गर्भवती वराह- माद्यांमध्ये लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा पोमोना या जीवाणूंमुळे होतो. वराहांमध्ये गर्भपात होतो किंवा अशक्त  पिल्ले आधीच जन्मतात. हा संसर्गजन्य आजार असून जिवाणू लघवीवाटे बाहेर पडतात. दुसऱ्या जनावरांच्या नाक आणि डोळ्यांवाटे शरीरात प्रवेश करतात. या रोगांचा फैलाव संभोगातून होतो.
घटसर्प रोग पाच्चुरेल्ला जिवाणूंमुळे होतो. वराहांमध्ये खाकसणे, िशका येणे, ताप येणे, नाक गळणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. पिग न्यूमोनिया रोगामुळे वराहाला खोकला व श्वासोच्छ्वास त्रास होतो. शेतावर गर्दी वाढल्यास रोगाचे प्रमाण वाढते.
जिवाणूंमुळे गळू हा रोग झाल्यास जबडय़ाखाली, मानेवर वा शरीरात कोठेही पू(पस) भरलेले गळू दिसतात. इरिसिपिलस जिवाणूंमुळे होणाऱ्या आजारात वराहांना ताप येतो, हाडांमध्ये सूज येते, चामडीवर लाल डाग दिसतात.
 देवी या विषाणूजन्य रोगात वराहाचे पोट, कान, मान, पायामागील भाग, पाठ येथे व्रण दिसतात. ते कायम राहातात. कॉलरा रोगात मरतुकीचे प्रमाण खूपच जास्त असते. वराहात ताप, उलटय़ा, पातळ विष्ठा, रक्ती हगवण अशी लक्षणे दिसतात.
 इन्फ्लुएंझा या विषाणूजन्य रोगात वराहाचे तापमान १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत वाढते. वराहाचे खाणे-पिणे कमी होते. श्वासोच्छ्वास त्रास होतो. नाक, तोंड व गळ्यातून द्रव गळतो. चालताना त्रास होतो. ते चक्कर येऊन पडतात. लाळ्याखुरकत रोगात जिभेवर, जबडय़ात, नाकपुडीजवळ व खुरांवर फोड येतात. वराह खाद्य खात नाहीत. त्यांची लाळ गळते. त्यांना चालताना त्रास होतो.
अ‍ॅनिमिया आजाराचे प्रमाण नवजात पिल्लांमध्ये अधिक आढळते. पिल्ले खाद्य कमी खातात, अशक्त होतात, शरीरावर सूज येते, श्वासोच्छ्वास त्रास होतो. माद्यांच्या खाद्यात लोह टाकल्याने व नवजात पिल्लांना लोहाचे इंजेक्शन दिल्याने रोगास प्रतिबंध होतो.
खाद्यातील आवश्यक घटकांची कमतरता, खाद्यातील बदल, जास्त खाद्य खाणे, विषाणू-जिवाणूंचा प्रादुर्भाव, कृमी इत्यांदींमुळे वराहामध्ये हगवण होते. पिल्लांमध्ये हगवणीने मरतुकीचे प्रमाण अधिक असते.
घरांची स्वच्छता, संतुलित आहार व योग्य वेळी लसीकरण केल्यास वराहांमधील बहुतेक आजारांना प्रतिबंध करता येतो.
