साध्या विणीचा वापर वेगवेगळ्या तऱ्हेच्या कापडांसाठी केला जातो तेव्हा त्या कापडाचा वापर कशासाठी केला जाणार यानुसार त्याच्या स्वरूपात बदल केले जातात. वीण मात्र साधीच असते. साध्या विणीच्या समतोल कापडामध्ये ताणा आणि बाणा एकाच सूतांकाचा वापरला जातो. तसेच ताण्याची आणि बाण्याची घनताही एकसारखीच असते. त्यामुळे हे कापड वरून आणि खालून सारखेच दिसते. अर्थात फिनििशग करताना कापडाच्या एकाच बाजूवर प्रक्रिया करतात. ती बाजू त्या कापडापासून कपडे शिवताना बाहेरची बाजू म्हणून वापरतात.
साध्या विणीच्या असमतोल कापडामध्ये ताणा आणि बाणा यांचा सूतांक एकसारखा असतोच असे नाही. तसेच ताण्याची घनता आणि बाण्याची घनता एकसारखी असेलच असे नाही. यामुळे असे कापड वरच्या आणि खालच्या बाजूने एकसारखे दिसत नाही. जेव्हा ताण्याला प्राधान्य देणारे कापड तयार करतात तेव्हा ताण्याची घनता बाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. तसेच ताण्याचा सूतांक हा बाण्याच्या सूतांकापेक्षा तलम असतो. यामुळे ताण्याचा एक प्रकारचा वरचष्मा या कापडात असतो. (वार्प) त्याचा परिणाम म्हणून ताण्याच्या दिशेने हे कापड जास्त आटते. याउलट जेव्हा बाण्याला प्राधान्य देणारे कापड तयार करतात तेव्हा बाण्याची घनता ताण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. तसेच बाण्यावरचा ताण हा ताण्यावरील ताणापेक्षा कमी असतो. या प्रकारचे कापड बाजारात कमी प्रमाणात आढळते. कारण हे कापड तयार करायला जास्त वेळ लागतो म्हणून याचा खर्च वाढतो, परिणामी याचा दर जास्त होतो.
साध्या विणीचे एक सर्वदूर माहीत असलेले कापड म्हणजे ‘केम्ब्रिक’ बेल्जियममधील कॅम्ब्रथी या ठिकाणी हे कापड प्रथम तयार झाले. त्यामुळे त्याला केम्ब्रिक या नावाने संबोधले जाते. मध्यम दर्जाच्या सूतांकाचे सूत वापरून याची निर्मिती केली जाते. ताण्याचा सूतांक हा बाण्याच्या सूतांकाएवढाच किंवा थोडा कमी असतो. म्हणजे ताणा ३० सूतांकाचा असेल तर बाणा ३५ सूतांकाचा. त्याचबरोबर ताण्याची घनता आणि बाण्याची घनता यामध्ये फरक असतो. हा फरक तीन ते चार प्रति सें.मी. इतकाच असतो. इथेसुद्धा बाण्याची घनता जास्त आणि ताण्याची कमी असे प्रमाण वापरले जाते. शìटगसाठी हा कापडाचा प्रकार नेहमी वापरला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clothing views
First published on: 03-08-2015 at 03:02 IST