‘संस्कार’ (१९६५) ही अनंतमूर्ती यांची सवरेत्कृष्ट कादंबरी. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने समाजमनात खळबळ माजली. ‘संस्कार’ या पुरस्कारविजेत्या कादंबरीत हिंदू धार्मिक ग्रंथ, परंपरा, रूढी यांवर कथानकाच्या ओघात उपहासाचे, टीकेचे जीवघेणे फटकारे ओढले आहेत. त्यामुळे सनातन्यांनी याला विरोधही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राणेशाचार्य या एका प्रामाणिक, विद्वान ब्राह्मणाची ही कथा आहे. देवावर त्याचा अढळ विश्वास आहे. एका आजारी स्त्रीशी त्यांनी समजूनउमजून विवाह केला. त्यामुळे आपली विषयवासना काबूत ठेवणे होईल अशी त्यांची समजूत होती. चाळिशीतील या माणसाविषयी समाजात विलक्षण आदरभाव होता.

या कादंबरीचे कथानक केवळ चार ओळींत सांगता येईल असे आहे. जन्माने ब्राह्मण असलेला नारायण-नारण्णा पत्नीला सोडून चंद्री या वेश्येशी घरोबा करतो व मांसाहार, मदिरा यांच्या आहारी जाऊन अचानक प्लेगच्या साथीने मृत्यू पावतो आणि गावातील मंडळींत गहन प्रश्न उभा राहतो. नारण्णाचा  ‘संस्कार’ करावा, का करू नये! दाहसंस्कार न झाल्यास त्याचे पिशाच होण्याची भीती, जारणमारण, गिधाडांची गर्दी, पद्मावती, चंद्री अशा समाजातील स्त्रिया. मिलिटरीतील सेवेबद्दलची तुच्छ कल्पना, स्मार्त आणि माध्व यांच्यातील वाद, जत्रेतील दुकाने, परसदारी वाढवलेली पारिजात-मोगरा-गुलाब, चाफा अशी फुलझाडे अशांसारख्या उल्लेखातून कन्नड समाजचित्रण सुस्पष्ट होते.

या सामाजिक समस्येच्या कथानकाला उपकथानक आहे. ते प्राणेशाचार्य यांच्या पोथी-पुराणनिष्ठ धार्मिक आचरणाचे व अचानक चंद्रीसारख्या वेश्येशी घडून गेलेल्या अंगसंगाचे. त्यांच्या विरोधाभासात पात्र आहे ते नारायणप्पाचे. नारायणप्पाचा  मृत्यू आणि त्याच्या अनुषंगाने घडत राहणाऱ्या घटनांचा कालावधी केवळ दोन-चार दिवसांचा आहे. एका निसटत्या क्षणी चंद्रीशी संग घडल्यानंतर प्राणेशाचार्याच्या मनातील भल्या-बुऱ्याची, नीती-अनीतीची, धार्मिक-अधार्मिक, कौटुंबिक-सामाजिक अशी सुरू झालेली आंदोलने अत्यंत तरलतेने लेखकाने चित्रित केली आहेत आणि हेच या कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. तसेच या कादंबरीत भौतिक आणि आधिभौतिक तत्त्वांचा मिलाफ आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मेरी क्युरी

(जन्म : ७ नोव्हेंबर १८६७, वॉर्सा, पोलंड; मृत्यू : ४ जुल १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)

सन १८९६ मध्ये हेन्री बेक्वेरल नावाच्या एका फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाला युरेनियम क्षारातील किरणोत्साराचा शोध लागला. या किरणोत्साराचा प्रभाव त्याला एका वापरल्या न गेलेल्या फोटोग्राफिक फिल्मवर आढळून आला. नंतर सन १८९७ मघ्ये मेरी क्युरी आणि तिचे पती पियरे क्युरी यांनी पोलोनियम व रेडियम या दोन किरणोत्सारी पदार्थाना वेगळे करण्यात यश मिळवले. या किरणोत्सारी पदार्थापासून उत्सर्जति किरणांची ओळख अल्फा (ं), बीटा( ु), गॅमा (ॠ) या नावांनी पटवली गेली. अँटोनी हेन्री बेक्वेरल हे एक नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते. उत्स्फूर्त किरणोत्साराचा शोध लावल्याखातर त्यांना मेरी क्युरी आणि पिअरे क्युरी यांच्यासोबत १९०३ मध्ये नोबेल पारितोषिक दिले गेले. पुढे असे लक्षात आले की, या अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा उगम अणूच्या संरचनेत होत असतो.

१८९१ मध्ये सॉबरेन्न येथे भौतिक आणि गणितीय विज्ञानातील विद्यावृत्ती (लायसेन्शियेटशिप मिळाल्याने क्युरी, पुढील शिक्षणाकरिता फ्रान्समध्ये गेल्या. १८९४ मध्ये स्कूल ऑफ फिजिक्समधील प्रोफेसर पिअरे क्युरी यांच्याशी त्यांची गाठ पडली. १८९५ मध्ये त्यांचे लग्न झाले. मिळालेल्या अनेक पारितोषिकांद्वारेच मादाम क्युरींच्या कामाचे महत्त्व ध्यानात येते. त्यांना अनेक विज्ञान, वैद्यक आणि कायदा या विषयांतील सन्माननीय पदव्या प्राप्त झालेल्या होत्या. जगभरातील अनेक ज्ञानवंत संस्थांचे सदस्यत्वही त्यांना मिळाले होते.

बेक्वेरल यांनी शोधून काढलेल्या उत्स्फूर्त किरणोत्साराच्या अभ्यासाकरिता, त्यांना पतीसोबत १९०३ सालचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते. या पारितोषिकाचे अध्रे मानकरी बेक्वेरल हेही होते. १९११ मध्ये त्यांना किरणोत्सारातील त्यांच्या कामाकरिता, केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

अमेरिकेतील स्त्रियांच्या वतीने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हाìडग यांनी त्यांना १९२१ मध्ये त्यांच्या विज्ञानसेवेकरिता १ ग्रॅम रेडियम भेट दिले होते. त्यांच्या कामाच्या गौरवार्थ किरणोत्साराच्या एककास त्यांचे नाव दिले गेले. १ ग्रॅम रेडियमपासून दर सेकंदास प्राप्त होणाऱ्या किरणोत्सारास ‘१ क्युरी’ असे संबोधले जाऊ लागले. १ क्युरी किरणोत्सार म्हणजे ३७ अब्जविघटने/सेकंद.

नरेन्द्र गोळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananthamurthys best book
First published on: 11-08-2017 at 03:32 IST