phrases of the marathi language useful phrases in marathi famous marathi phrases zws 70 | Loksatta

भाषासूत्र : घरच्या चिंचेने दात आंबतात

वास्तविक सगळीकडची चिंच चवीला सारखीच. घरची ती नावडती आणि बाहेरची मात्र आवडती असा मथितार्थ!

भाषासूत्र : घरच्या चिंचेने दात आंबतात
(संग्रहित छायाचित्र)

काही माणसांना घरातले काहीच पसंत पडत नाही, पण बाहेरच्या गोष्टी मात्र त्यांना गोड लागतात. या माणसांचा स्वभावच असा असतो की घरची चिंच त्यांना आंबट लागते पण तीच चिंच बाहेरच्यांची असेल तर गोड लागते. वास्तविक सगळीकडची चिंच चवीला सारखीच. घरची ती नावडती आणि बाहेरची मात्र आवडती असा मथितार्थ!

चिंचेविषयीची ही म्हण आता घराघरातून वापरात आणावी लागेल अशी आहे. घराघरात आजकाल हा एक ठरलेला वाद असतो. आणि तो वाद बहुदा घरातली आई आणि तारुण्यात आलेली मुले यांच्यामध्ये विशेषत्वाने होतो. आईने काहीही करावे आणि मुलांच्या पसंतीला ते उतरू नये ही गोष्ट आता नित्याचीच झालेली आहे. आईच्या हातच्या थालीपीठाची जागा आता पिझ्झ्याने घेतलेली आहे. एक काळ असा होता, की दमून भागून घरी आल्यावर आजीने भरवलेला दहीभात खाऊन मन आणि क्षुधा दोन्ही गोष्टी तृप्त होत असत. पण आता तसे होत नाही. घराघरातून ती आजी आणि तिने कालवलेला तो दहीभात, दोन्ही गोष्टी कुठे गायबच झालेल्या आहेत. सगळय़ा घरातून अशी स्थिती असेल असे नाही, पण बहुतेक घरातून आज अशीच स्थिती आहे हे नाकारून चालणार नाही. घरी केलेली पुरणपोळी, कांद्याची भजी, त्यांचा तो खमंग वास, ते गरम गरम थालीपीठ.. त्यावरचा तो लोण्याचा गोळा..ती लिंबाच्या लोणच्याची फोड, सारे सारे या नवीन पिढीच्या धावपळीच्या जीवनात हरवून जाणार की काय, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे असेच म्हणावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वस्तू पैसे टाकून मिळतील हो; पण आईच्या, आजीच्या हाताची चव, ती लज्जत कशी मिळणार? मग एखाद्या नातवंडाच्या पाठीत धपाटा घालून आजी म्हणणारच ना त्याला, की बरोबरच आहे रे, ‘घरची चिंच तुला आंबटच लागणार बाबा! घरचं ते आळणी आणि बाहेरचं ते मिठ्ठापाणी!’

– डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र : ‘निर्दयी नाही; निर्दयच

संबंधित बातम्या

कुतूहल : मासे जाणून घेऊ या..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022: मेस्सी आणि फर्नांडिसच्या जादुई गोलमुळे अर्जेंटिनाच्या बाद फेरीतील आशा कायम
पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप, इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदार राजीनामा देणार!
IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारताला आज विजय आवश्यक
UP Crime: कानपूरमध्ये शिक्षकाने गाठली क्रौर्याची सीमा, दोनचा पाढा विसरल्यानं विद्यार्थिनीच्या हातावर…
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार