‘या वर्षी तापमान इतके वाढले आहे, की दुपारी घराबाहेर पडलेल्या माणसांना सूर्याची प्रखर किरणे अक्षरश: भाजून काढतात.’ या वाक्यात ‘सूर्याची किरणे’ हा चुकीचा प्रयोग आहे. ‘किरणे’ या शब्दाचे स्वरूप काय आहे, ते पाहू या. ‘किरणे’ हे नाम, नपुंसकलिंगीअनेकवचनी आहे. म्हणजे या अनेकवचनी शब्दाचे एकवचन ‘किरण’ होईल. ‘किरणे’ हे नपुंसकलिंगी, अनेकवचनी असल्यामुळे ‘किरण’ हा एकवचनी शब्दही नपुंसकलिंगी होईल! जसे- बाळ-बाळे (बाळं), ‘सूर्याचे एक किरणही मला भाजून काढते.’ असे एकवचनी नाम व एकवचनी क्रियापद असलेले वाक्य होईल! ही रचना सदोष आहे.

मराठी भाषेत ‘किरण’ हा संस्कृतातून स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. तो संस्कृतात व मराठीतही नाम, पुल्लिंगी, एकवचनी आहे. या शब्दाचे अनेकवचन ‘किरण’ आहे. (जसे दगड- पु.ए.व.-दगड (पु.अ.व.), असेच आणखी काही शब्द पाहा. देव (पु.ए.व.)-देव (पु.अ.व.), मानव (ए.व.), मानव (अ.व.), दीप (ए. व.), दीप ( अ. व.) – वाक्ये अशी होतील- त्याने दगड उचलला. (क्रियापद-(एकवचनी). रस्त्यावर खूप दगड पडले होते.(अनेकवचनी) या अकारान्त, पुल्लिंगी शब्दांना आकारान्त विशेषण लागले, तर तेही वाक्यात असे होतील.- चांगला दगड, काळा दगड- चांगले दगड, काळे दगड. तसेच छोटा दीप, मोठे दीप, पण फळ (न.पुं.ए.व.)-फळे (ळं) (अ.व.न.पुं.)  सुरुवातीला दिलेल्या वाक्यात ‘किरणे’ या शब्दाचे एकवचन-किरण (न.पु.) होईल. त्याचे अनेकवचन ‘किरणे’ किंवा (किरणं), आपल्या भाषेत ‘किरण’ हा शब्द नपुंसकलिंगी नसून संस्कृताप्रमाणे पुिल्लगी आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती

मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या, भाषेचे स्वरूप जपणाऱ्या मराठी भाषकांनी नामाचे लिंग, वचन इ. लक्षात घेऊन कटाक्षाने शब्दयोजना करणे आवश्यक आहे; नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.  वरील वाक्य असे आहे- ‘या वर्षी तापमान इतके वाढले आहे, की दुपारी घराबाहेर पडलेल्या माणसांना सूर्याचे प्रखर किरण अक्षरश: भाजून काढतात.’  असेच काही शब्द- बदल (नाम पु.ए.व.) बदल (अ.व.), आहार (ए.व)- आहार (अ.व.), प्रहार (ए.व.)-प्रहार (अ.व.), प्रपंच (ए.व.)-प्रपंच (अ.व.), अपमान (ए.व.)- अपमान(अ.व.)

-यास्मिन शेख