डॉ. श्रुती पानसे

ज्याला चारचौघांसारखा मेंदू आहे, तो प्रत्येक जण बुद्धी वापरतो. प्रत्येक काम हे सर्व वयात बुद्धीचा वापर करूनच केलं जातं. माणसामधली ही बुद्धी या ना त्या प्रकारे तपासली जाते. कधी ती परीक्षांच्या तराजूत तोलण्याचा प्रयत्न होतो तर कधी आयुष्यातल्या यशस्वितेच्या/आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

बुद्धिमान कोणाला म्हणायचं, या विषयावर आठवी-दहावीच्या अनेक मुलांशी बोलल्यावर डॉक्टर, लेखक, संशोधक, बुद्धिबळासारखा विशिष्ट खेळ खेळणारे बुद्धिमान असतात हे ते नि:संदेह सांगतात. पण याशिवाय इतर अनेक व्यवसाय करणारे, नोकरी करणारे नक्की बुद्धिमान आहेत का, याविषयी त्यांच्या मनात साशंकता असते. खेळाडू, गायक, दुकानदार अशा अनेकांच्या बुद्धिमत्तेविषयी शंका घेतली जाते, याचं कारण समाजाने, घरादाराने, शिक्षणव्यवस्थेने त्यांच्या मनावर तसंच बिंबवलेलं आहे.

बुद्धी म्हणजे काय, हे मुलांपर्यंत आपण पोचवूच शकलो नाही. ही बौद्धिक विषमता वयानं मोठय़ा लोकांच्या मनात आहे. तिथूनच ती लहानांच्या मनात पोचली आहे.

खेळ, एखादी कला किंवा काहीही करताना ते काम कसं करायचं हे मेंदूला आधी शिकावं लागतं. समजून घ्यावं लागतं. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा कुठे त्या कामात वरच्या स्थानापर्यंत जाता येतं.

गायक ही गायनकला सर्वांपर्यंत पोहोचवतो. प्रत्यक्ष गायनाचं काम स्वरयंत्रातून होत असलं तरी कसं गायचं हे बुद्धीच ठरवते. निर्णयक्षमता ही फक्त मेंदूकडेच असते. हात, पाय, डोळे, शरीरातले स्नायू, हृदय निर्णय घेत नाही. म्हणून माणूस कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी तो त्याच्या बुद्धिमत्तेनुसारच काम करत असतो.

मेंदूची- त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपापलं काम करणाऱ्या न्युरॉन्सची साथ आहे म्हणूनच विशिष्ट काम व्यक्तीच्या हातून होत असतं. जगातल्या कोणत्याही कामाला आणि व्यवसायाला हाच नियम लागू पडतो. आपल्या वर्गातल्या सर्वच्या सर्व मुलांमध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत, बुद्धिमत्ता आहेत, हे शोधता येतं. तसंच एखादं मूल अपेक्षेपेक्षा वेगळं असेल तर त्याची बुद्धिमत्ता नक्की कशात आहे, हे शोधता येईल. त्यांच्यात दडलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला शोधणं हे फार महत्त्वाचं काम आहे.

contact@shrutipanse.com