पहिल्या दोन औद्योगिक क्रांतींपेक्षा तिसरी औद्योगिक क्रांती एकदम वेगळी होती. या क्रांतीचा मूलाधार होता ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान’ (इनफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी- आयसीटी) आणि अणुऊर्जा. पण मुख्य भर इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘आयसीटी’वर असल्याने हिला ‘अंकीय क्रांती’ म्हणजे डिजिटल रेव्होल्युशन असेही म्हणतात. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात दुसरे महायुद्ध संपल्यानंतर म्हणजे १९५०च्या दशकात झाली.

हेही वाचा >>> कुतूहल: वाफेच्या ‘कृत्रिम शक्ती’मुळे पहिली औद्योगिक क्रांती

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

या काळात जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये अंकीय तंत्रज्ञानाने प्रवेश केला. १९४७मध्ये बेल लॅबोरेटरीने लावलेला ट्रान्झिस्टरचा शोध, त्यानंतर १९५९मध्ये एकात्मिक परिपथ (इंटिग्रेटेड सर्किट) चिपचा शोध आणि नंतरच्या अशा अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्रीमधील (हार्डवेअर) शोधांनी संगणक आणि संदेशवहनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती घडवून आणली. विविध क्षेत्रांतील आवश्यकतेनुसार मेनफ्रेम-कॉम्प्युटर, मिनीकॉम्प्युटर, मायक्रो-कॉम्प्युटर, पर्सनल-कॉम्प्युटर, सुपर-कॉम्प्युटर उपलब्ध झाले. घराघरांमधून, शाळांपासून ते विज्ञान-तंत्रज्ञानातील अवघड प्रमेये सोडवण्यासाठी यांचा उपयोग केला जाऊ लागला. गणनक्षमतेच्या गरजा वाढत गेल्या आणि संगणकाच्या प्रक्रिया क्षमतेत आणि विदा (डेटा) साठवण क्षमतेत हजारो पटींनी वाढ होत गेली. त्याचा आकार कमी कमी होत गेला आणि किंमत सामान्य माणसाच्यादेखील आवाक्यात आली.

हेही वाचा >>> कुतूहल : पोलाद, वीज, रसायनांमुळे दुसरी औद्योगिक क्रांती

याला साथ लाभली इंटरनेटची. १९६९मध्ये ‘अर्पानेट’ च्या स्वरूपात सुरू झालेल्या इंटरनेटने संगणक एकमेकांशी जोडले जाऊन विदेची देवाणघेवाण करू लागले. नंतर कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने संदेशवहन सुरू झाले. १९८९मध्ये वल्र्ड वाईड वेबचा शोध लागला आणि माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. अंकीय तंत्रज्ञानातील लक्षणीय प्रगतीमुळे लवकरच या वेबने प्रचंड   स्वरूप धारण केले. हवी ती माहिती, हव्या त्या वेळी, हवी तिथे क्षणार्धात मिळण्याची सोय झाली आणि माहितीचा महास्फोट झाला. तिसऱ्या क्रांतीदरम्यान आयसीटीने जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली. उत्पादन पद्धती, वितरण, शिक्षण, मनोरंजन, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि आरोग्य, व्यवस्थापन, परिवहन, प्रसारण, इत्यादी सर्व क्षेत्रे, थोडक्यात काय तर संपूर्ण जीवनच अंकीय क्रांतीने आमूलाग्र बदलून टाकले.

या क्रांतीमुळे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून गेल्या. जागतिकीकरणात काही रोजगार संपुष्टात आले तर काही, क्षेत्रांत विशेषत: संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांत प्रचंड मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. इंटरनेटवर (ऑनलाईन) मागणीनुसार (ऑन डिमांड) वस्तू किंवा सेवापुरवठा सुरू झाला. अनेक क्षेत्रांत मोठा बदल घडला तर काही क्षेत्रे तर नव्याने उदयास आली.

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org