आजही दुग्ध व्यवसायात दुधाच्या प्रतीनुसार भाव या संकल्पनेचा वापर होत नाही. दिवसेंदिवस दुधाच्या भेसळीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्याने दूध उत्पादित केल्यानंतर पुढील सर्व पातळ्यांवर दुधात जास्ती जास्त भेसळ होऊन शेवटी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे दूध पोहोचते. दूध गुणप्रत नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
दुग्ध व्यवसायामध्ये चारा आणि खाद्याच्या नियोजनाचा अभाव हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकरी आणि शासनाला जास्त पसा देणाऱ्या या व्यवसायासाठी लागणाऱ्या चारा पिकाखाली फक्त दोन-तीन टक्केच क्षेत्र आहे. चारा पिकाला अनेक ठिकाणी पाण्याचीही उपलब्धता करून दिली जात नाही. दूध उत्पादकही वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन करत नाही. उपलब्धतेनुसार एकाच प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घालतात. त्याचा परिणाम गाईंच्या आरोग्यावर तसेच दुग्ध उत्पादनावर होतो.
ऊस कारखाना सुरू असताना जनावरांना केवळ उसाचे वाढे खाऊ घालून दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु वाढय़ामध्ये असलेल्या ऑग्झिलेटमुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊन गाईंचे आयुष्य कमी होते. गाईंना एकदल, द्विदल आणि कोरडा चारा संतुलित प्रमाणात देण्यासाठी योग्य नियोजन होत नाही. गरजेनुसार पोषणाचा अभाव ही एक मोठी समस्या दुग्ध व्यवसायामध्ये आहे.
नसíगक पद्धतीने जनावराचे पालन केल्यास दुग्धोत्पादन वाढते. परंतु आपल्या पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांना गोठय़ामध्ये बांधून ठेवले जाते. शिवाय बंदिस्त गोठय़ात गाई जेथे चारा खातात, तेथेच त्यांचे शेण पडते. या शेणावरच त्या बसतात. त्यामुळे त्यांच्यात कासदाह या घातक आजाराचे प्रमाण वाढते. गाई आजारी पडण्याचे प्रमाण वाढून त्यांचा वैद्यकीय खर्च वाढतो. गोचिडांचे प्रमाण वाढून ताप येण्याचे प्रमाणही वाढते.
 दुग्ध व्यवसायात सुयोग्य तंत्रज्ञान निर्मिती आणि विस्तार, चांगल्या योजना, चांगल्या गुणप्रतीची दूध निर्मिती आणि वितरण यांसारख्या उणिवा आहेत. तसेच मजुरांची उपलब्धता, चाऱ्याचा अभाव, भांडवलाची उपलब्धता, दुधाचा दर याबरोबरच समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन या समस्यांना तोंड देत या व्यवसायाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– डॉ.भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ८ ऑगस्ट
१९०८ > युद्धविषयक लेखक व माजी लष्करी अधिकारी शंकर गंगाधर चाफेकर यांचा जन्म. ‘गाथा पराक्रमाची’ हे त्यांचे पुस्तक भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल आहे. पुढे ‘जिंकणारे जग’, ‘भारताचे परमवीर’, ‘पानिपतचे तिसरे युद्ध’ आणि ‘चाळिशीच्या चष्म्यातून’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.  
१९१६ > लेखक, समीक्षक डॉ. सदाशिव रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म. ‘काव्यशास्त्रप्रदीप’ हा त्यांचा गाजलेला ग्रंथ, तर हॅम्लेट व सवाई माधवरावांचा मृत्यू या नाटकांचे चिकित्सक अभ्यास, ‘शोकात्म व विश्वरूपदर्शन’ हा शोकात्मिकेचे सर्वागीण विवेचन मराठीतून मांडणारा पहिला ग्रंथ, प्राचीन भारतीय धर्मविचार आणि मराठी संत’ ही त्यांनी लिहिलेली अन्य पुस्तके होत.
१९६९ > सामाजिक, वाङ्मयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाणा करणारे दत्तात्रेय केशव केळकर यांचे निधन. ‘काव्यालोचन’, ‘साहित्यविहार’, ‘विचारतरंग’, ‘उदय़ाची संस्कृती’, ‘वादळी वारे’, ‘संस्कृतिसंगम’ ‘संस्कृती आणि विज्ञान’ या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरू ठेवला होता.
१९९८ > कादंबरीकार सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन. १४ कादंबऱ्या, दोन नाटके आणि काही कथा त्यांनी लिहिल्या होत्या.
–    संजय वझरेकर

