आपल्या पेशीतीलं सर्व जैविक, जैवरसायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए.’ पेशीत असणाऱ्या केंद्रकात हा महारेणू सामावलेला असतो. खरे तर डीएनए एकच रेणू नसून अनेक रेणू एककांची एक भलीमोठी साखळी असते. आणि यातील प्रत्येक एकक (म्हणजे प्रत्येक मणी) चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो. जशी एखादी मण्यांची माळ असावी तशी व ही साखळी गुंडाळून केंद्रकात सामावलेली असते. डीएनएचा रेणू दुपदरी असून त्याचे दोन पदर एकमेकांभोवती एका गोफाप्रमाणे गुंफलेले असतात. त्याचा प्रत्येक पदर डीऑक्सिरायबोज हा साखरेचा रेणू व फॉस्फेट ग्रुप यांचा असतो. हे दोन पदर एकमेकांशी नत्रयुक्त घटकांनी जोडलेले असतात. एखादा गोल फिरत जाणारा जिना असतो ना त्याप्रमाणे या रेणूची रचना असते. जिन्याचे दोन्ही कठडे डीऑक्सिरायबोज व फॉस्फेटचे आणि पायऱ्या नत्रयुक्त घटकांच्या. डीऑक्सिरायबोज ही साखर ५ कार्बन अणू, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बनलेली असते. यातील ५ कार्बन अणू एकमेकांशी बंध जोडून एक वलय तयार करतात. (ग्लुकोज ही साखर ६ कार्बन अणूंची तर चहातली साखर म्हणजे सुक्रोज ही १२ कार्बन अणूंची बनलेली असते). तिच्या पाचव्या कार्बन अणूला फॉस्फेट ग्रुप जोडला जातो. जेव्हा डीएनएची साखळी बनते तेव्हा फॉस्फेट   ग्रुप एका डीऑक्सिरायबोजचा पाचवा कार्बन अणू आणि दुसऱ्या डीऑक्सिरायबोजचा तिसरा कार्बन अणू यांच्याशी बंध तयार करून साखळीच्या कडय़ा बनवतो.
डीऑक्सिरायबोजच्या दुसऱ्या कार्बन अणूला नत्रयुक्त घटक जोडलेले असतात. हे नत्रयुक्त घटक ४ प्रकारचे असतात. त्यातील अ‍ॅडेनीन आणि ग्वानीन हे प्युरीन या वर्गातील असतात. डीऑक्सिरायबोजचे जसे एक वलय असते तशी या अ‍ॅडेनीन आणि ग्वानीनची रचना २ वलयांची असते. दुसरे दोन नत्रयुक्तघटक म्हणजे थायमिन आणि सायटोसिन हे पिरिमिडीन या वर्गात मोडतात.
पिरिमिडीन एक वलयाचा बनलेला असतो. जेव्हा दोन नत्रयुक्त घटक एकमेकांशी बंध तयार करतात तेव्हा तो बंध एक प्युरीन आणि एक पिरिमिडीन यांच्यामध्ये बनतो. त्यामुळे डीएनएच्या दोन्ही कठडय़ातील अंतर सारखे राखले जाते.

मनमोराचा पिसारा: काही ‘सु’वचनं .. काही सिनिकल
आज आपण एका विलक्षण वळणावर उभे आहोत. जनमताचा कौल मिळालेला आहे. कुठे जल्लोष आहे तर कुठे नैराश्य.. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा वास्तवाच्या भूमीवर खाली बसेल. आपला अवाढव्य देश जगन्नाथाच्या रथासारखा पुढे चालेल तो केवळ लोकांच्या इच्छा-सामर्थ्यांवर आणि शहाणपणावर. अशा वेळी लोकशाही, राजकारण, निवडणूकस्वातंत्र्य याविषयी चार लोकांची सुवचनं तपासू, काही आशावादी तर काही सिनिकल..
