मंजुश्री पारसनीस, मराठी विज्ञान परिषद

‘हायड्रोचॅरिटेसी’ या कुलात फुले असलेल्या वनस्पतींचा समावेश होतो. ज्यामध्ये एकूण १३५ ज्ञात प्रजाती आहेत. हायड्रोचॅरिटेसी या कुलातील गवत एकदलीय असून ते प्रामुख्याने उष्ण कटिबंधात आढळते. अनेक जलीय वनस्पतींप्रमाणे ते आकाराने विभिन्न असते. या प्रजाती वार्षिक किंवा बारमाही आहेत. पाने दोन ओळींमध्ये, एक ताठ मुख्य कोंब आणि सर्पाकारात मांडलेली असतात किंवा भोपळय़ाच्या पानांसारखी दिसतात. पाने साधी असून सामान्यपणे पाण्यात बुडालेली असतात. कधी ती तरंगताना किंवा अर्धवट बुडालेली आढळतात. फुले उभयिलगी किंवा एकिलगी असतात. मण्यांच्या रांगेप्रमाणे असणारे परागकण साखळीच्या स्वरूपात वाहून नेले जातात. बिया सामान्यत: सरळ आणि असंख्य असतात. परागकण विशेष प्रकारचे असतात. काही प्रजाती शोभेच्या वनस्पती तर इजेरिया, एलोडिया आणि हायड्रिला या प्रजाती धोकादायक तण म्हणून ओळखल्या जातात.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

हायड्रिला, नेचमंद्र आणि व्हॅलिस्नेरिया या सागरी वनस्पती आक्र्टिक आणि अंटाक्र्टिक क्षेत्र वगळता संपूर्ण जगातील महासागरांच्या किनारपट्टीवर आढळतात. समशीतोष्ण पाण्यातील अनेक प्रजातींपैकी एक प्रजाती फिलोस्पॅडिक्स ही खडकांवर उगवते. हायड्रिला (वॉटरथाइम) अर्धवट तरंगताना किंवा अर्धवट बुडलेली दिसते. ती आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील थंड आणि उबदार पाण्यातच उगवते. काही प्रजाती प्रवाळांच्या भित्तिकांवर वाढू शकतात. सागरी वनस्पती गोळा करून त्यांची वाहतूक करताना त्यांच्यासोबत कमीतकमी ६ इंच जाडीचा चिकटलेला गाळ येतो. वाहतुकीदरम्यान त्या उघडय़ावर धुऊ नयेत, कारण असे केल्याने त्यातील आवश्यक रसायने वाहून जातात. सागरी गवताच्या कुरणावर अवलंबून असणारे प्राणी तुलनेने कमी आहेत. समुद्री कासव हा एकच मोठा शाकाहारी प्राणी त्यावर उपजीविका करताना आढळतो.

विविध प्रकारचे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय समुद्री गवत मॅनाटी आणि डय़ूगाँग या शाकाहारी प्राण्यांचे अन्न आहे. ज्या ठिकाणी या वनस्पती आढळतात तेथे डय़ूगाँग प्रजाती आसरा घेतात. ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यापासून ६० किलोमीटपर्यंतच्या अंतरावर आणि ३७ मीटर खोलीपर्यंतच्या पाण्यात तसेच जेथे पुरेशा सागरी वनस्पती आढळतात तेथे डय़ूगाँग हा प्राणी आढळतो. मॅनाटी या डय़ूगाँगपेक्षाही जास्त प्रमाणात वनस्पती खातात. खारफुटीची पाने, काठावरील खरे गवत यांचाही समावेश त्यांच्या खाद्यात आहे.