रॉबर्ट फूट हे ब्रिटिशराज काळातील भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्व- संशोधक होते. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात १५० वर्षांपूर्वी काम करताना त्यांनी प्रागतिहासिक काळातील आद्यपुराश्मयुगीन दगडी हत्यारे शोधून काढली. रॉबर्ट फूट यांच्या या कामगिरीमुळे त्यांना पुरातत्त्व विषयामध्ये ‘भारतीय प्रागतिहासाचे जनक’ म्हणून संबोधले जाते. भारतीय तंत्रज्ञान कौशल्याचा इतिहास पाहताना प्रागतिहासिक (प्रीहिस्टॉरिक) काळातील हे दगडी हत्यारे तयार करण्याचे तंत्रज्ञान मानवाने विकसित केले, हा मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होय. रॉबर्ट फूट यांना अनेक क्षेत्रांमध्ये रस होता. ते भूवैज्ञानिक, पुरातत्त्वज्ञ, संस्कृती अभ्यासक, संग्रहालयतज्ञ, प्रागतिहासतज्ज्ञ, चित्रकार आणि संगीताचे जाणकार होते.

चेल्टनहॅम येथे १८३४ मध्ये  सामान्य कुटुंबात जन्मलेले रॉबर्ट फूट १८५८ साली ब्रिटिश इंडिया सरकारच्या जिऑग्राफिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियातील नोकरीमुळे भारतात आले. मद्रासमध्ये कामावर रुजू झाले. त्यांच्या नोकरी काळात त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी, हैदराबादचा परिसर आणि मुंबई इलाख्यात काम केले. जोसेफ प्रेश्टिविच यांनी प्रागतिहासिक मानवाच्या जीवनासंबंधी केलेल्या संशोधनांनी प्रभावित होऊन रॉबर्ट फूट यांनी या कामात रस घेतला. मद्रासजवळ पलूवरम येथे रॉबर्टना पहिले दगडी हत्यार सापडले. त्यानंतर त्यांनी दगडी हत्यारे आणि प्रागतिहासिक वसाहतींच्या संशोधनाचा विस्तार केला. १८८४ साली त्यांनी भारतीय उपखंडातील दुसरी मोठी बेलम ही गुंफा शोधून काढली. या गुंफेची लांबी साडेतीन कि.मी. आहे.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

रॉबर्ट फूट यांनी भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण खात्यात ३३ वष्रे नोकरी केली. त्यांनी भारतात केलेला दगडी हत्यारांचा शेकडोंचा संग्रह चकित करणारा आहे. दगडाच्याच साहाय्याने दगडाची हत्यारे तयार करण्याचे तंत्रज्ञान त्या काळात मानवाने कसे विकसित केले असावे, असा प्रश्न उभा राहतो! रॉबर्ट यांनी शोधून काढलेली हत्यारे तीन-साडेतीन लाख वर्षांपूर्वीची असावीत असा कयास आहे. त्यांच्या संशोधनावर पुढच्या काळात झालेले भारतीय प्रागतिहासिक संशोधन उभे आहे!

sunitpotnis@rediffmail.com