अंधारात चमकणाऱ्या रंगाने घडय़ाळाचे काटे आणि आकडे रंगवण्यासाठी १९२० सालच्या सुमारास अमेरिकेत सुमारे दोन हजार मुलींची कंपनीमध्ये नेमणूक करण्यात आली. या सगळ्या मुली वीस-बावीस वष्रे वयोगटातल्या होत्या. त्यांना त्या काळी ‘रेडिअम गर्ल्स’ असं संबोधलं जायचं.

सुईमध्ये दोरा ओवण्यापूर्वी त्यातले सूक्ष्म धागे एकत्र येऊन टोकदार करण्यासाठी नकळतपणे आपण त्याचं टोक तोंडात घालून लाळेच्या मदतीने टोकेरी करतो. अगदी त्याचप्रमाणे घडय़ाळातले लहान आकारात असलेले आकडे रंगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रशचे केस एकत्र येऊन त्याचा आकार टोकेरी करण्यासाठी या मुली चक्क ब्रश तोंडात घालायच्या. साहजिकच याचा विपरीत परिणाम या मुलींच्या आरोग्यावर झाला. घडय़ाळाचे काटे रंगवणाऱ्या अनेक मुलींना हाडाचा कर्करोग झाल्याचं १९२५ च्या सुमारास लक्षात आलं. रंगांत असलेल्या किरणोत्सारी रेडिअमचा हा परिणाम होता. पुढे १९३० साली घडय़ाळाचे काटे रंगवणाऱ्या मुलींना ब्रश तोंडात घालण्याची मनाई करण्यात आली. कालांतराने रेडिअमचे धोके लक्षात आल्याने १९६० सालापासून या रंगांमध्ये रेडिअमचा वापर करणं बंद करण्यात आलं.

through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
nashik, one man Arrested, Smuggling Liquor, Worth 66 Lakh, from Goa, smuggling Liquor from Goa, nashik Smuggling Liquor, nashik news, crime news,
मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार

घडय़ाळाप्रमाणेच विमानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये रेडिअमयुक्त रंग वापरला जात असे. पण आता रेडिअमऐवजी तुलनेनं सुरक्षित असलेलं हायड्रोजनचं ‘ट्रिटिअम’ हे किरणोत्सारी समस्थानिक या रंगांमध्ये वापरलं जातं.

रेडिअम हे अत्यंत तीव्र किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. सुरुवातीच्या काळात अर्थातच याची कल्पना शास्त्रज्ञांना नव्हती. फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ हेन्री बेक्वेरेल याने रेडिअम असलेली लहानशी बाटली आपल्या कोटाच्या खिशात ठेवली होती. सहा तासांनी त्याच्या त्वचेवर चक्क भोकं पडल्याचं आढळून आलं.

अर्थात, असं असलं तरी रेडिअमचा वापर अनेक ठिकाणी आजही केला जातो. रेडिअम-२२३ या समस्थानिकाचा वापर हाडाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जातो. रेडिअमच्या तीव्र किरणोत्सारी गुणधर्माचा वापर औद्योगिक क्षेत्रांत धातूच्या यंत्रामध्ये असलेले दोष शोधण्यासाठी करून घेतला जातो. संशोधन क्षेत्रांत, आण्विक शस्त्रांमध्ये त्याचप्रमाणे अणुऊर्जा केंद्रात न्यूट्रॉन या अणूतील कणांची आवश्यकता असते. न्यूट्रॉन कणांचा स्रोत म्हणून रेडिअम आणि बेरिलिअमचं मिश्रण वापरलं जातं.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org