News Flash

पालघर तालुक्यात एक लाख जणांच्या लसीकरणाचा टप्पा पार

साठ वर्षांहून अधिक ३१ हजार नागरिकांनी लशीची मात्रा घेतली आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील चार लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात पालघर तालुक्याने एक लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यामधील ग्रामीण भागांमध्ये  मर्यादित प्रतिसाद मिळत असताना पालघर तालुक्यामधील लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळणे हे दिलासादायक आहे.

६ जूनपर्यंत झालेल्या तीन लाख ९७ हजार १४ लसीकरण यापैकी वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात एक लाख ८८ हजार १५ तर ग्रामीण भागांत दोन लाख आठ हजार ९९९ इतके लसीकरण झाले आहे. यापैकी पालघर तालुक्यातील ८१ हजार ४५० नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर १९ हजार ३३६ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पालघर तालुक्यामधील आठ हजार २५६ आरोग्य कर्मचारी व ९०८१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून १८ ते ४४ वयोगटातील दहा हजार नागरिक, ४५ ते ६० वयोगटातील ४२ हजार नागरिक तर साठ वर्षांहून अधिक ३१ हजार नागरिकांनी लशीची मात्रा घेतली आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर बोईसर टीमा कार्यालय येथे दोन केंद्र, पालघर नगर परिषद क्षेत्रात सात केंद्र तसेच तारापूर, सफाळे, माहीम, सातपाटी, केळवे, एडवण, उमरोळी, सोमटा, मासवण, मनोर व मुरबे या ठिकाणी लसीकरण टप्प्याटप्प्यात घेण्यात आले. आगामी काळात तालुक्यातील सरावली, नवापूर व केळवे रोड येथे लसीकरण सत्र आयोजित केली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली. पालघर नगर परिषद क्षेत्रातील लसीकरणासाठी नगर परिषदेने मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. इतर ठिकाणी लसीकरणाची सत्रे आयोजित करताना प्राथमिक आरोग्य केंद्रामधील उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांची सांगड घालून तसेच दोन ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. लसीकरण केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुनियोजित पद्धतीने एक लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

इतर तालुक्यांमधील लसीकरण

डहाणू: ३१०७१

जव्हार: ९९३६

मोखाडा: ३८१७

तलासरी: ४६१७

वसई ग्रामीण: २४२२८

विक्रमगड: ८६८३

वाडा: २५८६१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:21 am

Web Title: palghar district one lakh corona vaccination completed akp 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 दत्तक योजनेत वृक्षांना बहर
2 वैतरणा पुलाजवळ रेती उत्खनन करणाऱ्या बोटीला ग्रामस्थांनी पकडले
3 पर्यावरण संवर्धनाकडे उद्योजकांची वाटचाल
Just Now!
X