18 September 2020

News Flash

कुतूहल – सूत-कताईपूर्व प्रक्रिया – भाग ४

िपजण विभाग (ब्लो रूम) ही सूतगिरणीमधील सूतकताई प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. जििनग मिलमध्ये तयार झालेल्या कापसाच्या गाठी सूतगिरणीत आल्यावर त्या गिरणीतल्या कापूस गोदामात ठेवल्या जातात.

| June 23, 2015 05:22 am

िपजण विभाग (ब्लो रूम) ही सूतगिरणीमधील सूतकताई प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. जििनग मिलमध्ये तयार झालेल्या कापसाच्या गाठी सूतगिरणीत आल्यावर त्या गिरणीतल्या कापूस गोदामात ठेवल्या जातात. यामध्ये विविध जातींच्या आणि गुणधर्माच्या कापसाच्या गाठींचा समावेश असतो. या गोदामातून दररोज गरजेनुसार विविध प्रकारच्या कापसाच्या गाठींची कताईसाठी निवड केली जाते. या निवडलेल्या गाठी िपजण विभाग आणल्या जातात आणि त्यांवर प्रक्रिया सुरू केली जाते.   िपजण विभागामध्ये कापसावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेचे मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.  गाठी ज्यामध्ये बांधल्या आहेत ते लोखंडी पट्टय़ा व कापड बाजूला काढून गाठी मोकळ्या करणे.
गाठीमधील कापूस िपजणे. कापसाच्या गाठींमध्ये कापूस हा मोठय़ा दाबाखाली घट्ट असा बसविलेला असतो. गाठीतल्या कापसाचा एक गठ्ठा आपण हाताने जर वेगळा करावयाचा प्रयत्न केला तर त्याचे वजन काही किलो इतके भरते. अशा मोठय़ा गठ्ठय़ातील कापूस मोकळा किंवा सुटा करून गठ्ठय़ाचे वजन व घनता कमी करणे हे िपजण विभागाचे प्रथम कार्य आहे. आधुनिक िपजण विभागातील यंत्रांमुळे या विभागामध्ये कापसाच्या गठ्ठय़ाचे वजन हे ०.१ मि. ग्रॅम इतके कमी केले जाते.
सूतगिरणीत येणाऱ्या गाठींमधील कापसामध्ये कापसाच्या तंतूंशिवाय अनेक पदार्थ मिसळलेले असतात. अशा पदार्थाचा सूतकताईसाठी काहीच उपयोग नसतो. याउलट हे पदार्थ जर कताई प्रक्रियेमध्ये सुतात गेले तर सुताचा दर्जा मोठय़ा प्रमाणावर खालावतो. त्यामुळे अशा पदार्थाना कचरा (ट्रॅश) असे म्हणतात. हे पदार्थ सूताची कताई होण्यापूर्वी कापसातून बाहेर काढणे गरजेचे असते. या क्रियेला कापसाची सफाई असे म्हणतात. िपजण विभागात सफाई प्रक्रियेची सुरुवात केली जाते. गिरणीत येणाऱ्या कापसात पूर्वी ५% पासून १२% पर्यंत इतका कचरा असे. आता कापूस वेचण्यामध्ये आलेली सतर्कता आणि जििनग प्रक्रियेत झालेले आधुनिकीकरण यामुळे कापसातील कचऱ्याचे प्रमाण हल्ली मोठय़ा प्रमाणावर कमी झाले आहे. आज गिरणीत येणाऱ्या कापसात कचऱ्याचे प्रमाण २% ते ४% इतके असते. कापसात येणाऱ्या कचऱ्यापकी सुमारे ५०% ते ८०% कचऱ्याची सफाई करण्याचे काम आजच्या आधुनिक िपजण विभागात केले जाते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – बडोदा राज्यस्थापना
गुजरातमधील मराठा सन्याचा सेनापती पिलाजीराव गायकवाडचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा दमाजीराव द्वितीय याला पेशव्यांनी सरदारकी आणि गुजराथच्या सेनापतीचे पद दिले. आणि शिवाय त्याच्याकडे सोनगढचे वडलोपार्जति छोटे राज्य होतेच. दमाजी द्वितीयने १७३४ साली मोगल सन्याचा युद्धात पराभव करून बडोदा घेतले. दमाजीचे हे सोनगढ आणि बडोद्याचे राज्य मराठा संघराज्याचा एक घटक म्हणून स्थापन झाले.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात निजामाशी झालेल्या लढाईत निजामाचा पराभव करण्यात दमाजीचा मोठा वाटा होता. पुढे इंग्रजांचा पाठींबा असलेल्या रघुनाथराव उर्फ राघोबादादाशी दमाजीने हात मिळविले. चांदवड जवळ राघोबादादा आणि दमाजीच्या संयुक्त फौजेचा माधवराव पेशव्यांच्या फौजेशी झालेल्या युद्धात माधवरावांचा विजय झाला. या युद्धातल्या पराभवाच्या नामुष्कीने खचलेल्या दमाजीराव द्वितीयचा १७६८ साली अंत झाला.
दमाजीराव नंतर सयाजीराव गायकवाड प्रथम, फतेहसिंहराव गायकवाड प्रथम, मानाजीराव, गोिवदराव या बडोदा शासकांची कारर्कीद इ.स. १७६८ ते १८०० अशी झाली. या काळात मराठा साम्राज्य खिळखिळे झाले होते आणि पानिपत युद्धानंतरच्या बडोदा शासकांनी पेशव्यांचे आधिपत्य नाममात्रच ठेवले.
१८०० साली वारसा हक्काच्या झालेल्या संघर्षांतून आनंदराव गायकवाड हा बडोद्याच्या गादीवर आला. त्यावेळी कंपनी सरकारने आनंदरावला पाठींबा दिला आणि हस्तक्षेप केल्यामुळेच आनंदरावला राजेपद मिळू शकले.
पुढे १८०२ साली खंबायत (कॅम्बे) येथे ब्रिटिशांशी झालेल्या तहात आनंदरावने बडोदा राज्याची मराठा साम्राज्याशी फारकत घेऊन ब्रिटिशांशी संरक्षण करार केला.
अशा रीतीने १८०२ साली ब्रिटिशांचे सार्वभौमत्व स्वीकारून एक संस्थान बनून राहिलेले बडोदा राज्य स्वतंत्र भारतात १ मे १९४९ रोजी स्वतंत्र भारतात विलीन झाले. अर्थात, त्याआधी बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या..
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 5:22 am

Web Title: pre process of yarn spinning
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – सुताच्या तलमतेचे मोजमापन – ३
2 राजपिपलाचे दोन सुशासक
3 कुतूहल – तलमतेचे मोजमापन- १
Just Now!
X