या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोजपट्टीने अध्र्या मिलिमीटरपेक्षा कमी अंतराचे मोजमापन अचूकतेने करता येत नाही. कारण खुणांची संख्या, खुणांची जाडी याच्या मर्यादा येतात. उदा. दोरा, केसाचा व्यास अथवा नखाची जाडी मोजावयाची असल्यास मोजपट्टी उपयोगाची नाही. सूक्ष्म अंतरे मोजण्यासाठी वेगवेगळी नवनवीन साधने शोधण्यात आली. त्यापकी एक आहे व्हíनअर प्रमापी किंवा व्हíनअर कैवार. (इंग्रजीत, ‘व्हर्निअर कॅलिपर’) पिअर व्हíनअर या फ्रेंच शास्त्रज्ञाने याचा शोध लावला.  व्हíनअर प्रमापीचे लघुत्तम माप ०.१ मिलिमीटर म्हणजे साध्या मोजपट्टीपेक्षाही कमी असल्याने सरळ लांबीचे मोजमाप अधिक अचूकतेने करता येते. व्हíनअर प्रमापीच्या साहाय्याने वस्तूच्या आतील व बाहेरील अशी दोन्ही मापने घेता येतात, हे विशेष!  १५०  मिलिमीटरपासून १००० मिलिमीटपर्यंत वेगवेगळ्या लांबीची व्हíनअर प्रमापी बाजारात उपलब्ध आहेत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे उपकरणाची रचना असते. एका अखंड पट्टीवर सरकणारी दुसरी एकपट्टी असते. समजा, एखाद्या नळीचा आतला व्यास, बाहेरचा व्यास व नळीच्या िभतीची जाडी अचूक मोजायची आहे. त्यासाठी वरच्या बाजूस असलेल्या यंत्रणेच्या साहाय्याने आतील अंतर मोजता येईल तर खालच्या बाजूस असलेल्या यंत्रणेच्या साहाय्याने बाहेरील अंतर मोजता येईल. मागील बाजूस असलेल्या चपटय़ा ताडीने वस्तूच्या आतील भागाची खोलीदेखील मोजता येते. त्याला खोलीमापी असेही म्हणतात. स्थिर अखंड पट्टीवर मुख्य मापन असते. त्यावर एक-एक मिलिमीटरच्या खुणा तसेच सेंटिमीटरचे आकडे असतात; यालाच मुख्यमाप म्हणतात. सरकपट्टीवरही काही खुणा असतात; त्याला अनुश्रेणीमापन म्हणतात. मुख्य पट्टीवरील कमीत कमी मापन व अनुश्रेणीमापनावरील एकूण खुणांची संख्या यांचे गुणोत्तर म्हणजे व्हíनअर प्रमापीचे लघुत्तम माप. व्हíनअर प्रमापीचे मापन घेताना अनुश्रेणीमापकावर स्थिरपट्टीशी जुळणारी खूण शोधावी लागते. त्यानुसार गणन करून लांबी काढली जाते. (आकृती क्र. २ पाहा.)

आता तबकडी बसविलेला व्हíनअर प्रमापी बाजारात मिळतो; त्यामुळे कोणतीही गणिती क्रिया न करता मोजमापाचे सरळ वाचन तबकडीतील दर्शक दाखवितो. डिजिटल व्हíनअर प्रमापीमध्ये एकशतांश सेंटिमीटपर्यंतचे मोजमाप वाचन फलकावर दिसते.

सई पगारे- गोखले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कुसुमाग्रज : बांधिलकी शब्दांशी नव्हे, जगण्याशी!

१९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांनी केलेले भाषण अनेकार्थानी महत्त्वाचे होते. काव्य, भाषा, समाज आणि साहित्यिक यांविषयीचे विचार त्यांनी या भाषणात मांडले. ते म्हणाले : १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनासारख्या ऐतिहासिक घटना मी पाहिल्या. देशाच्या मुक्ततेसाठी सामान्यांनी केलेले बलिदान मी पाहिले. आणि त्या रक्ताच्या समुद्रातून प्रगट होणारा स्वातंत्र्याचा सूर्योदयही मी साजरा केला. नंतरच्या ४० वर्षांच्या आशा- निराशांचे उद्रेकही मी अनुभवले. या प्रदीर्घ यात्रेत कवितेने मला सोबत केलीच; पण ती करताना व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय घटनांचे सत्त्व शोधण्याचा तिने प्रयत्न केला आणि पर्यायाने माझ्या जगण्याला तिने एक व्यापक आशयही मिळवून दिला.. एक मिणमिणता दिवा घेऊन ती माझ्याबरोबर, नव्हे माझ्या पुढे सतत चालणारी आहे. त्या दिवलीच्या उजेडात माझे मी पण तर मला सापडलेच, पण या मी पणाचा भोवतालच्या परिसराशी असलेला संबंधही सापडला, हे कवितेचे ऋण कधीही न फिटणारे; आणि तरीही मी कविता जगलो नाही वा कवितेसाठीही जगलो नाही. पण कवितेने मला जगवले आहे. आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.

काव्यासाठी जगणे ही गोष्ट मला कधीच पटलेली नाही. मी असे मानतो की, काव्य हे अखेरीस एक जीवनदर्शन आहे. जीवनाचा अन्वयार्थ आहे; जीवनासंबंधीची प्रतिक्रिया आहे. म्हणून काव्याची अंतिम बांधिलकी आहे ती जीवनाशी; शब्दांशी नव्हे.

मित्र हो, ज्या कवीला आपण हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, त्याची काव्यविषयक भूमिका काय आहे, हे संक्षेपाने सांगण्याचा हा प्रयत्न. माझ्या आयुष्यातील हा एक आनंदाचा क्षण आहे. पुन्हा एकदा भारतीय ज्ञानपीठ या संस्थेचे आणि सर्व संबंधितांचे हार्दिक आभार मानतो.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vernier standard caliper
First published on: 28-06-2017 at 01:46 IST