संभाषण आकलनाच्या तंत्रज्ञानाची आणि विविध प्रारूपांची ओळख करून घेतल्यानंतर आता पाहू त्याचे फायदे आणि उपयोग. सर्वात मोठा फायदा आहे दिव्यांग व्यक्तींना. ज्यांना संगणक, टॅब्लेट, भ्रमणध्वनी यासारखी साधने वापरताना हातांचा उपयोग करता येत नाही असे लोक ही सर्व उपकरणे आवाजी आज्ञांच्या साहाय्याने वापरू शकतात. डोळय़ांनी आणि कानांनी दिव्यांग असलेल्या लोकांसाठी लिखित मजकुराचे रूपांतर आवाजी मजकुरात आणि आवाजी मजकुराचे रूपांतर लिखित करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

अशीच म्हणजे हस्तमुक्त (हँड्स फ्री) उपयोगाची जिथे जिथे गरज आहे तिथे संभाषण आकलन उपयोगी पडते. उदाहरणार्थ मोटारगाडी चालवताना आपल्याला कोणाला फोन करायचा असेल किंवा मेसेज पाठवायचा असेल किंवा डिक्टेशन द्यायचे असेल किंवा गूगल किंवा तत्सम सर्च इंजिनवर एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल तर ते हाताने करताना मोटारीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अशा वेळी मौखिक आदेश देऊन आपण ही कामे करू शकतो.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

एखाद्या कंपनीला आपण फोन करतो तेव्हा आजकाल हा फोन इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रेकग्निशन म्हणजे आयव्हीआर उचलते आणि आपल्याला विविध पर्याय निवडण्यासाठी विविध बटणे दाबायला सांगते. अशा वेळी आपण बोलून हे पर्याय देऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्या त्यांच्या संकेतस्थळावर मदतीसाठी ‘चॅट’ची सोय उपलब्ध करून देतात. संभाषण आकलनाचा उपयोग करून हीच सुविधा संभाषणाच्या स्वरूपात उपलब्ध करून देता येते. यामुळे ग्राहकाला कोणाशी तरी बोलल्याचे समाधान लाभते.

परकीय भाषा शिकताना त्या भाषेतील शब्दांचे योग्य उच्चारण शिकण्यासाठी संभाषण आकलनाचा उपयोग केला जातो. आरोग्य क्षेत्रातही डॉक्टर किंवा परिचारिका रुग्णाचे निदान आणि उपचारपद्धती तसेच संबंधित पूर्ण माहिती संभाषण आकलनाच्या साहाय्याने व्यवस्थित नोंदवून ठेवू शकतात.

आपल्या रोजच्या जीवनात या तंत्रज्ञानाने केव्हाच प्रवेश केला आहे. अलेक्सा, सिरी, असिस्टंट या सगळय़ांनी घरात आणि भ्रमणध्वनीमध्ये बस्तान बसवले आहे. आवडीची गाणी लावणे, दिवसभरातल्या कार्यक्रमांची आठवण करून देणे, हवा त्याला फोन लावून देणे, हवी ती माहिती शोधून उपलब्ध करून देणे, स्मार्ट घरातील स्मार्ट साधनांचे आणि उपकरणांचे नियंत्रण करणे अशी असंख्य कामे हे साहाय्यक त्यांना दिलेल्या आवाजी आदेशांनुसार चोख करत असतात. या क्षेत्रात आता खूप स्पर्धा आहे. त्यामुळे ग्राहकाला अधिकाधिक उत्तम यंत्रणा उपलब्ध होत आहेत.

शशिकांत धारणे, मराठी विज्ञान परिषद