जशी आपल्याला नवी नवी माणसे भेटतात तसे काही काही शब्द नव्याने कानावर येतात, त्याचा अर्थ किती काळ माहीत नसतो आणि अकस्मात कधीतरी तो गवसतो असेही घडते.

रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीपट्टय़ात फिरताना असे काही शब्द गवसले की जे पूर्वी कधी ऐकले नव्हते. ‘कोपाशी चा दे आणि रिकाबी दे.’ इथे कपातून या पंचमीच्या ‘ऊन’, ‘हून’ प्रत्ययाऐवजी ऐवजी ‘शी’ प्रत्यय या दालदी मुस्लीम स्त्रिया सहज लावताहेत ही मला गंमत वाटत होती आणि रिकाबी म्हणजे बशी हे तिथे मला कळले. व्यंकटेश माडगूळकरांची आई रागावली की त्यांना म्हणायची, ‘कार्ट अगदी नसराणी आहे.’ नसराणी या शब्दाचा अर्थ कितीतरी वर्ष त्यांनाही अनोळखी राहिला होता. ‘एक हजार रात्री व एक रात्र – अरबी गोष्टी’ या सुरस आणि चमत्कारिक ग्रंथाच्या तळटीपांत त्यांना तो आढळला. ‘नसराणी’ हा मूळचा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ धर्मातर केलेला माणूस, आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे ही गोष्ट निंद्य म्हणून ती शिवी. हाच शब्द मी कोशात पाहिला. कोशात ‘नस्रानी’ म्हणजे ख्रिस्ती, ईसाई असा अर्थ पाहायला मिळाला.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक एक विनोद नेहमी सांगत. तो म्हणजे ‘दिंडी दरवाजा कोणी तोडला?’ या प्रश्नाचे उत्तर शाळा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विचारल्यावर मुलांना, शिक्षकांना कोणालाच सांगता येईना. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सांगितले, ‘अहो आमची मुले एवढी व्रात्य नाहीत. जे काय काय नुकसान झाले असेल ते सादिलातून भरून घेता येईल.’ त्या वेळी सादिल हा शब्द कळला नव्हता नंतर मात्र लहानशी भत्त्याची रक्कम म्हणून तो ठाऊक झाला.

सानिया या मुलीला चार वेळा नावाचा अर्थ विचारल्यावर सांगता येईना तेव्हा उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश पाहिला आणि मिनिट, क्षण, पळ असा अर्थ पाहिल्यावर लगेच तिला कळीत केले. हौसेने परकीय शब्द नाव म्हणून ठेवले जातात पण त्यांचा अर्थ स्वत: समजून घेतला आणि ते नामाभिधान मिरवणाऱ्याला सांगितला तर त्या नावाचे सार्थक नाही का होणार? पु. शि. रेग्यांना कविता लिहीताना शब्दकोश लागायचाच असे रवींद्र पिंगे म्हणाले होते. आपण निदान अडला शब्द बघायला तरी निरनिराळे कोश वापरू या.

– डॉ. निधी पटवर्धन