जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील कोटा पद्धत काढून टाकण्याच्या काळामधील (१९९५ ते २००५) सुरुवातीचा काळ भारतीय वस्त्रोद्योगाला कठीण गेला व हा उद्योग मोठय़ा मंदीमध्ये सापडला. परंतु थोडय़ाच काळात उद्योजक सावरले, त्यांनी मोठय़ा प्रमाणावर आधुनिकीकरणाच्या योजना राबविल्या. शासनाचेही या कामी मोठे सहकार्य लाभले. शासनाने आधुनिकीकरणासाठी आíथक सवलती व इतर अनेक सुविधा दिल्या व भारतीय वस्त्रोद्योग पुन्हा एकदा दिमाखाने उभा राहिला.
जागतिकीकरणानंतर भारतीय उद्योगाचा विकास मोठय़ा प्रमाणावर झाला. सूत- गिरण्यांतील चात्यांची संख्या जी दोन कोटींच्या घरात होती ती आज ४.९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशीच प्रगती यंत्रमागांच्या संख्येत झाली. विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायात आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले. प्रोजेक्टाइल, रेपियर, एयरजेट, वॉटरजेट यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या धोटाविरहित यंत्रमागांची उभारणी सुरू झाली. १९९५ च्या आसपास काही शेकडय़ाच्या घरात असलेली आधुनिक यंत्रमागांची संख्या आज सुमारे एक लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
या काळात देशांतर्गत कापसाचे उत्पादनसुद्धा वाढले. १९९५ मध्ये १९५ लाख गाठींच्या आसपास असलेले कापसाचे उत्पादन आज ४१५ लाख गाठींवर जाऊन पोहोचले आहे. लोकर, रेशीम, ताग यांसारख्या नसíगक धाग्यांबरोबर व्हिस्कोज, नायलॉन, पॉलिस्टर यांसारख्या तंतूंचे उत्पादनही अनेक पटींनी वाढले. एकंदरीत जागतिकीकरण हे भारतीय वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने एक वरदानच ठरले.
सन २००७-०८ पासून सन २०१३-१४ पर्यंत जगातील कापूस उत्पादन एकंदरीत सारखेच राहिले. जे काही बदल झाले ते नगण्य होते, पण कापसाचा वापर मात्र या सात वर्षांच्या कालावधीत काही प्रमाणात घटला, तर सूत, कापड व तयार कपडे यांच्या निर्यातीत काही चढउतार पाहायला मिळाले, तरी मोठा फरक पडला नाही. जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन २०१३-१४ साली २ कोटी ६२ लाख टन झाले, तर कापसाचा खप २ कोटी ३५ लाख टन एवढा होता. याचबरोबर जागतिक पातळीवर ८९ लाख टन कापसाची निर्यात केली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बखर संस्थानांची: स्त्री राज्यकर्त्यांची परंपरा
भोपाळच्या चार राज्यकर्त्यां बेगमांनी त्यांच्या १०७ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत भोपाळ संस्थानाचा मोठा उत्कर्ष केला. तसे पाहायला गेले, तर भोपाळ राज्य स्थापनेपासूनच राजघराण्यातल्या स्त्रिया राजकीय घडामोडीत लक्ष घालीत होत्या.
राज्याचा संस्थापक दोस्त मोहम्मद याने िहदू आणि मुस्लीम स्त्रियांशी लग्ने करून अकबराचा आदर्श ठेवला होता. त्याची पत्नी फतेहबीबी त्याला दरबारच्या कामकाजात सल्ला देई, स्वत: अनेक वेळा दरबारात उपस्थित राही आणि विशेष म्हणजे युद्धप्रसंगी घोडेस्वारी करीत असे.
 दोस्त मोहम्मदची िहदू सून मामोलाबाई तर पडद्याआडून, अनधिकृतरीत्या राज्याचा कारभार चालवीत असे. नवाब पतीला तिने दिलेले राजकीय सल्ले फार महत्त्वाचे ठरले. तिच्याच सल्ल्यामुळे भोपाळचे राज्यकत्रे पन्नास वष्रे मराठे, निजाम आणि ब्रिटिश यांना झुलवत ठेवून हुलकावणी देण्यात यशस्वी झाले. जनरल गोडार्ड हा ब्रिटिश सेनाधिकारी आपल्या फलटणीबरोबर भोपाळशेजारून जात असताना मामोलाबाईने केलेल्या अगत्याने भारावून गेला. त्या प्रसंगापासून ब्रिटिश राजवटीचे संबंध भोपाळ नवाबांशी संस्थानाच्या अस्तापर्यंत सलोख्याचे राहिले.
वर उल्लेख केलेल्या स्त्रियांनी आपले कर्तृत्व पडद्याआड राहून अप्रत्यक्षरीत्या केले; परंतु कुदसिया आणि नंतरच्या तीन बेगमांनी मात्र स्वत: नवाबपदी राहून आपल्या कार्यकाळात भोपाळला एक प्रबळ, संपन्न आणि वैभवशाली राज्य करून ठेवले.
सुनीत पोतनीस  sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity indian textile industries after globalisation
First published on: 19-01-2015 at 12:47 IST