निवडणुकीतील यशापयशावर काही राजकीय टीकाकार आरामखुर्चीत बसून टीका करतील. त्यांच्या नेमक्या भाष्यापेक्षा, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत धुळीनं माखलेल्या, घामानं चिंब झालेल्या, निष्ठावान कार्यकर्त्यांनं समाजाविषयी आणि लोकशाहीविषयी काढलेले सहजउद्गार अधिक मोलाचे असतात.  -थिओओर रुझवेल्ट. लोकशाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला ‘मूर्खपणे’ वागण्याची मिळणारी समानसंधी!   -आर्ट स्पेंडर. लोकशाही म्हणजे चर्चा घडवणारे सरकार.. पण ते प्रभावी तेव्हाच ठरते, जेव्हा बोलणारे गप्प बसतात.  -क्लेमंट अ‍ॅटली, इंग्लंडचे पंतप्रधान.  लोकशाही म्हणजे मनात पुन:पुन्हा उद्भवणारी शंका की अध्र्याहून अधिक लोक उरलेल्या अध्र्या लोकांपेक्षा अर्धा वेळतरी शहाणे असतात का?  -न्यूयॉर्कर. लोकशाही हे एक साधन आहे, ज्यायोगं आपल्या लायकीप्रमाणे आपल्यावर राज्य करणारं सरकार आपल्याला निवडता येते.  -जॉर्ज बर्नार्ड शॉ. लोकशाही म्हणजे एक केवळ स्वप्न आहे.  -गुस्टाव फ्लॉबर्ट.
निवडणूक म्हणजे लोकांना पुढील (पाच) वर्षांकरिता दोष देण्याकरता सरकारला निवडून द्यायची प्रक्रिया.  -लॉरेन्स पीटर. राज्य करण्याचे अनेक मार्ग आणि पद्धतींवर समाजानं प्रयोग केले आहेत. लोकशाही ही अचूक (पर्फेक्ट) पद्धती आहे असा दावा कोणी करीत नाही. इतर पद्धतीपेक्षा ‘लोकशाही’ अधिक वाईट आहे, पण त्या पद्धतीही अयशस्वी ठरल्या आहेत.  -विन्स्टन चार्चिल. देव आपल्या बाजूला आहे का? हा चिंतेचा विषय नसून आपण देवाच्या बाजूला आहोत का? याचा विचार व्हायला हवा. देवाची बाजू नेहमीच बरोबर असते.  -अ‍ॅब्राहम लिंकन. राष्ट्रप्रेम ही पॅशन आहे, त्यानं आंधळं व्हायचं नसतं, आंधळ झाल्यास सत्य दिसत नाही. चूक गोष्ट चूक असते, कोणी चूक केली याला महत्त्व नसतं.  -माल्कम एक्स. राजकारणात काही तरी बोलून (बडबडून) हवं असेल तर पुरुषाला सांगा, काही निश्चित करून हवं असल्यास महिलेला सांगा.  -मार्गारेट थॅचर. अशी वेळ येते, जेव्हा नेत्यानं ठाम भूमिका घेतली पाहिजे, ती भूमिका सुरक्षितपणा, ‘पोलिटकली करेक्ट’ असण्यापेक्षा, आपल्या आतल्या सदसद्विवेकाला पटणारी असली पाहिजे.  -मार्टिन ल्युथर किंग.  जेव्हा लोक सरकारला घाबरतात ते (सरकार) दडपशाही समजावं. जेव्हा सरकार जनतेला घाबरतं तेव्हा (अभिव्यक्ती) स्वातंत्र्य असतं.  -थॉमस जेफरसन. सरकारनं काय करावं, यावर शहाणपणानं बोलणारे लोक टॅक्सी चालवतात, नाही तर लोकलनं प्रवास करतात. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे.  – जॉर्ज बर्न्‍स. धर्मसत्ता आणि राजसत्ता या स्वतंत्र असाव्यात. त्यांनी कधीच एकत्र येऊ नये. कारण दोन्ही सत्ता एकेकटय़ाने लोकांची वाट लावायला समर्थ आहेत.