– डॉ. शरद आव्हाड (नगर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – पाश्चिमात्य देशांमधला चार्वाक – रिचर्ड डॉकिन्स
रिचर्ड डॉकिन्स नावाच्या माणसाने हल्ली पाश्चिमात्य देशांत बुद्धिवादी धुमाकूळ माजवला आहे. यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माविरुद्ध याने सुरू केलेल्या वाग्युद्धाने तिथले धार्मिक विश्व पार ढवळून निघाले आहे. पाश्चिमात्य देशांतल्या सुखलोलुपतेने आधीच मंडळी धर्माच्या बाबतीत सुस्त झाली होती. विज्ञानाच्या असंख्य झेपांमुळे जे चमत्कार घडत आहेत, त्यामुळे नैसर्गिक म्हणजे दैवी चमत्कारावरचा विश्वास हळूहळू उडू लागला आहे. धर्माचे रक्षण घरीदारी करण्याची जबाबदारी सोपवलेल्या स्त्रिया शिक्षणाच्या प्रसारामुळे आता स्वतंत्रपणे प्रश्न विचारू लागल्या आहेत. त्यातच या डॉकिन्सने असा प्रश्न विचारला की, बहुसंख्य लोक देवावर विश्वास ठेवतात एवढय़ा एका बळावर तुम्ही देव अस्तित्वात आहे असे कसे म्हणू शकता? तो पुढे म्हणतो, अमेरिकेत आणि अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या दोन माणसांचे दोन निरनिराळे देव कसे? इसवी सन १००० ते १५०० मध्ये झालेल्या ख्रिश्चन लोकांच्या मुसलमानांवर झालेल्या अनेक स्वाऱ्यांमुळे लाखोकरोडो मेले. स्वत: ख्रिश्चन लोक क्षीण झाले. मुसलमानांचा त्यांच्यावर कायमच डूक राहिला आहे आणि या सगळ्या भानगडीत रोमन लोकांचे साम्राज्य आणि संस्कृती लयाला गेली, असे सांगून डॉकिन्स म्हणतो, कल्पना करा, ज्याचा मूळ पाया देवच आहे तो धर्म नसता तर केवळ ज्यू म्हणून लाखोंनी निरपराध माणसांना यमसदनाला पाठवण्याचे क्रूर कर्म घडले असते का? भारताच्या फाळणीत झालेल्या अनन्वित हालाचेही उदाहरण तो देतो आणि विचारतो, काही लोक असा दावा करतात की, मध्यपूर्वेतले तिन्ही धर्म शास्त्रशुद्ध विचारावर आधारित आहेत, मग शास्त्रीय दृष्टिकोणातून देव नावाच्या कल्पनेवर जर चर्चासत्र योजिले तर मग देवाच्या बाजूचे हरू लागले की रडीचा डाव खेळत. हा प्रश्न श्रद्धेच्या प्रांतातला आहे, असे म्हणून का पळवाटा काढतात? निरनिराळ्या प्रकारचे कपडे घालून, भक्तगण जमवून, देवाचा मक्ता आपलाच असे भासवून भाबडय़ा माणसांना फसवणे, त्यांना जादूटोणा केल्यासारखे तेच तेच सांगून डोके बंद करण्यास भाग पाडणे आणि मग बक्कळ पैसे मिळवून पडद्याआड मौजमजा करणे हे जगाच्या पाठीवर सतत घडले आहे. याची अनेक पाश्चिमात्य देशांतली उदाहरणे त्याने दिली आहेत. महम्मद पैगंबराची मध्ये कार्टून्स काढण्यात आली त्यावर मोठे थैमान माजले. ते ज्यांनी माजवले त्यांनी न काढलेली तीन कार्टून्स त्यात घुसडली आणि मुद्दामच रान माजवले आणि त्या भानगडीत काहीही संबंध नसलेल्या निरपराध लोकांचे प्राण गेले याचे दाखले त्याने दिले आहेत. पाश्चिमात्यांचे अनुकरण कळत नकळत आपण करतच आहोत. तेव्हा दुरून का होईना सावधपणे दुसऱ्यांबद्दल(!) लिहिणे सोयीस्कर. या विचारान्ती डॉकिन्स पुराणावर लिहिणार आहे. सोमवारी त्याचे आणखी काही मुद्दे.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

वॉर अँड पीस- रसायन  प्रयोग :  भाग ३
आयुर्वेदीय औषधी महासागरात विविध रोग, लक्षणे, स्वास्थ्य मिळवणे, टिकवणे, राखणे व रसायन वाजीकरणाकरिता शेकडो औषधी प्रयोग सांगितलेले आहेत. त्यांचे ढोबळमानाने तीन प्रकारे वर्गीकरण करता येते. १) प्रकृतीनुसार २) रोगलक्षणानुसार, ३) सर्वसामान्यांकरिता. या रसायन प्रयोगात काही गोष्टींचे भान ठेवावे लागते.
