आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो तेव्हा ते गोलाकार भासते. त्यामुळे आकाशातील दोन वस्तूंमधील अंतर सांगताना किंवा एखाद्या वस्तूचा आकार सांगताना कोनाच्या एककात सांगितला जातो. कोन मोजण्यासाठी आपण अंश हे एकक वापरतो. एका अंशाचे ६० समान भाग केले तर त्यापैकी एका भागाला १ आर्क-मिनिट असे म्हणतात. एका आर्क-मिनिटाचे ६० समान भाग केले तर त्या एका भागाला १ आर्क-सेकंद म्हटले जाते. पौर्णिमेच्या चंद्रिबबाचा (सरासरी) आकार ३० आर्क मिनिट असतो. कसा ठरवतात हा कोन?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी कल्पना करा की चंद्रिबबाच्या व्यासाच्या टोकाच्या दोन बिंदूंपासून निरीक्षकाच्या डोळ्यापर्यंत दोन सरळ रेषा काढल्या आहेत. त्या रेषांमध्ये जो कोन तयार होईल, तो ३० आर्क-मिनिटइतका असतो.

याच पद्धतीने दोन तारे एकमेकांपासून १ अंश अंतरावर आहेत असे वर्णन केले जाते. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्यक्षात ते तारे एकमेकांपासून (आणि आपल्यापासून) कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर असतात; पण आपल्याला गोलाकार आकाशावर ते एकमेकांपासून १ अंश अंतरावर आहेत, असे वाटते. आकाशात असलेल्या एखाद्या वस्तूचा आकार किती मोठा दिसेल, ही गोष्ट अर्थातच तिच्या आपल्यापासून असलेल्या अंतरावर आणि तिच्या मूळच्या आकारावर अवलंबून असते. प्रत्यक्षात सूर्य चंद्रापेक्षा ४०० पट मोठा आहे; पण तरीही सूर्यिबबाचा (सरासरी) आकारही पौर्णिमेच्या चंद्रिबबाएवढा म्हणजे सुमारे ३० आर्क-मिनिट दिसतो याचे कारण पृथ्वी-सूर्य अंतर पृथ्वी-चंद्र अंतरापेक्षा ४०० पटीने जास्त आहे. चंद्र आणि सूर्य यांचा (भासमान) आकार सारखा असल्याने ग्रहण काळात चंद्रिबब सूर्यिबबाला पूर्णपणे झाकू शकते. म्हणूनच पृथ्वीवरून सूर्यग्रहण खग्रास स्वरूपात दिसू शकते.

इतर काही उदाहरणे घेऊन आपल्याला कोनीय आकाराचा अंदाज करता येतो. समजा, आपण आपला हात सरळ ताणून धरला आणि हाताची मूठ वळली. अशा वेळी आपल्या मुठीने डोळ्यांशी केलेला कोन असतो सुमारे १० अंशांचा एक आर्क-सेकंद हा कोन तर खूपच लहान असतो. सध्या वापरात असलेले एक रुपयाचे छोटे नाणे एखाद्या निरीक्षकापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर धरले तर ते नाणे त्या निरीक्षकाच्या डोळ्यांशी जो कोन करेल त्याला म्हणायचे एक आर्क-सेकंद कोन.

-डॉ. गिरीश पिंगळे, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : विंदा करंदीकर : काव्यलेखन

विंदा करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वावर व कवितेवर आरंभीच्या काळात माधव ज्युलियनांचा प्रभाव असला, तरी ‘स्वेदगंगा’नंतरच्या कवितेने स्वतंत्र वळण घेतले. ‘स्वेदगंगा’, ‘मृदगंध’ या संग्रहानंतरच्या ‘धृपद’ संग्रहातील कविता वेगळी आहे. या कविता नवकवितेच्या, कलावादी साहित्याच्या ऐन प्रभावाच्या कालखंडात निर्माण झालेल्या आहेत.  गझल, मुक्त सुनीते, तालचित्रे, विरूपिका, आततायी अभंग इ. विविध प्रयोग व आकृतिबंध यामुळे त्यांची कविता समृद्ध झाली आहे. ‘स्वच्छंद’ हा नवा छंदही त्यांनीच मराठीत रूढ केला. व्यक्तिगत भावजीवनाबरोबरच सामाजिक वास्तव, विश्वरहस्याचा, सत्याचा, एकूण मानवी जीवनातील गुंतागुंतीचा शोध घेणारी त्यांची चिंतनशील, प्रयोगशील अशी कविता आहे.

एकीकडे बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, भौतिकवाद आणि दुसरीकडे भारतीय संस्कृती आणि तिच्याशी निगडित आध्यात्मिक जाणीव. या दोन्हींच्या संकरातून जन्माला आलेली त्यांची कविता वैशिष्टय़पूर्ण ठरली. मानवी जीवनातील मूलभूत दु:खाचा, द्वंदाचा सखोलपणे, गंभीरपणे, चिंतनशील वृत्तीने त्यांनी शोध घेतला. श्रमिकांच्या दु:खावेगाचा हुंदका ‘माझ्या मना बन दगड’ या कवितेत व्यक्त करताना ते म्हणतात-

‘हा रस्ता अटळ आहे।

अन्नाशिवाय,कपडय़ाशिवाय,

ज्ञानाशिवाय, मानाशिवाय

कुडकुडणारे हे जीव

पाहू नको! डोळे शीव!..

.. छातीमध्ये अडेल श्वास

विसर त्यांना, दाब, कढ

माझ्या मना बन दगड..।’

करंदीकरांच्या कवितेत व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रेही आहेत.  त्यांची विज्ञाननिष्ठा ‘हे आइनस्टाईनपासून’ ‘आततायी अभंगांपर्यंत विविध वळणांनी व्यक्त होते. जीवनाचे स्वरूप जाणून ते म्हणतात-  ‘मृत्यू असे म्हणून जगण्यात अर्थ आहे. अर्थात मूल्य येण्या, आनंद घेत जावे’ आणि त्या आनंदासाठी ते ‘घेता’ (धृपद संग्रह) कवितेत म्हणतात-

‘देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे..

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे’..

– मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The difference between the two objects in the sky
First published on: 23-10-2017 at 02:23 IST