‘वुई हॅव मेड अ मशीन दॅट थिंक्स’, असे काल्पनिक वाटणारे विधान १९५०च्या दशकात करणारे बहुरंगी शास्त्रज्ञ, हर्बर्ट अलेक्झांडर सायमन यांची ही कहाणी. राजकीय शास्त्रज्ञ म्हणून उदयास आलेल्या हर्बर्ट सायमन यांचा संगणक विज्ञान, अर्थशास्त्र आणि संज्ञानात्मक मानसशास्त्र या क्षेत्रांवरही प्रभाव पडला.

१५ जून १९१६ रोजी अमेरिकेतील मिल्वॉकी येथे जन्मलेल्या हर्बर्ट यांना शालेय जीवनापासूनच विज्ञानात स्वारस्य होते. महाविद्यालयात त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित केले. १९३६ ला बी. ए. आणि १९४३ ला राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. केले. आपल्या ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बेहेविअर’ या पुस्तकात निर्णय घेण्याची एक नवीन संकल्पनात्मक चौकट त्यांनी प्रस्तुत केली. त्यामध्ये त्यांनी मानवी निर्णयप्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी बंधनकारक तर्कशुद्धतेची संकल्पना मांडली. या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी त्यांनी ‘सॅटिस्फाय’ (समाधान करणे) आणि ‘सफाइस’ (गरज भागवणे) या दोन शब्दांचा वापर करून ‘सॅटिस्फाइस’ ही संज्ञा तयार केली.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
student using mobile
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेही वाचा >>> कुतूहल : अंकीय, भौतिक, जैविक सीमा ओलांडणारी चौथी क्रांती

दरम्यान, त्यांचे अर्थशास्त्राचेही अध्ययन सुरू होते. समस्या निराकरण आणि निर्णयप्रक्रिया यावरील अधिक चांगल्या सिद्धांतावर ते विचार करतच होते. १९५४ च्या सुमारास, ते आणि त्यांचा डॉक्टरेट मिळविलेला विद्यार्थी अ‍ॅलन नेवेल यांनी ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’वर संगणकीय प्रोग्राम लिहिण्याची कल्पना मांडली.

त्यांनी ह्युरिस्टिक प्रोग्रामिंग विकसित आणि लोकप्रिय केले. १९५५-५६ मध्ये, त्यांनी आणि नेवेलने ‘लॉजिक थिअरिस्ट’ (एलटी) हा पहिला यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रोग्राम तयार केला. १९५८ मध्ये ‘जनरल प्रोग्राम सॉल्व्हर’ (जीपीएस) या आणखी एका प्रसिद्ध प्रोग्रामची भर पडली. १९६० पासून त्यांनी आपले संशोधन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षा रुंदावण्यासाठी व एआय कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी समर्पित केले.

सायमन यांनी विविध विषयांवर तब्बल २७ पुस्तके आणि हजारो शोध निबंध लिहिले. इ.स. १९७५मध्ये बहुप्रतिष्ठित एएम टय़ुरिंग पुरस्कार, तसेच १९७८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. उत्तम पियानोवादक, गिर्यारोहक असलेल्या हर्बर्ट सायमन यांचा मृत्यू ९ फेब्रुवारी २००१ ला झाला. मृत्यूनंतर १५ वर्षे म्हणजेच २०१६ पर्यंत, सायमन हे ‘गूगल स्कॉलर’वर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रातील (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) सर्वाधिक उद्धृत व्यक्ती होते. त्यांच्या अफाट कार्याला वाहिलेली ही यथोचित आदरांजलीच होती.

– कौस्तुभ जोशी 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org