रशियात उत्तरेकडे नेव्हा नदीवर फिनलॅण्डच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आणि रशियन फेडरेशनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. झार पीटर द ग्रेटने १७०३ साली या शहराची स्थापना केली. इ.स. १७१२ ते १७२८ आणि इ.स. १७३२ ते १९१८ या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली या शहराचे नाव पेट्रोग्राड, तर १९२४ मध्ये लेनिनग्राड असे करण्यात आले. सोव्हिएत युनियन बरखास्त झाल्यावर १९९२ साली या शहराचे मूळ नाव सेंट पीटर्सबर्ग हे पुन्हा शासकीय वापरात आणले गेले. नेव्हा नदीच्या मुखाजवळ १६११ साली स्वीडिश लोकांनी किल्ला बांधून त्याला नाव दिले ‘न्येन’. किल्ल्याभोवती तयार झालेल्या वस्तीलाही हेच नाव दिले गेले. झार पीटर द ग्रेटला शेजारच्या प्रबळ नौदल आणि सामुद्रिक व्यापार असलेल्या स्वीडन, फिनलॅण्ड यांच्या स्पध्रेत उतरण्यासाठी एका चांगल्या बंदराची आवश्यकता होती. १७०३ साली त्याने ‘न्येन’चा किल्ला घेऊन त्याच्या परिसरात सेंट पीटर्सबर्ग शहर उभारले. पीटरने तत्कालीन प्रसिद्ध फ्रेंच आर्किटेक्ट जीन बाप्टिस्ट अलेक्झांडर ली ब्लॉण्ड याच्या मार्गदर्शनाखाली हे सुनियोजित शहर बांधून १७१२ साली आपल्या रशियन साम्राज्याची राजधानी मॉस्कोहून तिथे नेली. त्याने आयताकृती रुंद कालवे शहरात खोदून जलवाहतुकीसाठी त्यांचा वापर केला. पीटरने शहरात मेन्शीकोव्ह पॅलेस, पीटर अ‍ॅण्ड पॉल कॅथ्रेडल, अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, युनिव्हर्सिटी अशा सुरेख रेखीव इमारती बांधल्या. रशियाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांमुळे झार पीटरने अनेक उमराव सरदारांचा रोष ओढवून घेतला. या कारणाने त्याच्यावर अनेकदा खुनी हल्ले झाले. पीटरच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या त्याच्या मुलाने १७२८ साली आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून परत मॉस्को येथे हलवली. परंतु चार वर्षांनी १७३२ मध्ये सम्राज्ञी अ‍ॅनाने आपली राजधानी पुनश्च सेंट पीटर्सबर्ग येथे नेली. पुढे १९१७ साली कम्युनिस्ट क्रांती होईपर्यंत सेंट पीटर्सबर्ग हेच रोमानोव्ह घराण्याच्या झारशाही सरकारचे मुख्यालय बनून राहिले.

– सुनीत पोतनीस

candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Tanush Kotian made his IPL 2024 debut
PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

sunitpotnis@rediffmail.com

 

 

बीजविरहित फळनिर्मिती

फळ आणि त्यामधील बीजनिर्मितीसाठी सफल परागसिंचनाची आवश्यकता असते. बीजविरहित फळ निर्मिती हे असफल परागसिंचनाचे उदाहरण आहे. यास वैज्ञानिक भाषेत ‘पार्थोनोकार्पी’ असे म्हणतात. ही प्रक्रिया दोन प्रकारांत आढळते. नसíगक आणि मानवनिर्मित. अनुवंशकीय बदलामुळे काही वनस्पतींमध्ये सक्षम परागकण तयार होत नाहीत. त्यामुळे परागसिंचन झाले तरी तयार झालेल्या फळामध्ये बिया नसतात. केळी, अननस ही याची उत्तम उदाहरणे आहेत. अनुवंशकीय बदलास तत्पर प्रतिसाद देणाऱ्या अनेक वनस्पतींचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्यांच्यापासून बीविरहित फळांच्या शेकडो संकरित प्रजाती निर्माण केल्या आहेत. टोमॅटो, काकडी, किलगड, खरबूज, पपई, अंजीर, खजूर ही यापकी काही परिचित उदाहरणे आहेत. बीविरहित द्राक्ष निर्मितीसाठी संप्रेरकांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. मणी अवस्थेतील द्राक्ष घडावर संप्रेरकाच्या प्रमाणित द्रावणाचा फवारा दिला असता द्राक्षांचा आकार मोठा होऊन ती बीजविरहित मांसल होतात. ‘थॉमसन सीडलेस’ जात यासाठी प्रसिद्ध आहे. संप्रेरकांचे डाग द्राक्षावर शेवटपर्यंत दिसतात म्हणूनच ती पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन खाणे योग्य असते.

पारथेनोकार्पीचा प्रयोग ज्या फळांमध्ये कठीण कवचाच्या अनेक बिया असतात. त्या वनस्पतींवर प्रामुख्याने केले जातात. देशी किलगड कापल्यावर आतमध्ये लालसर गराबरोबरच किती तरी काळ्या बिया आढळतात. असे फळ खाण्यास त्रास आणि त्यासाठी लागणारा वेळ त्यामुळे बाजारमूल्यांपासून वंचित होते. मात्र बीविरहित किलगड त्याचा मोठा आकार आणि स्वादिष्ट तांबूस गरामुळे ग्राहकाच्या पसंतीस लगेच पात्र ठरते. बीजविरहित फळझाडांच्या रोपनिर्मितीसाठी लागणाऱ्या बिया बंद पाकिटात उपलब्ध असतात. मात्र त्याचे मूल्य जास्त असते. कारण त्याच्या निर्मितीसाठी दोन प्रजातींचा संकर आणि जनुकीय बदल आवश्यक असतो. या फळझाडांची रोपे हरितगृहांमध्ये ऊती पद्धतीनेसुद्धा तयार केली जातात. बीजविरहित फळ निर्मितीमध्ये इस्रायल आणि अमेरिकेतील कॅलिफोíनया राज्य सध्या आघाडीवर आहेत. आपल्या देशामध्येसुद्धा या क्षेत्रामध्ये संशोधनासाठी मोठा वाव आहे आणि त्या दिशेने यशस्वी पाऊल टाकून बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ‘कोय’विरहित आंब्याच्या नवीन संकरित वाणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

– डॉ. नागेश टेकाळे 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org