सोव्हिएत राष्ट्रसंघाचा एक घटक असलेला किर्गिजस्तान, राष्ट्रसंघातून बाहेर पडून ३१ ऑगस्ट १९९१ रोजी एक स्वायत्त, स्वतंत्र प्रजासत्ताक किर्गिजस्तान देश अस्तित्वात आला. चारच महिन्यांनी, २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियन हा कम्युनिस्ट राष्ट्रसंघ बरखास्त झाला. एकल संसदीय गृह असलेले बहुपक्षीय प्रजासत्ताक सरकार येथे सध्या कार्यरत आहे. प्रजासत्ताक किर्गिझ सध्या युनायटेड नेशन्स, युरेशियन इकॉनॉमिक युनियन, कॉमनवेल्थ ऑफ इकॉनॉमिक स्टेट्स, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक स्टेट्स, टर्कीक कौन्सिल वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. १९९१ मध्ये, स्वतंत्र किर्गिजस्तानच्या पहिल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने अस्कार अकायेव्ह राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. परंतु २००५ मध्ये त्यांच्या विरोधी पक्षांनी उठाव करून त्यांना राजीनामा घ्यावयास लावून बाकीयेव्ह यांना राष्ट्राध्यक्ष केले. हे होताना झालेली निदर्शने, उठाव आणि त्यातून झालेल्या हत्यांनी राजकीय परिस्थिती अस्थिर बनली होती, देशात गेल्या चार वर्षांमध्ये भ्रष्टाचारही बोकाळला होता. किर्गिजस्तानमध्ये पसरलेली अनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभार यावर नियंत्रण ठेवण्यात अध्यक्ष बाकीयेव्ह यांना आलेल्या अपयशामुळे त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी कारवाया सुरू होऊन परिस्थिती आणखी चिघळली. अखेरीस २०१० मध्ये बाकीयेव्ह आपल्या कुटुंबीयांसह बेलारूसमध्ये पळून गेले. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सांसदीय निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले सादीर जापारोव्ह हे प्रजासत्ताक किर्गिजस्तानचे सध्याचे अध्यक्ष आहेत.

   किर्गिझ जनता बहुसंख्येने सुन्नी इस्लामिक असली तरी मध्ययुगीन काळापासूनच तेथे अनेक वंशांचे लोक राहत असल्याने विभिन्न वांशिक परंपरांचे पालन त्या प्रदेशात करताना आढळते. बौद्ध लोकांप्रमाणे पताका किंवा ध्वज सदृश्य कापडावर प्रार्थना लिहून ते झाडांवर किंवा खांबांवर लावण्याचा इथे प्रघात आहे. घोड्याचे मांस येथे आवडीने खाल्ले जाते. ग्रीन टी हे किर्गिज लोकांचे राष्ट्रीय पेय आहे! पारंपरिक पद्धतीने बहिरी ससाणा म्हणजे फाल्कन नावाचा पक्षी पाळून त्याला दुसऱ्या प्राण्यांची, पक्ष्यांची शिकार करायचे शिकवणे हा किर्गिझ लोकांचा आवडता छंद. अनेक घरांमधून असे पक्षी पाळून त्यांच्याकडून शिकार करवून घेण्याची प्रथा सध्याही किर्गिजस्तानात पाळली जाते. – सुनीत पोतनीस

Loksatta kutuhal Architect of ChatGPT Sam Altman
कुतूहल: चॅटजीपीटीचे शिल्पकार – सॅम ऑल्टमन
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..

sunitpotnis94@gmail.com