जोनाथन स्विफ्ट या आयरिश लेखकाने १७२६ साली एक कादंबरी लिहिली. ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ हे तिचे नाव. यात इंजिनासारख्या यंत्राचा उल्लेख आहे. हे यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे माणसाला ज्ञान आणि कौशल्य देते. जवळजवळ तीनशे वर्षांपूर्वीचा हा उल्लेख! त्यानंतर १८६३ साली सॅम्युअल बटलर या ब्रिटिश लेखकाने ‘डार्विन अमंग दि मशिन्स’ हा लेख लिहिला. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी एक संकल्पना मांडली. १८७२ साली त्यांनी ‘इरेव्हॉन’ नावाची कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी भविष्यातील यंत्रांना जाणीव असेल, भान असेल असे भाकीत केले होते. दीडशे वर्षांपूर्वी! १९२१ साली झेक (चेक) नाटककार कॅरेल कॅपेक यांनी ‘कृत्रिम माणसे’ या कल्पनेवर आधारित ‘रोस्सम्स युनिव्हर्सल रोबोटस्’ हे नाटक सादर केले. या कृत्रिम माणसांना (जी वाफेवर चालणारी यंत्रं होती) त्यांनी ‘रोबोट’ नाव दिले.

एनिग्मा यंत्र 

१९३९ सालापासून ‘आयझॉक एसिमॉव्ह’ यांनी यंत्रमानवावर आधारित लिहिल्या. या सर्व विज्ञानकथा ‘आय रोबोट’ या पुस्तकात त्या संग्रहित केल्या आहेत. त्यांनी ‘रनअराउंड’ नावाची लघुकथा १९४२ साली लिहिली आणि त्यात त्यांनी रोबोट विषयीचे जगप्रसिद्ध तीन नियम मांडले :     

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

(१) रोबोट माणसाला कधीही इजा करणार नाही.

(२) रोबोट माणसाने दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करेल.             

(३) रोबोट स्वत:चे संरक्षण करेल.

या नियमांमध्ये नंतर इतर विज्ञानकथा लेखकांनी भर घातली.  हॅरी हॅरिसन यांनी ‘रोबोटिक्सचा चौथा नियम’  नावाची कथा लिहिली. हा चौथा नियम सांगतो की रोबोट स्वत:चे पुनरुत्पादन करेल; पण हे पुनरुत्पादन रोबोटच्या पहिल्या तीन नियमांत ढवळाढवळ करणार नाही. निकोला केसावरवस्की यांनी ‘रोबोटिक्सचा पाचवा नियम’ या विज्ञानलघुकथेत पाचवा नियम मांडला. पाचवा नियम सांगतो की, ‘रोबोटला कळले पाहिजे की तो रोबोट आहे’!

१९३६ साली विलक्षण प्रतिभाशाली ब्रिटिश गणिती अ‍ॅलन टय़ुिरग यांनी ‘ऑन कॉम्प्युटेबल नंबर्स’ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला. हा संगणकशास्त्राचा पाया समजला जातो.

दुसऱ्या महायुद्धात जर्मन लष्कर एकमेकांशी माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी जर्मन भाषा वापरत नसत. एनिग्मा नावाच्या यंत्राच्या साहाय्याने ही माहिती सांकेतिक गुप्त कोड भाषेत लिहिली जायची. अ‍ॅलन टय़ुिरग यांनी संगणकाच्या मदतीने जर्मन लष्कराची ही गुप्त कोड भाषा ओळखण्यास गणिती पद्धतींना संगणकाची साथ देऊन अधिक अचूक व कार्यक्षम केले.

 बिपीन देशमाने ,मराठी विज्ञान परिषद