मानवासकट सर्व सजीव प्राण्यांचं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीतल्या केंद्रकात डीएनएच्या लांबच लांब धाग्यांच्या घट्ट वेटोळ्यांनी बनलेली गुणसूत्रं आहेत. एका व्यक्तीच्या सगळ्या पेशीत एकसारखं डीएनए असतं. माणसाच्या एका पेशीतली गुणसूत्रं उलगडली तर त्यांची लांबी सुमारे दोन मीटर असते. हा लांबलचक धागा खरंतर एकात एक गुंफलेल्या दोन धाग्यांनी बनलेला असतो. या प्रत्येक धाग्यावर अ‍ॅडीनीन, ग्वानीन, सायटोसीन आणि थायमीन या चार नायट्रोजनयुक्त संयुगांच्या हजारो रेणूंचा एक विशिष्ट क्रम असतो. ह्य धाग्यावरचा ठरावीक नायट्रोजनयुक्त संयुगांचा भाग म्हणजे जनुक. प्रत्येक जनुकात एक विशिष्ट प्रथिन बनवण्याची माहिती रासायनिक भाषेत गुंफलेली असते. या माहितीवरूनच आपले गुणधर्म ठरत असतात.

माणसामाणसामध्ये जवळपास ९९ टक्के डीएनए सारखं असतं तर जे काही १ टक्के डीएनए वेगळं असतं ते दोन व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं ठरवण्यासाठी पुरेसं असतं. पृथ्वीवरचे सजीव कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्यांच्या पेशीतल्या डीएनएवर ह्य़ाच चार नायट्रोजन संयुगांच्या अनेक रेणूंचा वेगवेगळा क्रम असतो. आणि रेणूंच्या पातळीवर या नायट्रोजनयुक्त संयुगांच्या क्रमवारीत होत गेलेला बदल हेच विविध प्रकारचे सजीव निर्माण होण्याचं कारणही आहे. दोन प्रकारच्या सजीवांमध्ये जितका फरक जास्त तितका त्यांचा डीएनए अनुक्रम वेगवेगळा असतो.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

माणसामधील डीएनएवरील नायट्रोजनयुक्त संयुगांचा संपूर्ण क्रम शोधून काढण्यासाठी १९९० साली आंतरराष्ट्रीय स्तरावर ूमन जीनोम प्रकल्प हाती घेतला गेला. हा जागतिक स्तरावर अनेक देशांनी एकत्रित येऊन केलेला सर्वात मोठा जीवशास्त्रीय प्रकल्प होता. अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशांमध्ये एकत्रितपणे चाललेल्या या प्रकल्पातून मिळालेल्या माहितीचं एकत्रीकरण केलं गेलं.

२००३ साली पूर्ण झालेल्या या प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार मानवी गुणसूत्रावर एकूण २२३०० कार्यरत जनुकं असतात. त्यांचा संपूर्ण अनुक्रम मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. ह्य़ा संशोधनाचा फायदा मधुमेह आणि इतर जनुकीय आजारांवर उपाय काढण्यासाठी निश्चितच होत आहे. अशाच प्रकारे काही सूक्ष्मजीवांचा जीनोमही शोधण्यात आला आहे जो रैणवीय जीवशास्त्र शेती, जैविक इंधने उत्क्रांतीचा अभ्यास अशा इतरही अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

– प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

  office@mavipamumbai.org

 

ओ. एन.व्ही. कुरुप : काव्यानुभव

मल्याळम् भाषेत  ओ.एन. व्ही. कुरुप यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी तीस काव्यसंग्रह आहेत. १९४६ ते ५६ मध्ये लिहिलेल्या कवितांचा ‘दाहिकन्ना पनपाथ्रम्’ हा पहिला काव्यसंग्रह १९५६ मध्ये प्रकाशित झाला. ‘मायिलप्पीलि’, ‘अक्षरम्’, ‘भूमिक्कू’, ‘ओरू चरमगीथम्’, ‘मृगया’, ‘उज्जयिनी’, ‘स्वयंवरम्’, ‘दीनानाथम’ इ. प्रमुख काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या कवितांत मल्याळी जनसामान्यांच्या चिंता, व्यथा आणि विद्रोहाचं दर्शन घडतं. यामुळेच कदाचित त्यांना केरळचे राजकवी समजलं जातं.

सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या कवितांतून आवाज उठविण्याची प्रेरणा सुरुवातीपासूनच त्यांना मिळाली होती. ज्या छावरा गावात त्यांचे बालपण गेले, तेथील मिल मजुरांच्या कष्टाचे, दु:खी जीवनाचे दर्शन त्यांना घडले होते. फॅक्टरीतील मजुरांच्या दु:खाला जीवनसंघर्षांला कवितेतून वाचा फोडण्याचा निर्णय तेव्हाच त्यांनी घेतला होता. यामुळे त्यांच्या मनातील सामाजिक परिवर्तनाची तीव्र इच्छा त्यांच्या सुरुवातीच्या कवितांतून प्रकट झालेली दिसते.

१९६० नंतर मात्र त्यांच्या कवितेत परिवर्तन झालेले दिसते. भारतावर चीनने आक्रमण केले आणि त्याचा परिणाम असा झाला, की साम्यवादी पार्टीचे विभाजन झाले. सुकर स्वप्नं धुळीला मिळाली. तेव्हा संवेदनशील कवी कुरुप म्हणतात-‘इधर इस मरुभूमी में खडा होकर

पूछता हूँ मै किधर है.. वह भूमि, वाग्दत्त..’

पितृवात्सल्याचे माधुर्य प्रकट करणारी, वैयक्तिक अनुभवावर आधारित ‘चोरुणु’ (अन्नप्राशन) ही कविता उल्लेखनीय आहे. अशीच एक बालपणातील अलवार अनुभव व्यक्त करणारी, अत्यंत उल्लेखनीय कविता आहे- ‘मयिलप्पीली’ (मोरपंख)-

‘भले ही आज मैं मुन्ना नहीं हूँ

उस दिन का मुन्ना मैं ही था न?

अद्भुत है, उस दिन हुआ था

मोरपंख का प्रसव, बढता रहा वह

किताब के पन्नों के बीच, नहीं..

मेरे मानस की पंखुडियोंके बीच।’

‘हस्तदान’ या कवितेत व्हिएतनामच्या एका सैनिक मित्राच्या संपर्कात आल्यानंतरच्या अनुभवाचे वर्णन आहे. अवतीभोवतीच्या परिस्थितीतील बदलामुळे, संवेदनशील कविमनावर त्याचे तीव्र पडसाद उमटतात आणि मग ते अनुभव काव्यरूप होऊन गेलेले दिसतात.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com