चित्रपट हे असे प्रभावी माध्यम आहे की त्यात नवनवीन कल्पना आणि शोध हे त्यांच्या जन्माच्या खूप आधीच दिग्दर्शकाने मांडलेले असतात. याचे एक उदाहरण म्हणजे २ एप्रिल १९६८ ला प्रदर्शित झालेला ‘२००१ स्पेस ओडिसी’ हा हॉलीवूडचा चित्रपट.

सध्याच्या काळात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चर्चेत आहे वापरही वाढत आहे, पण १९६७ साली तयार झालेल्या या चित्रपटात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी भाष्य केले होते. त्यात दिसलेले चांद्रयान आणि गुरुत्वाकर्षणविरहित तंत्रज्ञानाचा उल्लेख आपल्याला काळाच्या खूपच पुढे घेऊन गेला होता. शास्त्रज्ञ नसलेल्या या चित्रपटाच्या लेखकाचे व त्याच्या दिग्दर्शकाचे नक्कीच खूप कौतुक वाटते. त्या चित्रपटात दिसलेला एचएल ९००० हा कॉम्प्युटर जेव्हा चित्रपटातील दोन अवकाशवीरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो चित्रपट काळाच्या कितीतरी पुढे आहे, हे जाणवते.

Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील चित्रपटांची निर्मिती खूपच पूर्वी सुरू झाली. १० जानेवारी १९२७ ला प्रदर्शित झालेला ‘मेट्रोपोलीस’ हा चित्रपट त्याचे चांगले उदाहरण आहे. आधुनिक असणारे २०२६ चे शहर त्यात सुमारे १०० वर्षांपूर्वी दाखविले होते. २००१ साली ‘एआय’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित खास मुलांसाठी स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी बनवलेला चित्रपट विज्ञान कथेवर आधारित होता आणि त्यात एक डेव्हिड नावाच्या मुलाचे पात्र होते. तो यंत्रमानव होता आणि तो कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी हावभाव प्रकट करत असल्याचे दाखविले होते. २०२३ साली येऊन गेलेले एआय आधारित चित्रपट म्हणजे ‘मिशन: इम्पॉसिबल-डेड’, ‘रिबेल मून- भाग १’ आणि ‘द बिस्ट’.

‘एक्स मशिना’ नावाच्या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नॅथन बेटमन नावाचा विज्ञानवेडा संशोधक असतो. त्याने एक अत्याधुनिक ह्युमनॉइड महिला रोबोट ‘अवा’ बनवलेली असते. जी कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असते. ‘केलेब स्मिथ’ या त्याच्या कर्मचाऱ्याला एका स्पर्धेचे बक्षीस म्हणून ‘अवा’ बरोबर एका बाहेरच्या जगाशी संपर्क नसलेल्या पण अत्याधुनिक असलेल्या घरात एक आठवडा रहण्याची संधी मिळणार असते. नॅथन आणि ‘अवा’ म्हणजेच मानव आणि ह्युमनॉइड महिला रोबोट यांच्यातील प्रेमसंबंध मांडणारी ही कथा पुढे अनेक वळणे घेते.

 उज्ज्वल निरगुडकर, मराठी विज्ञान परिषद