-जॉर्ज कार्लिन.
 युद्ध (प्रत्यक्ष लढाई अथवा निवडणूक) जिंकणं कधीच पुरेसं नसतं. युद्धानंतर (निवडणुकीनंतर) येणाऱ्या शांततेचं व्यवस्थापन, हेच अधिक महत्त्वाचं      असतं. – अ‍ॅरिस्टॉटल.
डॉ.राजेंद्र बर्वे

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

प्रबोधन पर्व: ‘ज्ञानकोशकार’ श्रीधर व्यंकेटश केतकर
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे महाराष्ट्राला ज्ञानकोशकार म्हणून मुख्यत: माहीत असले तरी त्यांनी समाजशास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणूनही लक्षणीय काम केले आहे. त्यांनी अवघ्या सातच कादंबऱ्या लिहिल्या, पण त्यांनी मराठी साहित्यात तोवर न स्पर्शिलेल्या विषयांना हात घालण्याचे काम केले. राष्ट्रोद्धारासाठी जगातील सर्व ज्ञानाची माहिती करून घेणे आणि त्यांची संगती लावणे या सिद्धांतातून आणि महाराष्ट्राचे बौद्धिक साम्राज्य स्थापन करण्यासाठी केतकरांनी कंपनी स्थापून ज्ञानकोशाची निर्मिती केली. एवढेच नव्हे तर ज्ञानकोशाच्या संचाची दारोदार जाऊन विक्रीही केली. ‘महाराष्ट्रीय वाङ्मयसूची’, ‘महाराष्ट्रीयांचें काव्यपरीक्षण’, ‘भारतीय समाजशास्त्र’ या लिखित पुस्तकांतून आणि ‘डॉ. केतकर – व्यक्ति आणि विचार’ व ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – वाङ्मयविषयक लेख’ या लेखसंग्रहांतून केतकरांच्या बौद्धिक आवाक्याची कल्पना येते. प्रसिद्ध टीकाकार श्री. के. क्षीरसागर लिहितात, ‘‘ज्ञानकोश, भारतीय समाजशास्त्र, जातिभेदाचा इतिहास (इंग्रजी), नि:शस्त्रांचें राजकारण, विजयी हिंदुस्थान (इंग्रजी) वगैरे ग्रंथ एकमार्गी संशोधनाकरितां नसून आधुनिक राष्ट्रांच्या स्र्पधेत उभ्या असलेल्या आपल्या या प्राचीन मातृभूमीच्या उद्धारकार्यात आवेशानें शिरूं इच्छिणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणांकरितांच आहेत हें वाचकांना पटल्यावांचून राहणार नाहीं.’’ तर तत्त्वज्ञ कादंबरीकार वा. म. जोशी केतकरांच्या लेखनाविषयी म्हणतात, ‘‘डॉ. केतकर हे विचारविषयक सत्याविषयी दक्ष असत, परंतु सत्यकथनाच्या रीतीविषयी बेफिकीर असत. एखाद्या किरकोळ विषयासंबंधीही माहिती मिळविण्याकरिता ते दहावीस पुस्तके पालथी घालीत ; एखादा विचार तर्कशुद्ध आहे किंवा नाही हे पारखण्याकरिता ते पुष्कळ वेळा अनेक लोकांशी वादविवाद करीत; परंतु या माहितीची किंवा या विचारांची सुंदर मांडणी किंवा सजवणूक करण्याकरिता वेळ दवडणे त्यांना आवडत नसे, किंवा परवडत नसे म्हणा पाहिजे तर!’’ डॉ. केतकरांनी आपले संपूर्ण आयुष्य हे ज्ञानाभ्यास, संशोधन, लेखन आणि त्याचा प्रसार-प्रचार यासाठी खर्च केले.  प्रसंगी उपाशीपोटी राहून त्यांनी आपले काम नेटाने पूर्ण केले.