 वातप्रकृती व्यक्तींकरिता शतावरी ही वनस्पती मोठे मोलाचे, रसायन चिकित्सेत योगदान देत असते. याशिवाय आवळा, गोखरू, आस्कंद, पिंपळी, लसूण, सुंठ, हिरडा या वनस्पतींपासूनचे विविध कल्प, तऱ्हतऱ्हेच्या वातावर जय मिळवण्यास मदत करतात. पोटात घेण्याकरिता नारिकेल तेल, लाक्षादिघृत, हिंगुलशुनादि तेल यांची वेगवेगळ्या अवस्थेत योजना करता येते. सुवर्ण, रौप्यभस्म, मधुमालिनीवसंत, सुवर्णमालिनीवसंत, अभयारिष्ट, अश्वगंधारिष्ट यांचाही अवस्थानुरूप व रोग्याच्या व्यवसायानुरूप प्रयोग लाभप्रद होतो.
पित्तप्रकृती व्यक्तींकरिता उपळसरी, कुडा, चंदन, गुलाब, कोहळा, द्राक्षे, शतावरी, गोरखचिंच या वनस्पतींबरोबरच पंचगव्यघृत, शतावरीघृत, महात्रफल घृत, अर्जुनारिष्ट, कुमारीआसव, गुलाबद्राक्षासव, द्राक्षारिष्ट, सारस्वतारिष्ट यांची मदत, निश्चयाने रसायन चिकित्सेचे चिरकाली फळ देते. लघुमालिनीवसंत गरिबांना परवडणारे पित्तप्रकृती व्यक्तींकरिता मोठेच योगदान आहे.
कफप्रवृत्तीच्या व्यक्तीकरिता कोरफड, तुळस, मीरे, ओली हळद या वनस्पतींच्या कल्पांचा रसायनप्रयोगार्थ जरूर वापर करावा. मध स्वतंत्रपणे किंवा इतर औषधांबरोबर अनुपान म्हणून वापरावा. पिंपळीचे अनेकानेक रसायन प्रयोग सर्वानाच माहीत आहेत. महातिक्तघृत, पिप्पल्यासव, पिप्पलादिकाढा, पंचकोलासव, लघुमालिनीवसंत, अभ्रकमिश्रण, त्रिकटूचूर्ण यांचा अवस्थानुरूप उपयोग उपयुक्त ठरतो. सर्वानाच हवाहवासा वाटणारा च्यवनप्राश सकाळी घेण्याकरिता सहज उपलब्ध होणारे रसायन आहे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – १२ ऑक्टोबर
१९१४> पानिपताच्या बखरीचे संपादन करणारे आणि ‘अजिंठय़ातील चित्रकला’ या अभ्यासपूर्ण पुस्तकासह ‘अजिंठा येथील चित्रे व लेणी’ हे तुलनेने सोपे पुस्तकही सिद्ध करणारे अनुवादक,  रघुनाथ मुरलीधर जोशी यांचा जन्म.
१९२२ > कवयित्री, गीतलेखिका, लघुनिबंधकार शान्ता  शेळके यांचा जन्म. कथा-कादंबरीसह साहित्याच्या सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या शान्ताबाईंच्या नावावर १०० हून अधिक पुस्तके आहेत. ‘एकपानी’ किंवा ‘पावसाआधीचा पाऊस’ सारखे लघुनिबंध संग्रह, ‘किनारे मनाचे’ हे त्यांच्या निवडक कवितांचे संकलन’, कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद, हायकू, त्यांनी लिहिलेली  चित्रपटगीते, त्यांच्या लेखणीतून उमटणारे सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांचे पडसाद असे बरेच काही मागे ठेवून त्या गेल्या.
१९६३ > माधवराव विनायक किबे ऊर्फ इंदुरचे किबे सरदार यांचे निधन. लंकेचा शोध, मोहेंजोदरो संस्कृतीच्या नाशाची कारणे हे लेख आणि मध्य हिंदुस्तानातील गॅरंटीड संस्थाने हा ग्रंथ असे लेखन त्यांनी केले. मराठी  साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९८०> संभाजीराजेंबद्दलचे गैरसमज दूर करणारे ‘शिवपुत्र संभाजी’ हे पुस्तक लिहिणाऱ्या डॉ. कमल श्रीकृष्ण गोखले यांचे निधन.
– संजय वझरेकर