नदी आणि समुद्राचा संगम झालेल्या दलदलयुक्त खाडीमध्ये दिमाखात डोलणाऱ्या हिरव्यागार वनस्पतींचे जंगल म्हणजे कांदळवन. भारतात पश्चिम किनाऱ्यावर गुजरात ते केरळ तर पूर्वेस पश्चिम बंगालपासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत यांचेच साम्राज्य आहे. अनुकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन येणाऱ्या संकटांना निर्भीडपणे टक्कर देणे, हे त्यांचे वैशिष्टय़. किनारी भागात या प्रजातींना ‘कांदळ’ या नावाने ओळखले जाते तर या जंगलांमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना ‘कांदळवन’ असे संबोधले जाते.

पानांचा आकार, मुळांची रचना, शेंगेसारखे दिसणारे बीजांकुरित फळ (प्रवध्र्य), अपत्यजनन या सर्व वैशिष्टय़पूर्ण गुणांमुळे सामान्य वनस्पतीपेक्षा खारफुटीचे वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खारफुटींच्या एकूण १९ प्रजाती असून १२ विविध कुलांत त्यांचे विभाजन झाले आहे. या कुलांत ऱ्हायझोफोरेसी हे सर्वात मोठे कुल असून त्यामध्ये ऱ्हायझोफोरा म्युक्रोनाटा, ऱ्हायझोफोरेसी अपिक्युलाटा, ब्रूगेरा जिमनोरायझा, ब्रूगेरा सिलिंड्रिका, सेरिओप्स टॅगल आणि कॅन्डेलिया कॅण्डल अशा एकूण सहा प्रजातींचा समावेश होतो.

keema korma dal tadka shahi paneer and more indias foods best stews in the world taste atlas list check top 50 dishes
शाही पनीर, दाल तडका अन्…! भारतीय खाद्यपदार्थांची बातच न्यारी; जगातील टॉप ५० डिशेसमध्ये ‘या’ नऊ पदार्थांना मान
nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

अत्यंत बिकट वातावरणात वाढत असताना पुनरुत्पादन होण्यासाठी या प्रजाती अपत्यजनन (व्हिव्हिपॅरी) ही पद्धत अवलंबतात. अपत्यजनन प्रक्रियेमध्ये फळ हे झाडावर असतानाच रुजू लागते  व पाण्याची क्षारता कमी झाल्यानंतर झाडापासून विलग होऊन खाली पडते.  त्यांचे रूपांतर रोपटय़ात होते अशा भागाला ‘बीजांकुरित फळ’(प्रोपाग्युल) म्हणतात. या कुलातील प्रजातींचे निराळेपण त्यांच्या बीजांकुरित फळावरून ओळखू येते. एकूण सहा प्रजातींमध्ये बीजांकुरित फळाचा आकार व लांबी वेगवेगळी असते. ऱ्हायझोफोरा म्युक्रोनाटाची ऱ्हायझोफोरेसी कुलातील इतर प्रजातींशी तुलना केली तर बीजांकुरित फळाचा आकार जाड व सगळय़ात मोठा असतो.

ऱ्हायझोफोरेसी कुलातील प्रजातींमध्ये मुळांची विशिष्ट रचना पाहायला मिळते. बहुतांश सर्व झाडांची मुळे पाण्याखाली असतात पण या प्रजातींमध्ये आधारमुळे पाण्यावर दिसतात. दलदलीत वाढत असताना त्यांना स्थिरता देण्याचे काम ही मुळे करतात. दलदलीच्या भागात वाढत असल्यामुळे यांची मुळे भक्कम आणि दणकट असतात. पाणी साचलेल्या मातीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी आढळते, अशावेळी ही मुळे वल्करंध्रांच्या मदतीने हवेतील ऑक्सिजनची देवाण-घेवाण करतात. खाऱ्या पाण्यात वाढत असताना अतिरिक्त क्षार हे मुळांच्या मदतीने विशिष्ट यंत्रणेद्वारे बाहेर फेकले जातात, ज्याला इंग्रजीत अल्ट्राफिल्ट्रेशन म्हटले जाते.

– डॉ. तरन्नुम मुल्ला

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org