मंजुश्री पारसनीस, मराठी विज्ञान परिषद

सागरी गवताच्या ‘पोसिडोनियेसी’ कुलात एकूण नऊ प्रजाती सापडल्या असून त्या भूमध्य समुद्र आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आढळतात. समुद्रकिनारी कुजणाऱ्या पानांचे तंतुमय गोळे हे पोसिडोनियाच्या उपस्थितीचे लक्षण आहे. ही सागरी गवताची प्रजाती धोक्यात असलेल्या प्रजातींत २०१५ पासून गणली जाते.

Over 100 whales rescued off Australian coast
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून १०० हून अधिक व्हेलची सुटका
grape, grape export, America, Europe,
अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?

पोसिडोनिया ऑस्ट्रॅलिस ही प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीच्या आसपासच्या पाण्यात आढळते. तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या शार्क बे प्रदेशात, हौटमॅन अब्रोल्होस बेटांच्या आसपास आणि स्वान कोस्टल प्लेनच्या किनाऱ्यालगत दक्षिणेकडे आढळते. शिवाय पूर्वेकडेही न्यू साऊथ वेल्स, दक्षिण ऑस्ट्रेलिया, टास्मानिया आणि व्हिक्टोरियाच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेली आहे. ही प्रजाती दाट कुरणात किंवा पांढऱ्या वाळूमध्ये पसरत असून ती सागराच्या कमी खोल भागात आढळते. भूपृष्ठावरील मूलक्षोड (सतत वाढणारा आडवा भूगर्भीय खोड ज्यावर ठरावीक अंतराने पार्श्व कोंब आणि मुळे उगवतात.) वाळूत गवताला चांगले स्थिर करते. मूलक्षोड आणि पाने उभी राहिल्याने गाळ कमी साचतो. शार्क बे उपसागराच्या कुरणातील ही प्रजाती सुमारे २०० चौ.किमी. सागरी तळक्षेत्र व्यापते.

पोसिडोनिया ओश्यनिका ही दुसरी वनस्पती सामान्यत: नेपच्यून गवत किंवा भूमध्य टेपवीड म्हणून ओळखली जाते. ही प्रजाती भूमध्य समुद्रातच आढळते. ती पाण्याखाली मोठे कुरण तयार करते जे या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रजातीचे फळ पाण्यात मुक्तपणे तरंगते आणि इटलीमध्ये ते ‘समुद्रातील ऑलिव्ह’ म्हणून ओळखले जाते. वनस्पतीच्या पर्णसंभारातील तंतुमय पदार्थाच्या गोळ्यांना ‘इगाग्रोपिली’ किंवा ‘नेपच्यून गोळे’ म्हणतात. ते जवळच्या किनाऱ्यापर्यंत वाहत जातात. एक लाख वर्षे जुनी पोसिडोनिया ओश्यनिका ही इबीझा बेटाच्या दक्षिणेला आठ किलोमीटर क्षेत्रफळात आढळली आहे. या सागरी गवताचे मूलक्षोड उभे आणि आडवे वाढतात. उभी वाढ वनस्पतीला जमिनीत स्थैर्य देते. या दोन्ही प्रकारच्या वाढीमुळे मूलक्षोड, मुळे आणि अडकलेल्या गाळांचे जाळे निर्माण होते. २०१३ साली केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पोसिडोनियेसी या कुलातील या गवताळ वनस्पती पर्जन्यवनांपेक्षा ३५ पट अधिक कार्यक्षमतेने कार्बन वातावरणातून शोषून घेतात. भारतात मात्र चिल्का सरोवर आणि मन्नारच्या सामुद्रधुनीमधील असे गवत झपाटय़ाने नष्ट होत आहे.