपल्या हातात घेतली. तत्कालीन युरोपमध्ये रशियन लोकांना असंस्कृत, ग्रामीण आणि गलिच्छ समजण्यात येई. रशियाच्या बाल्टिक किनाऱ्यावर तेव्हा प्रबळ स्वीडनची सत्ता, तर काळ्या समुद्रावर तुर्काची सत्ता होती. पीटरने रशियन लोकांच्या मूलभूत जीवनपद्धतीत बदल करून पाश्चात्त्यीकरण करावयाचे ठरवले. त्यासाठी प्रथम त्याने युरोपियन पद्धतीची सुटसुटीत वस्त्रे लोकांना वापरावयास भाग पाडले, दरबारी लोकांना राजशिष्टाचार शिकविले. त्याने मॉस्कोत आणि आसपासच्या प्रदेशांत नव्या वस्तुनिर्मितीचे कारखाने सुरू करून शेतीसाठी तत्कालीन आधुनिक तंत्रज्ञान आणले, नवे कालवे खोदले. नवनवीन उद्योगधंद्यांना पीटरने प्रोत्साहन देऊन व्यवसाय शिक्षण शाळा सुरू केल्या. १७१२ साली पीटरने झार राजवटीची राजधानी मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्ग येथे नव्याने वसवलेल्या शहरात नेली. रशियाचे नाविक आणि लष्करी सामथ्र्य वाढविण्यासाठी पीटरने त्या काळी जहाजबांधणीत प्रगत असलेल्या हॉलंड, इंग्लंडमध्ये लफोर्त याच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेण्यासाठी तरुणांना पाठवले. दुसरे नाव घेऊन एक सामान्य मजुराप्रमाणे काम करण्यासाठी स्वत: पीटरही या मंडळात सामील झाला. अनेक प्रकारची तांत्रिक माहिती घेऊन जहाजबांधणीचे तंत्रज्ञ, कुशल कारागीर यांना मोठे पगार देऊन पीटरने रशियात आणले. रशियन बंदरांमध्ये जहाजबांधणी सुरू केली, लष्करी शस्त्रनिर्मिती सुरू केली. अल्पावधीतच रशियाचा तोंडावळा पीटरने बदलून ते एक प्रबळ, प्रगतिशील राष्ट्र बनवितानाच समाजही सुसंस्कृत आणि प्रगत बनवला. १७२५ साली पीटर द ग्रेटचा मृत्यू झाला. पुढे कम्युनिस्ट राजवटीतही पीटरचे नाव आदराने घेतले जात होते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com