scorecardresearch

वस्त्रोद्योगाचा आवाका

आजच्या वस्त्रोद्योगाचा आवाका फार मोठा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वस्त्रांचा उपयोग केला जातो.

वस्त्रोद्योगाचा आवाका

वस्त्रोद्योग म्हटले की आपल्या डोळ्यापुढे सर्वसाधारणपणे शर्ट, पँट, साडी, धोतर, सलवार-कमीज यांसारखे कपडे, अंगावर घालावयाचे कपडे किंवा आपण घरात वापरत असलेले टॉवेल, चादर, सतरंजी, बेडशीट यांसारखे कपडे उभे राहतात. परंतु आजच्या वस्त्रोद्योगाचा आवाका फार मोठा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वस्त्रांचा उपयोग केला जातो. या प्रत्येक उपयुक्ततेसाठी तंतूंमध्ये व त्यापासून निर्माण होणाऱ्या सुतामध्ये काही वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म असावे लागतात. त्याप्रमाणे तंतूंची निवड करावी लागते. एवढेच नव्हे तर िपजण्यापासून ते सूतकताईपर्यंतच्या परिवर्तनशील प्रक्रियांमधून जाताना गुणवत्ता संवर्धनासाठी अनेक परिमाणांची मूल्ये कठोरतेने पाळावी लागतात. वस्त्राच्या उपयोगावरून ते तयार करणाऱ्या उद्योगाची तीन भागांत वर्गवारी केली जाते. 

१. वस्त्र प्रावरणे म्हणजेच अंगावर घालावयाचे कपडे. २. गृहोपयोगी वस्त्रे – घरात वापरायचे पण अंगावर घालण्याव्यतिरिक्त इतर उपयोगासाठीचे कपडे. ३. तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे- अवकाश, वैद्यक, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील वापरायचे कपडे.

अंगावर नेसायच्या वस्त्रांबरोबरच आपण घरांमध्ये पडदे, टेबलवर पसरवायचे कापड, सोफा कव्हर, काप्रेट अशा अनेक कारणांसाठी कापडाचा वापर करतो. याबरोबरच आज इतर अनेक क्षेत्रांत कापडाचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. कृषी, औद्योगिक, वैद्यकीय, मोटारगाडय़ा, क्रीडा, इलेक्ट्रॉनिक यांसारख्या अनेक क्षेत्रांत कापडाचा वापर मोठय़ा गतीने वाढत आहे. क्षेत्र कुठलेही असो, सामान्यत: उपयोगात आणला जाणारा घटक हा प्रामुख्याने कापडाच्या स्वरूपात असतो. कापड बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत, परंतु विणाई (व्हििवग), गुंफाई (निटिंग) व विनावीण (नॉनवुव्हन) या तीन प्रकारे बहुतेक कापड बनविले जाते. यामध्येसुद्धा विणाई प्रक्रियेने बनविलेल्या कापडाचा वाटा सर्वात मोठा आहे. कापड हे सूत किंवा धागा या घटकांपासून बनते आणि सूत किंवा धागा हा तंतूंपासून बनविला जातो. तंतू हा सर्व वस्त्रोद्योगचा मूलभूत घटक आहे आणि तंतूंवर सर्व वस्त्रोद्योग अवलंबून आहे. सुतामध्ये व कापडामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंतूंच्या दर्जावर सुताचा व कापडाचा दर्जा अवलंबून असतो आणि कापडाच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये तंतूंच्या किमतीचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असतो. हे लक्षात घेतल्यावर वस्त्रोद्योगामधील तंतूंचे महत्त्व लक्षात येईल.

संस्थानांची बखर: टोडी फतेहपूरच्या गुरजा
सध्याच्या झांशी जिल्ह्यातील झांशी शहरापासून शंभर किमी. अंतरावरील टोडी फतेहपूर येथे हे छोटे संस्थान होते. ३०० वर्षांपूर्वी बांधलेला, विशिष्ट रचना असलेला अभेद्य किल्ला ही टोडी संस्थानची महत्त्वाची ओळख आहे. पूर्वेस पथराई नदी, पश्चिमेस टोडी तलाव आणि उत्तर दक्षिणेस असलेल्या पर्वत रांगा यांमुळे नसíगक संरक्षण मिळालेला हा किल्ला अभेद्यच राहिला. आठ फूट रुंदीच्या आणि बारा फूट उंचीच्या, संपूर्णपणे दगडात बांधलेल्या पाच कोटांनी वेढलेला हा किल्लाही दगडी बांधकामाचा होता. किल्ल्याच्या मुख्य िभतीत आणि प्रत्येक कोटाच्या िभतीत जागोजागी असलेल्या मोठय़ा थोरल्या गुरजा हे या किल्ल्याचे वैशिष्टय़. गुरजा म्हणजे बाहेरून पटकन लक्षात न येणारे िभतींमध्ये बांधलेले लहान मोठे कोनाडे. यातील दहा गुरजा किल्ल्याच्या मुख्य िभतीला आतून गोलाकार होत्या. या गुरजांमध्ये प्रत्येकी एक तोफ आणि दोन सनिक असत. तोफेचे फक्त तोंड िभतीतून बाहेर काढलेले असे. काही गुरजा दोन मजल्यांच्या मोठय़ा असत. एका वेळी दहा बंदूकधारी त्यात उभे राहण्याची क्षमता होती. किल्ल्याबाहेरील कोटांच्या पाच िभतींमध्येही प्रत्येकी वीस गुरजा बंदूकधाऱ्यांसाठी आणि दहा गुरजा तोफांसाठी होत्या. किल्ल्यात प्रवेश करण्याचे दोन भव्य दरवाजे. एक सोला सिढीया आणि दुसरा साथीया दरवाजा. अशी चोख संरक्षण व्यवस्था असलेल्या किल्ल्याचे अनेक अवशेष आजही टिकून आहेत. विशिष्ट रचनेच्या गुरजांच्या किल्ल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या या छोटय़ा टोडी फतेहपूर संस्थानाचे क्षेत्रफळ केवळ ९३ चौ.कि.मी. आणि १९०१ साली लोकसंख्या ७ हजार होती.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2015 at 12:28 IST

संबंधित बातम्या