बिपिन भालचंद्र देशमाने

सुंदरबन हे खारफुटीचे वन गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या तीनही नद्या बंगालच्या उपसागरात जिथे मिळतात तिथे हे नैसर्गिक खारफुटीचे वन तयार झालेले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यादरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे वन आहे.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

खारफुटीच्या एका झाडाचे नाव बंगालीमध्ये सुंदरी असे आहे. त्यामुळे या खारफुटीच्या वनाला ‘सुंदरबन’ असे नाव पडले. याचा बराचसा भाग बांगलादेशात आणि काही भाग भारतात येतो. १४० हजार चौरस हेक्टरवर हे कांदळवन पसरले असून १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुंदरबनाला मान्यता दिली आहे. सुंदरबन जैवविविधतेने नटलेले आहे. त्यात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. जलचर, भूचर आणि उभयचर प्राण्यांचे ते माहेरघर आहे. सुंदरबनच्या खाडीतील सुसर हा खारफुटीतील वनात सापडणारा सर्वात मोठा प्राणी आहे. मोठय़ा प्राण्यांप्रमाणेच असंख्य लहान प्राणी या वनात सापडतात. येथे सस्तन, सरीसृप, मासे, कोळंबी, खेकडे, मृदुकाय असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने राहतात! त्याचबरोबर रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे सुंदरबनचे सौंदर्य आणखी खुलते. विविध प्रजातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील येथे आढळतात.

आणि हो! आणखी एक रुबाबदार, देखणा प्राणी रॉयल बेंगॉल टायगर तोही या सुंदरबनात मोठय़ा दिमाखात वावरतो. येथील वाघ केवळ जमिनीवरील भक्ष्यांवर अवलंबून न राहता मासेमारी करूनदेखील आपली उपजीविका करतात. या सुंदरबनातच त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले ‘रॉयल बेंगाल टायगर रिझव्‍‌र्ह’ हे राष्ट्रीय उद्यान आहे. जगातील सर्वाधिक वाघ या उद्यानात आढळतात. वाघांचे मुख्य खाद्य म्हणजे चितळ व बाराशिंगा ही हरणे. चितळांची संख्याही बरीच असून त्यांचे खूर थोडेसे वेगळे, दलदलीत व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनुकूल असतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगूस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर यांचा समावेश आहे. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी आणि बिनविषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय, घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातींची कासवेही येथे आढळतात.