भाषा ही कायम प्रवाही असते व त्यामुळे शब्दांचे अर्थ काळाच्या ओघात बदलू शकतात. उदाहरणार्थ, ‘डोळस’ हा शब्द. या शब्दाचा मूळ अर्थ आहे ‘देखणा किंवा सुंदर’. हरिश्चंद्राच्या मुलाचे वर्णन करताना ‘‘डोळस राजकुमार’’ म्हणजेच ‘देखणा राजपुत्र’ असे मुक्तेश्वर म्हणतात. आज मात्र डोळस शब्द ‘बारकाईने पाहणारा’ या अर्थाने वापरला जातो. याउलट ‘देखणा’ शब्दाचा मूळ अर्थ आहे ‘पाहणारा’. चतुर माणसाचे वर्णन ‘‘चतुर सर्वत्र देखणा’’ म्हणजे ‘तो चतुर जो सगळीकडे पाहणारा असतो’ अशा शब्दांत समर्थ रामदास करतात. आज मात्र आपण ‘देखणा’ हा शब्द ‘सुंदर’ या अर्थाने वापरतो. डोळस आणि देखणा या शब्दांच्या अर्थात झालेला हा बदल.

‘यातायात’ हा असाच एक शब्द. यात आयात अशी त्याची फोड करता येईल. यातील मूळ धातू आहे या म्हणजे जाणे. यात म्हणजे गेलेला आणि आयात म्हणजे आलेला. निर्यात व आयात या शब्दांत अर्थाची हीच छटा आहे. त्या दृष्टीने यातायात शब्दाचा मूळ अर्थ जाणे- येणे असा होईल. हिंदूीत प्रवासाला यातायात असेच म्हणतात व तो वापर मूळ अर्थाशी अधिक प्रामाणिक असा आहे. ‘‘प्रवासात होणारा त्रास विचारात घेता हिंदूीत प्रवासाला यातायात म्हणतात ते अगदी सार्थ आहे!’’ असे पु. ल. देशपांडे यांनी विनोदाने लिहिल्याचे अनेकांना आठवत असेल. मूळ अर्थाशी प्रामाणिक राहायचे तर यातायात शब्दाचा अर्थ फारतर ‘हेलपाटे घालणे’ असा करता येईल. पण आज ‘यातायात’ शब्द त्रास, कष्ट, मेहनत या अर्थाने वापरला जातो. जसे की ‘‘एवढी यातायात करून शेवटी काय मिळाले?’’ काळाच्या ओघात झालेला हा अर्थबदल.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

‘व्हेंटिलेटर’ हा शब्द बघा. पूर्वी शाळेच्या वर्गात किंवा अन्य मोठय़ा खोलीत भिंतीच्या वरच्या बाजूला, पण छताच्या जरा खाली, छोटय़ा आडव्या खिडक्या असत व त्यांना व्हेंटिलेटर म्हटले जाई.

खोलीतील हवा कोंदट होऊ नये, वायुविजन (व्हेंटिलेशन) व्हावे यासाठी. आज मात्र अतिशय आजारी रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा व्हावा म्हणून जे उपकरण अतिदक्षता विभागात रुग्णाच्या नाकावर लावले जाते त्याला व्हेंटिलेटर म्हणतात! करोनाकाळात हा शब्द सारखा कानावर यायचा. ‘‘रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे’’ म्हटले की ‘तो अगदी मरायला टेकला आहे’ असाही त्याचा अर्थ लावला जातो!

– भानू काळे   bhanukale@gmail.com