वॉर अँड पीस                      गुप्तरोग (स्त्रियांचे आजार)
एकापेक्षा जास्त जोडीदारांशी शारीरिक संबंध ठेवणे व त्यातून आजार होणे वाढत्या प्रमाणात दिसते. या आजारात रुग्णांच्या जननेंद्रियांना किंवा गुप्तांगांना रोगाची बाधा होत असते. वैद्यकीय परिभाषेत अशा विकारांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (एसटीडी) असे संबोधले जाते. या विकारात जननेंद्रियाला खाज येणे, मूत्रमार्गातून चित्रविचित्र; जास्तकरून काळसर दरुगधीयुक्त स्राव येणे, जननेंद्रियाला सूज येणे, त्याचे रूपांतर पिवळे फोड वा जखमांत होणे असे होते. लघवी करताना वेदना, जळजळ, तिडिक अशी विलक्षण पीडादायक लक्षणे होतात.
या रोगाच्या कारणात ज्या व्यक्तीशी शारीरिक संबंध आला असेल त्या व्यक्तीस ‘व्हेनरल डिसिज’ म्हणजे उपदंशाची लागण बहुधा झालेली असते. हा रोग बळावायला त्या अवयवाची अस्वच्छता, मासिक पाळीच्या काळात योनीभाग स्वच्छ न ठेवणे, मासिकपाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणे अशी प्रमुख कारणे असतात. परपुरुषाला हा रोग असताना शरीरसंबंध ठेवणे काही महिलांना, ‘रेड लाईट एरियातील दुर्दैवी स्त्रियांना भाग पाडले जाते. कारण त्यांचे जीवनच अशा व्यवहारावर अवलंबून असते.
आधुनिक वैद्यकशास्त्रात याकरिता सहज घेता येण्यासारखी खूप प्रकारची प्रतिजैविके आहेत. सरकारी दवाखान्यात विनामूल्य मिळतात. अशा एका अत्यंत पुढे गेलेल्या विकाराच्या स्त्रीला, पुणे शहराच्या बुधवार पेठेतील तरुण मुलीला उपचार करण्याची संधी मला एका दलालाने दिली. ही तेलुगू भाषक बाई खूप तळमळत होती, गुप्तांगाच्या रोगामुळे ‘धंदा बंद होता’, खाणेपिणे, मांसाहार, अति तिखट पदार्थ चालूच होते.
लगेचच त्या महिलेच्या योनीभागाला बाहेरून लावण्याकरिता ‘टॉप’ दर्जाचे दहा मिली चंदनतेल, तीस ग्रॅम शतधौतघृत दिले. चंदनखोडाचा एक तुकडा, उगाळून त्याचे गंध पोटात घेण्याकरिता दिले. प्रवाळ, कामदुधा, चंदनादि, उपळसरीचूर्ण अशी औषध योजना केली. पाच दिवसांत रुग्णाला खूप आराम पडला.

जे देखे रवी..      रिकामटेकडेपणाचा उद्योग
लिहिणे हा माझा रिकामटेकडेपणाचा उद्योग आहे. या वर्षांच्या सुरुवातीला चिपळुणात साहित्य संमेलन झाले. व्यासपीठावर राजकारणी जास्त आणि साहित्यिक कमी. कारण राजकारणी पैसे उभे करतात. यांना जात असते त्यावरच त्यांचे चालते. कोणी म्हणाले हे संमेलन नेने, काणे आणि लेले यांचे आहे. जे पुढारी आळ्यातमळ्यात करतात ते इथे तळागाळाच्या गोष्टी करत होते. कोणी म्हणाले इथे धर्माची प्रतीके नकोत. ज्या माणसाच्या घरापासून दिंडी निघणार होती तो धर्माचा सच्चा सेवक नाही म्हणून ती दिंडीच बारगळली. कोणी म्हणाले आम्ही अध्यक्षांच्या तोंडाला काळे फासू. काळा रंग कसा निवडला? जे गोरे ते चांगले आणि काळे ते वाईट म्हणून? मला वाटले होते वर्णव्यवस्थेत पिचलेले जगभरातले लोक काळे. काळे फासून या गर्विष्ठ लेखकांना आपल्यात सामावून घेण्याचा हा प्रयत्न असावा. हीच ती सर्वसमावेशक वृत्ती!
त्यातच, याच संमेलनात  परशुरामाचा वाद उपटला. परशुराम पडला ब्राह्मण आणि पुरुषप्रधान संस्कृतीवाला तेव्हा हल्लीच्या फॅशनप्रमाणे बडवायला बरा सापडला. एक म्हणाले आम्ही परशुरामाचे चित्र ठेवणारच. ज्याने कोकण घडवले त्याच्या परशूमुळे जर आमचा शिरच्छेद होणार असेल तर मोक्षच. त्यातच शिवाजी महाराजांनी परशुरामाला दैवत मानले होते, हे सिद्ध /असिद्ध करायची चढाओढ लागली.
माझ्या बालपणीचा एकेरी हाक मारण्याजोगा शिवाजी हल्ली पार बदलला. पूर्वी एक खेळ होता ‘शिवाजी म्हणतो हात उचल’ की सगळे हात उचलायचे. हल्ली माझ्या बालपणीच्या शिवाजीबद्दल बोलणेही अशक्य. इतके अवघड की ज्यांचे शिवाजीवर प्रेम आहे ते गप्पच बसून राहणे पत्करतात. शिवाजी स्वत:ला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत असे हे मला लहानपणी ठाऊकही नव्हते. आता नवे परशुरामाचे अवतार ज्याला १ी५ी१२ी ्िर२ू१्र्रेल्लं३्रल्ल म्हणतात त्या न्यायाने जो कोणी थोडाफार शाब्दिक विरोध करेल त्याचे मुंडके उडवू अशा धमक्या देत आहेत.  वर्तमानपत्रांचेही नाही म्हटले तरी फावलेच. एवढी नौटंकी चालू असताना कोण संधी सोडणार म्हणा? वर्तमानपत्रांनी अध्यक्षांचे भाषण प्रथेप्रमाणे छापले. त्यात मार्गदर्शन होते. लेखकाच्या भाषेचे शुद्धलेखन करता येते, कोठे परिच्छेद करावा हे दाखवता येते. शुद्धलेखनही नको.  रांगडय़ा बोली भाषेची मजा मोठी और असते. पण कोणी काय लिहावे याचेही मार्गदर्शन? काल मला एक मित्र म्हणाला, ‘तू लेखक आणि स्तंभलेखक (!) चिपळूणला  गेला होतास का?’ मी मनात म्हटले ‘नव्हे नव्हे मी तो नव्हेच.’
अर्थात मलाही जात आहेच. ती जात म्हणजे माझे मराठीपण. या स्थितीत माझ्यासारख्याने कोठे बघावे आणि जावे?

–    रविन मायदेव थत्ते

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems in dairy business
First published on: 08-08-2013 at 12:01 IST