२००० सालानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राने पुन्हा झेप घेतली. तोपर्यंत संगणकाचा आकार कमी झाला, त्याची शक्ती अफाट वाढली, त्याच्यातील परस्पर-संवाद सुधारले, सायबर्नेटिक्स, भाषाशास्त्र, याच्यातही कृत्रिम बुद्धिमत्तेने शिरकाव केला. संगणक-व्हिजन, रोबोटिक्स, न्यूरल नेटवर्क, मशीन लर्निग, डीप लर्निग, नॅचरल लँग्वेजेस प्रोसेसिंग अशा अनेक संकल्पना आणि त्यावरील तंत्रज्ञान निर्माण झाले. २००२ साली ‘रुम्बा’ नावाचा व्हॅक्युम क्लिनिंग रोबोट तयार करण्यात आला. तो फार कार्यक्षम होता. घरातल्या कुठल्याही फर्निचरला न धडकता संपूर्ण घराची फरशी चकाचक स्वच्छ करत असे. 

२००४ साली ‘नासा’ने एक बुद्धिमान रोबोट मंगळावर उतरवला होता! आत्तापर्यंत टाइप करून संगणकाशी संवाद साधला जायचा. २०१० मध्ये गूगलने ‘आयफोन’मध्ये ‘अँड्रॉइड’ची नवीन आवृत्ती काढली. त्यात ‘स्पीच रेक्गनिशन’ ही प्रणाली घातली. त्यामुळे टाइप करण्याऐवजी आपण बोलून मोबाइल फोनला सूचना देऊ लागलो! २०११ साली ‘आयबीएम’ या कंपनीने ‘वॅटसन’ नावाचा संगणक तयार केला. आपल्या बोलीभाषेत प्रश्न विचारणारी, उत्तरे देणारी ही यंत्रणा आहे. अमेरिकेत ‘जिओपार्डी’ नावाचा एक टेलिव्हिजन क्विझ शो आहे. या क्विझ शोमध्ये भाग घेऊन वॅटसन संगणकाने जगज्जेत्यांना २०११ साली हरवले आणि दहा लाख डॉलरचे बक्षीस पटकावले. वॅटसन संगणकामध्ये त्यानंतर अनेक सुधारणा झाल्या आहेत. आता हा वॅटसन बघू शकतो, ऐकू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, अनुमान काढू शकतो, शिकू शकतो, शिफारशी करू शकतो.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

२००९ मध्ये गूगलने चालकविरहित गाडीचा प्रकल्प सुरू केला आणि २०१३ ला त्यांच्या गाडीने सर्व चाचण्या उत्तीर्ण होऊन ड्रायिव्हगचा परवानाही मिळवला! २०१४ साली कृत्रिम बुद्धिमत्तेचे पुढचे लेकरू ‘अ‍ॅलेक्सा’ आपल्या भेटीला आले. अ‍ॅलेक्सा बऱ्याच गोष्टी करू शकते. ती माहिती देते, बातम्या सांगते, क्रिकेटचा स्कोअर सांगते, हवामान सांगते, गाणी ऐकवते.  २०१६ साली हॅन्सेन रोबोटिक्स कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मानवसदृश यंत्रमानव तयार केली. तिचा चेहरा हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखा दिसतो. तिचे नाव ठेवले सोफिया. तिचे शरीर यांत्रिक असले तरी ती हुबेहूब माणसासारखी दिसते. बोलताना तिच्या चेहऱ्यावर माणसासारखे सर्व भाव उमटतात! सौदी अरेबियाने या सोफियाला आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले! कृत्रिम बुद्धिमत्तेची घोडदौड सुरूच आहे.

बिपीन देशमाने,मराठी विज्ञान परिषद