संभाषण आकलनाच्या तंत्रज्ञानाची आणि विविध प्रारूपांची ओळख करून घेतल्यानंतर आता पाहू त्याचे फायदे आणि उपयोग. सर्वात मोठा फायदा आहे दिव्यांग व्यक्तींना. ज्यांना संगणक, टॅब्लेट, भ्रमणध्वनी यासारखी साधने वापरताना हातांचा उपयोग करता येत नाही असे लोक ही सर्व उपकरणे आवाजी आज्ञांच्या साहाय्याने वापरू शकतात. डोळय़ांनी आणि कानांनी दिव्यांग असलेल्या लोकांसाठी लिखित मजकुराचे रूपांतर आवाजी मजकुरात आणि आवाजी मजकुराचे रूपांतर लिखित करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

अशीच म्हणजे हस्तमुक्त (हँड्स फ्री) उपयोगाची जिथे जिथे गरज आहे तिथे संभाषण आकलन उपयोगी पडते. उदाहरणार्थ मोटारगाडी चालवताना आपल्याला कोणाला फोन करायचा असेल किंवा मेसेज पाठवायचा असेल किंवा डिक्टेशन द्यायचे असेल किंवा गूगल किंवा तत्सम सर्च इंजिनवर एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल तर ते हाताने करताना मोटारीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अशा वेळी मौखिक आदेश देऊन आपण ही कामे करू शकतो.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal introduction to conversational comprehension techniques and various formats amy
First published on: 21-03-2024 at 00:04 IST